Breaking News
Home / देश अन राजकारण / अपक्ष उमेदवार रोहित पवारांचा अर्ज बाद

अपक्ष उमेदवार रोहित पवारांचा अर्ज बाद

निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत अगदी अर्जही भरून झाले आहेत. अनेक उमेदवार आपल नशीब, काम, जनसंपर्क हे या निवडणुकीत आजमावत आहेत. अनेकदा मुख्य उमेदवारांच्या नावाचीच माणसे अनेकदा निवडणूक लढवतात, अन फक्त नावाच्या आधारावर अनेको मते मिळवतात.

अनेक वेळा तर त्यांनी मिळवलेली मत ही त्याच नावाचा मुख्य उमेदवार यांच्या पथ्यावर पडतात अन कठीण अशा लढतीत त्यांचा मार्ग अधिक कठीण होतो.

कर्जत जामखेड येथे अशीच एक हाय-प्रोफाईल लढत होत आहे ती रोहित पवार विरुद्ध मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये. या निवडणुकीत रोहित पवार यांच्यासारख हुबेहूब नाव असणाऱ्या एका उमेदवाराने अर्ज भरला होता. रोहित पवार या अपक्ष उमेदवारच नाव हे राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याशी तंतोतंत जुळत होते (दोघांच्याही वडिलांचे नावसुद्धा राजेंद्र असच आहे).

या अपक्ष उमेदवाराचा फटका रोहित पवार यांना बसण्याची शक्यता होती. पण निवडणूक आयोगाच्या छाळणीमध्ये ही शक्यता मालवली आहे. अपक्ष उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज बाद झालेला आहे. अपूर्ण शपथपत्र असल्या-कारणाने अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाला असल्याचे समजते

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

अबब !! या उमेदवाराइतकी संपत्ती इतर कुणाचीही नाही

भाजपने यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचे तिकिटे कापले, त्यापैकीच एक होते माजी मंत्री प्रकाश मेहता. माजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 1 =