Breaking News
Home / किस्से / कोरोना पॉजिटिव! घरी राहायचं सोडून गेला दोन लग्नात, फुटबॉल मैच पहिली, सहा लोकांना दिला रोग

कोरोना पॉजिटिव! घरी राहायचं सोडून गेला दोन लग्नात, फुटबॉल मैच पहिली, सहा लोकांना दिला रोग

जगात जणू तिसरे महायुद्ध चालू आहे, संपूर्ण जग कोरोनाच्या जागतिक आपत्तीपुढे एकजुटीने उभे आहे मात्र काही महाभाग(भाषेचे बंधन आल्यामुळे फक्त हा शब्द वापरत आहोत, याजागी तुम्हाला हवा तो शब्द तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता). कोरोनामुळे जगात तब्बल ११ हजार लोक दगावले आहेत भारतातसुद्धा ४ लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला घरीच क्वारंटीन होण्याचा सल्ला दिला जातो.

महाराष्ट्र अन अनेक राज्यात निळ्या शाहीचा एक शिक्का सुद्धा हातावर मारला जातो, जेणेकरून इतरांना समजावे कि यांच्यापासून थोड अंतर ठेवावे. पण काही लोक आहेत ना ते ऐकायलाच तयार नाहीत, ते या तपासण्या चुकवतात… केल्याच तरी घरी बसत नाहीत. यामुळे ते स्वतःचे तर करतातच पण आपल्या प्रिय लोकांचा जीवही धोक्यात घालतात.

एक चू*** अन अनेकांना लागण

या युद्धजन्य परिस्थिती मध्ये असे अनेक लोक आहेत, जे स्वतःच्या मूर्खपणामुळे अनेकांचे जीव धोक्यात घालतात

युद्धानंतर जर war crime चे खटले चालतात, असेच खटले या महाभागांवर चालवावे असे आम्हाला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये सांगा

कणिका कपूरचे उदाहरण संपते न संपते तोच एक अजून एक मामला समोर आला आहे. केरल मध्ये कर्नाटक सीमेजवळ एक गाव आहे कासरगोड. तर या कासोरगड मध्ये एकजन कोरोना संक्रमित खाडी देशातून आला, त्याला सांगितले गेले कि तू घरीच क्वारंटीन होऊन रहा, कुणालाही भेटू नको. पण हा तर फोरेन रिटर्न महाभाग ऐकणार थोडीच …!! या महाभागाने २ लग्नसमारंभ अटेंड केले, एका शोकसभेलाही हजेरी लावली. आमदारासहित अनेकांना भेटला… ट्रेन अन बस प्रवास सुद्धा केला अन एक फुटबाल मैच पहायलाही हजेरी लावली. या एका महाभागामुळे कासोरगड मध्ये 6 कोरोना रुग्ण सापडले आहेत.

कसोरगड कर्नाटक सीमेवर आहे, या एकट्या महाभागामुळे कर्नाटकाने आपले बोर्डर सील केले आहे. या माणसाचे नाव न लिहिता केरल सरकारने ऑफिशियल स्टेटमेंट दिले आहे त्यात त्याची travel history दिली आहे अन सोबतच लिहिले आहे.

” कासोरगड मध्ये समोर आलेल्या एका मामल्यामध्ये एका माणसामुळे, ज्याने सेल्फ-क्वारंटीन फॉलो केले नाही, त्याने करीपूरमधून फ्लाईट पकडली अन एक दिवस तिथे मुक्कामही केला. मग त्याने कासरगोडसाठी रेल्वेने प्रवास केला. पुढचे काही दिवस त्याने कोणतीही काळजी न घेता अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, ज्यात एक फुटबाल मैच सामील आहे. लोकांना अनेकदा सांगूनही ते काळजी घेत नाहीत. दोन आमदार युद्ध कोरोना संशयीत आहेत ज्यांनी या माणसाशी हात मिळवला होता व त्याची गळाभेट घेतली होती.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

कसाबविरुद्ध साक्ष दिली म्हणून गावाने टाकले वाळीत – Survival Stories Of 26/11

२६/११ च्या हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झाली. राग…, संताप…, दुखः…, वेदना…, कितीतरी भावना मनात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + twenty =