Breaking News
Home / Uncategorized / खरच नेहरूंचे आजोबा गयाजूद्दीन गाजी होते का ???

खरच नेहरूंचे आजोबा गयाजूद्दीन गाजी होते का ???

१८ व शतक चालू होत, अन भारतावर मुघलांच शासन चालू होत. औरंगजेब गेल्यानंतर मुघल साम्राज्य आपल्या शेवटच्या घटका मोजण्यासाठी अजून काही वेळ होता. दिल्लीच्या तख्तावर बसेलाला होता फारुखसियार, हाच तो सम्राट ज्याने १७१७ मध्ये इंग्रजांना आपल्या साम्राज्यात व्यापार करण्याची तर परवानगी दिलीच सोबत त्यांना वखारी बांधण्याचीसुद्धा परवानगी दिली. फारुखसियार अवघी दोनच वर्ष राज्य करू शकला.

आता येऊया आपल्या मुख्य गोष्टीवर, तर या फारुखसियारच्या राजवटीच्या काळात काश्मीरमध्ये एक पंडीत राहत होता. नाव, राज नारायण कौल… या पंडीत राजनारायण कौल यांनी काश्मीरच्या इतिहासावर एक अप्रतिम पुस्तक लिहिले होते, ‘तारिख-ए-काश्मीर’. काश्मीरच्या इतिहासवरचे हे एक सुंदर पुस्तक आहे. अन या पुस्तकामुळे राज नारायण कौल यांना प्रसिद्धी तर मिळालीच पण राजाश्रयसुद्धा मिळाला. १७१६ साली जेव्हा फारुखसियारच्या कामावर कौल यांच्याबद्दल माहिती गेली तर त्याने आपसूकच त्यांना दिल्लीला बोलावून घेतले.

भारताच्या सांस्कृतिक इतिहासात राजे राजवाडे विद्वानांना राजाश्रय देत अन त्यांच्या गुणांचा वापर सांस्कृतिक व विज्ञानीक प्रगती करण्यासाठी करत.. अन या सहिष्णू राजे अन विद्वानांच्या जोरावर भारत विश्वगुरु हजारो वर्षे बनला होता. राजाचे आमंत्रण म्हणजे आयुष्याचे कल्याण अन विद्वत्तेचा गौरव !! राजनारायण दिल्लीला पोचले. राजाने त्यांना चांदणी चौकात एक हवेली अन बरीचशी जमीन इनामात दिली.

नेहरू गांधी परिवार वंशावळ
नेहरू गांधी परिवार वंशावळ

चांदणी चौकाची हवेली अन कौलांचे नेहरू रुपांतर !!

तुम्ही आत्तापर्यंत म्हणत असाल आम्ही नेहरूंचा इतिहास जाणायला आलो अन हे महाशय कौल घराण्याची कहाणी सांगतायत. तर थोडस थांबा !! फारुखसियारणे दिलेल्या हवेलीनेच कौल यांना नेहरू बनवले.

तुम्हाला माहितीच असेल व्यवसाय, गाव यांच्यावरून अनेकांची आडनावे पडलेली आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर महात्मा फुले यांचे फुले आद्णार हे त्यांना पूर्वजांच्या व्यवसायामुळे मिळाले. आपल्या आडनावात गांवांची नावे धारण केलेले हजारो लोक तुम्हाला अवतीभोवती मिळतील.

मोतीलाल नेहरू(सर्वात मागे) जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडीत
मोतीलाल नेहरू(सर्वात मागे) जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडीत

राजनारायण कौल यांना मिळालेल्या हवेलीच्या बाजूला एक नहर (झरा) वाहत होता. अन चांदणी चौकात त्यावेळी अनेक कश्मीरी अन त्यातल्या त्यात ‘कौल’ राहत असत म्हणून राजनारायण कौल यांच्या परिवाराला लोकांनी ‘नेहरू कौल’ संबोधायला सुरवात केली. कालौघात फक्त नेहरू हेच नाव या परिवाराला चिटकून बसले.

हा परिवार सुरवातीला आपले आडनाव ‘कौल-नेहरू’ असे लिहित असे. पहिल्यांदा जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी कौल-नेहरू लिहिण्याऐवजी फक्त नेहरू अस लिहायला सुरवात केली.

पुढे या जहागिरीचा फायदा कौल-नेहरू कुटुंब घेत राहिले. राजनारायण यांचे नातू मौसराम कौल अन साहेबराम कौल यांच्यापर्यंत या जहागिऱ्या कायम राहिल्या. मौस राम यांचा मुलगा लक्ष्मी नारायण यांना इस्ट इंडिया कंपनीमध्ये एक मोठे पद मिळाले अन त्यांना कंपनीने मुघल दरबारात वकील बनवले. कंपनीच्या सहवासात या कुटुंबाने खूप प्रगती केली.

मोतीलाल नेहरू व जवाहरलाल नेहरू
मोतीलाल नेहरू व जवाहरलाल नेहरू आई स्वरूप राणी सोबत (१८९४)

गंगाधर नेहरू कि गयासुद्दीन गाजी ?

लक्ष्मी नारायण यांचे मुलगे होते गंगाधर नेहरू, १८५७ च्या उठावाच्या वेळी ते दिल्लीचे कोतवाल होते. या उठावात दिल्लीत अफरातफरी माजली होती तेव्हा, दिल्ली पडल्यानंतर गंगाधर कौल आपल्या परिवाराला घेऊन दिल्लीहून पळाले. गंगाधर आणि त्यांची पत्नी इंद्राणी यांना पाच मुळे झाली दोन मुली पटरानी व महारानी तर तीन मुळे बंसीधर, नंदलाल आणि मोतीलाल. यातले बंसीधर सर्वात मोठे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी कुटुंबाचा सांभाळ केला. त्यांनी पुढे न्यायाधीश म्हणून काम पहिले अन कौल-नेहरू कुटुंबाला पूर्वीची स्थिती मिळवून दिली. बंसीधर यानंतर नंदलाल अन त्यानंतर मोतीलाल हे सुद्धा वकिली व्यवसायात शिरले अन मोतीलाल तर चक्क केम्ब्रिजमधून डिग्री घेऊन आले. वकिलांच्या या घरात पुढे जवाहरलाल नेहरूंचा जन्म झाला ते सुद्धा मोठे वकील होते.

सोशल मिडीयावर नेहरू परिवाराविषयी अनेक अफवा काळजीपूर्वक पसरवल्या जात आहेत. भारताच्या स्वतंत्रता लढ्यात भारतासाठी लढलेली प्रत्येक व्यक्तीला मग ते जवाहरलाल नेहरू असो अथवा स्वातंत्रवीर सावरकर असोत या सर्वांना ‘व्हायरल महाराष्ट्र’ पवित्र मानते अन या महान व्यक्तीच्या विरोधात अफवा पसरवणाऱ्यान्ना आपण हा लेख share करून उत्तर द्याल ही आशा.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

मुलगी बनून गर्ल्स हॉस्टलमध्ये घुसला अन केल अस काही कि ….

दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स ! या कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात 12 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + twelve =