Breaking News
Home / Interesting / आई शप्पथ… सापडला पृथ्वीचा ‘दुसरा चंद्र’; हा पाहा फोटो

आई शप्पथ… सापडला पृथ्वीचा ‘दुसरा चंद्र’; हा पाहा फोटो

पृथ्वीला उपग्रह किती ? असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर अगदी शेंबडे पोरगही उत्तर देईल कि एक !!. पण लवकरच अन निदान काही दिवस तरी या प्रश्नाचे उत्तर दोन असं द्यावं लागणार आहे. कारण पृथ्वीचा दुसरा उपग्रह शोधल्याचा दावा अमेरिकेतील काही संशोधकांनी केला आहे.

असा दावा करणाऱ्या संशोधकांनी पृथ्वीच्या दुसऱ्या उपग्रहाला २०२० सीडी ३ हे नाव दिलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा लहानगा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहे. अॅरेझॉना या अमेरिकेतील कॅटालीना स्काय सर्व्हेमधल्या संशोधकांनी या उपग्रहाचा शोध लावला आहे. पहिल्यांदा १९ फेब्रुवारी रोजी येथील संशोधकांना हा उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसला.

पण ही पहिली वेळ नवती कि हा उपग्रह संशोधकांना दिसला याआधीही तब्बल सहा वेळा हा उपग्रह दिसला होता. अन त्यामुळेच हा पृथ्वीचा मीनी मून अस संशोधकांनी शिक्कामोर्तब केल आहे.

या चंद्राचा आकार ऐकून तर तुम्ही अवाकच व्हाल कारण हा उपग्रह फक्त १.९ मीटर लांब आणि ३.५ मीटर रुंद आहे. दैनंदिन भाषेत सांगायचं झाल एका लहान गाडीच्या आकाराचा आहे.

“पृथ्वीला एक तात्पुरता चंद्र मिळाला आहे. त्याचं नाव आहे ‘२०२० सीडी थ्री’. १५ फेब्रुवारीच्या रात्री मी कॅटालीना स्काय सर्व्हे येथे माझ्याबरोबर काम करणाऱ्या टेडी प्रुयेनीसोबत या चंद्राचा शोध लावला,”

अशा आशयाचे ट्विट खगोल अभ्यासक असणाऱ्या कॅस्पर विर्झेकोस याने केलं होत. “सध्या या चंद्राच्या प्रदक्षिणा घालण्याच्या मार्गावरुन हा पृथ्वीभोवती फिरत असल्याचे दिसते. सुर्यामुळे या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या मिनी मूनवर काही परिणाम झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. तसेच या खगोलीय वस्तुचा इतर मोठ्या कृत्रिम वस्तुशी (सॅटेलाइट वगैरे) संबंध असल्यासंदर्भातही काही माहिती मिळाली नाही,” असं द इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियच्या मीरर प्लॅनेट सेंटरने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

 या उपग्रहाची कक्षा अजूनतरी माहिती नाही, कारण हा कधी पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी अगदी लांब. याआधी २००६ साली RH1 20 नावाची अशीच खगोलीय वस्तू पृथ्वीभोवती फिरत होती. पण अवघ्या १ वर्षानंतर ही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकार्षानामधून बाहेर पडली. कदाचित हा चंद्राचा लहान भाऊसुद्धा असाच बाहेर पडेल अस संशोधकांना वाटते.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Covid Corpna Birth

रायपुर मध्ये जन्मली ‘कोविड’,’कोरोना’ नावाची जुळी मुले

तुम्ही म्हणाल ही काय बाष्कळ बडबड चालू आहे. कोरोना अन कोविड यांच्या मुळे कुणालातरी आनंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve − 11 =