Breaking News
Home / Interesting / कोरोनाव्हायरस विरोधात आपल्या जनावरांसाठी बनवला मास्क

कोरोनाव्हायरस विरोधात आपल्या जनावरांसाठी बनवला मास्क

संपूर्ण दुनियेला यावेळी कोरोना विषाणूने ग्रासले आहे, अमेरिकेला तर अक्षरश: हैराण केल आहे. यातच मध्यंतरी एका वाघाला कोरोना झाल्याची बातमी आली होती अशात माणसांना आपल्यासोबत आपल्या जनावरांचीही काळजी वाटणे सहाजिकच आहे. अशातच तेलंगानामधून काही फोटो अन बातम्या बाहेर आल्या आहेत.

तेलंगाना मध्ये एक माणूस आहे, ज्याला असे वाटते कि त्याच्या जनावरांना या विषाणूची लागवण होऊ नये. अन आपल्या बकऱ्या सहीसलामत राहाव्यात म्हणून त्याने आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे.

तेलंगाना मधील कालरू मंडळ मधील वेंकटश्वर राव याने चक्क आपल्या बकऱ्यासाठी मास्क बनवले आहेत. कोरोनाव्हायरस या विषाणूची आपल्या शेळ्यांना लागवण होऊ नये म्हणून त्याने हे मास्क आपल्या शेळ्यांना घातले आहेत.

news18 या वृत्तवाहिनीला राव याने सांगितले कि, ‘माझ्याकडे २० शेळ्या आहेत अन माझे संपूर्ण कुटुंब या शेळ्यांवर अवलंबून आहे कारण आमच्याकडे शेती नाहीये. जेव्हापासून मी या कोरोना विषाणूबद्दल ऐकले तेव्हापासून मी मास्क घालूनच घराबाहेर निघतो’

 ‘अमेरिका मध्ये एका वाघाला जेव्हा कोरोना रोग झाल्याची बातमी मला ऐकायला मिळाली तेव्हापासून मी शेळ्यांना मास्क घातले अन त्यांना लांब जंगलात चरायला घेऊन जातो’

कोरोना या विषाणूपासून वाचण्यासाठी अन आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी चाललेली या माणसाची धडपड स्तुती करण्याजोगीच आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Bhartiy Sansad story

भारतीय संसद भवनातील पंखे उलटे का ?

आपण नेहमीच संसद टीवीवर पाहतो पण तुमच्या कधी लक्षात आलाय का कि संसदेत लावलेले पंखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + eight =