Breaking News
Home / Interesting / भारतीय संसद भवनातील पंखे उलटे का ?

भारतीय संसद भवनातील पंखे उलटे का ?

आपण नेहमीच संसद टीवीवर पाहतो पण तुमच्या कधी लक्षात आलाय का कि संसदेत लावलेले पंखे उलटे आहेत ? आमच्याही नवत आलं पण कोरोना lockdown मध्ये जसे अनेकांना शोध लागतायेत तसाच हा शोध आम्हाला लागला अन मग घेतली माहिती..!!

भारतीय सांसद भवन

देशातील संसद भवन हे केवळ एक ऐतिहासिक स्थळच नाही तर भारतातील अत्यंत आलिशान भवनांपैकी एक आहे. संसदेचा निर्माण १९२७ साली करण्यात आला होता म्हणजे आपली संसदेची इमारत ही जवळपास ९३ वर्ष जुनी आहे अन जेव्हा ३४० दालनांचे हे सांसद भवन बांधले गेले होते तेव्हा यासाठी ८३ लाख रुपये इतका खर्च आला होता.

Bhartiy Sansad Bhavan

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण जेव्हा हे बांधायचे ठरले तेव्हा प्रमुख वास्तुकार हर्बर्ट याने त्रिकोणी व त्यावर एक मोठा गुंबद अस सुचवलं होत पण नंतर गोलाकार रचनाच अधिक योग्य राहील अस ठरले. १४४ खांबांवरती या भवनाचा निर्माण झाला आहे. अन याच भवनात भारताचे संविधान लिहिले गेल अन प्रथम प्रधानमंत्र्यांनी शपथसुद्धा घेतली.

सांसद भवन निर्माण

कामाची सुरूवात १२ फेब्रुवारी १९२१मध्ये ‘ड्यूक ऑफ कनाट’ यांनी केली होती. याचा नकाशा दोन प्रसिद्ध तत्कालीन आर्किटेक्ट्स सर एडविन लुटियंस आणि सर हर्बर्ट बेकर यांनी तयार केला. ही वास्तू निर्माण व्हायला सहा वर्षांचा कालावधी लागला होता. तेव्हा भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड इर्विन सहाजिकच त्यांनी १८ जानेवारी १९२७ ला भावनाचे उद्घाटन केले.

“अजून एक महत्वाची गोष्ट भारताच्या या सर्वात महत्वाच्या इमारतीचा पाया हा भारतीय संस्कृतीचाच आहे..!! कळले नाही ना, तर संसदेचा निर्माण आराखडा हा एका मंदिराच्या निर्माणाच्या आराखड्या नुसार केला गेलेला आहे.. चौसष्ठ योगिनी मंदिर”

सध्या भारतात एकूण ४ चौसठ योगिनी मंदिरे आहेत, २ मध्यप्रदेशात तर २ ओडिशामध्ये आहेत. मध्यप्रदेशातील मंदिर सर्वात प्राचीन आणि मुख्य मंदिर मानलं जातं. यात ६४ खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक शिवलिंग आहे व मंदिरात पोहोचण्यासाठी २०० पायऱ्या आहेत.

bharatiy sansad bhavan and chausath yogini temple

ब्रिटीश आर्किटेक्ट सर एडविन लुटियस आणि सर हर्बर्ट बेकर यांनी योगिनी मंदिरचा आधार मानून भारताच्या संसद भवनाचं निर्माण करण्यात आलं होतं. अगदी मध्य प्रदेशातील मंदिराप्रमाणेच संसद भवन १४४ खांबांवर टिकलेलं आहे. या स्तंभांची उंची २७ फूट आहे. तर सहा एकर परिसरात संसद भवन उभारलं आहे. प्रमुख दरवाजासहित संसद भवनाला एकूण १२ दरवाजे आहेत.

पंखे उलटे का

तुम्ही संसदेतील सेंट्रल हॉलचा व्हिडीओ किंवा फोटो पाहिला असेल तर त्यात तुम्ही तेथील पंखे उलटे दिसले असतील. येथील सगळेच पंखे छताऐवजी जमिनीवर खांबाच्या आधारे लावण्यात आले आहेत. छताला पंखे लावणे हे सोयीचे अन साधारणपणे सगळे असाच करतात. पण इथे उलटे का ? संसद तर स्पेशल इमारत तेव्हा इथे स्पेशल कारण असायलाच हव नाही का?

chausath yogini temple inspired parliment

तर इतिहासकार असं मानतात की, जेव्हा संसद भवन उभारण्यात आलं होतं तेव्हा याच्या गोलाकार छतालाच याची ओळख मानलं जात होतं. अन जस सुरवातीला सांगितलं कि इमारत त्रिकोणी बांधली तरी गुंबद अन वर्तुळकर वान्धली तरी गुंबद, रचनाकारांना गुंबद अन त्याखालचे छत हे प्रमुख आकर्षण वाटत होते म्हणून हे गोलाकार छत फार उंचीवर बांधण्यात आलं होतं. छत उंचीवर असल्याने त्यावर पंखे लावले तरी हवेचा जास्त प्रभाव लोकांना मिळाला नसता त्यात लांबलचक पंख्यांमुळे छताची कळा गेली असती ते होताच. म्हणूनच सांसद भवनात असे पंखे लावले

संसद भवनातील पंखे सुरूवातीपासूनच अशाप्रकारे उलटे लावण्यात आले आहेत. संसद भवनाचं ऐतिहासिक महत्व कायम ठेवण्यासाठी यासोबत कुणीही छेडछाड केली नाही. त्यामुळे ते आजही तसेच आहेत.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Covid Corpna Birth

रायपुर मध्ये जन्मली ‘कोविड’,’कोरोना’ नावाची जुळी मुले

तुम्ही म्हणाल ही काय बाष्कळ बडबड चालू आहे. कोरोना अन कोविड यांच्या मुळे कुणालातरी आनंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + nine =