Breaking News
Home / Interesting / कोरोना व्हायरस आणि प्लास्मा उपचारपद्धती

कोरोना व्हायरस आणि प्लास्मा उपचारपद्धती

कोरोनामुळे हैराण झालेल्या जगाला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. यामुळे कोरोनावरच्या उपचार पद्धतीत क्रांतिकारी बदल होवू शकतो अन कोरोनाची भीती फार कमी होऊ शकते. या पद्धतीचे नाव आहे प्लास्मा उपचारपद्धती !!

चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यानंतर भारतात प्लाझ्मा उपचार पद्धतीची चाचणी सुरू करणण्यात आली आहे. आयसीएमआर या कोरोना उपचार पध्दती निश्चित करणाऱ्या संस्थेन तशी परवानगी दिली आहे.

काय आहे प्लास्मा पद्धत ??

समजा तुम्हाला एखादा रोग विषाणूमुळे झाला तर त्या विषाणू विरोधात तुमच्या शरीरात काही प्रतीजैविके (अँटीबॉडी) तुमची प्रतिकारशकत तयार करते. अन या प्रतीजैविकांमुळे जेव्हा पुढे पुन्हा हा विषाणू तुमच्या शरीरात घुसेल तेव्हा तो तुमच्या शरीराला जास्त धोका उत्पन्न करू शकत नाही.

‘साधारण शब्दात सांगायचे तर, सुरवातीला नव्या विषाणूंना मारणारी बंदूक आपल्या सैनिकांकडे (WBC किंवा प्रतिकारशकत) यांच्याकडे नसते. त्यामुळे नवीन विषाणू शरीरात हैदोस घालतो न खूप नुकसान करतो. या दरम्यान आपले शरीर या विषाणूंना मारणारी बंदूक तयार करते, जेव्हा ही बंदूक WBC वा सैनिक पेशींना मिळते तेव्हा या पेशी विषाणूला लवकरच मारून टाकतात’

कोविड -19 मधून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीराने अशा प्रतीजैविकांना बनवले असते, अन ही प्रतीजैविके प्रामुख्याने रक्ताच्या प्लास्मा मध्ये असतात. तेव्हा जर हा प्लास्मा आजारी असणाऱ्या रुग्णांना दिला तर त्यांना आयतीच प्रतिजैविके मिळतील अन विषाणूंना ते लवकर संपवतील.

‘बंदुकीविना झगडणाऱ्या सैनिक पेशींना आयत्या बंदुका (अथवा बनवण्याचे तंत्रज्ञान) दिल्याने त्यांचा बंदुका बनवण्याचा वेळ वाचेल अन सहाजिकच शरीराला व्हायरस जास्त काही अपाय करू शकणार नाही’

Coronavirus Plasma treatment

या बाबतीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आपले प्रोटोकॉल मार्गदर्शक तत्त्वे पुढील दोन दिवसांत जाहीर करेल. यासह, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडूनही मान्यता घेण्यात येत आहे. परंतु, या उपचार पध्दतीवर कांही मर्यादा आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. मनोज मुराहेकर म्हणाले, की सध्या आयसीएमआरकडून केरळला प्लाझ्मा उपचारांच्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मान्यता घेत आहे. आयसीएमआर लवकरच देशातील या उपचार पद्धतीच्या क्लिनिकल चाचणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करेल. डीसीजीआयचीही मान्यता घेण्यात येत आहे. तथापि, क्लिनिकल चाचणी अंतर्गत, हे उपचार केवळ व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना दिले जाईल.

ठीक झाल्यानंतर १४ दिवसांनी घेलता जाउ शकतो प्लाज्मा:

प्रोफेसर नवल विक्रम यांच्या अनुसार कोणत्याही रुग्णाच्या बरे झाल्यानंतर १४ दिवसांनीच प्लास्मा घ्यावा अन त्याची दोन वेळा कोविड टेस्ट निगेटिव आलेली असावी यासोबतच रुग्णाची एलिजा टेस्ट पण करावी. एलिजा टेस्टमधून कळते कि रुग्णामध्ये एंटीबॉडीज च प्रमाण किती आहे. सोबतच इतर आजारांसाठीही रुग्णाची तपासणी केली जावी.

Blood Plasma

एक डोनरचा प्लाज्मा बरे करू शकतो चार लोक :

या पद्धतीमध्ये नीट झालेल्या रुग्णाच्या शरीरातून ऐस्पेरेसिस विधि ने रक्त काढले जाईल. यामध्ये रक्तातून प्लास्मा व इतर पदार्थ काढून बाकी रक्त परत रुग्णाला चढवले जाते. एका व्यक्तीमधून जवळपास 800 मिलीलिटर प्लास्मा घेतला जाऊ शकतो. तर कोरोना बाधित रुग्णामध्ये एन्टीबॉडी टाकण्यासाठी जवळपास 200 मिली प्लास्मा चढवावा लागतो. म्हणजे एक व्यक्ती चार लोकांचे प्राण वाचवू शकतो. याआधी सार्स व स्वाईन फ्लू अशा रोगांमध्ये या पद्धतीचा वापर केला गेला आहे.

पाच मेडिकल कॉलेज मध्ये ट्रायल घ्यायला परवानगी.

देशातील पाच कॉलेज व दवाखान्यांमध्ये याचे क्लिनिकल ट्रायल केला जाईल. तिरुवनंतपुरम मधील चित्रा तिरुनाल आयुर्विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान ला क्लीनिकल ट्रायल साठी परवानगी मिळाली आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

जाणून घ्या अशा प्रकारे बनली अर्पिता सलमान खान यांची बहीण !

सगळ्यांना माहीतच आहे की खान परिवारामध्ये ‘अर्पिता खान’ ला एखाद्या ‘राजकुमारी’ सारखे ठेवले जाते. अर्पिता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 5 =