Breaking News
Home / देश अन राजकारण / हन्ता विषाणूची चीन मध्ये सापडली पहिली केस

हन्ता विषाणूची चीन मध्ये सापडली पहिली केस

[Huntavirus in Marathi] सध्या जगात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे, हजारो लोकांचा बळी या चीनी विषाणूने घेतला आहे. याचवेळी स्वाईन फ्लू अन बर्ड फ्लू यांच्यासुद्धा काही केसेस भारतात अन अनेक देशांत आढळून आल्या आहेत. पण याचवेळी एक नवा आजार डोके वर काढू पाहतोय.

चीनमध्ये या नव्या आजाराने डोके वर काढायला सुरवात केले आहे. अन एक रुग्ण या हंता नामक व्हायरस ग्रस्त आढळला आहे अन त्याचा पहिला बळी ठरला आहे.

चीनमधील ग्लोबल टाइम्सने एका ट्वीट-द्वारे म्हटले कि युनान प्रांतातील एक माणूस सोमवारी त्याच्या घरी शानडोंग प्रांतात परतत होता. हा ३२ वर्षीय माणूस हंता विषाणूच्या टेस्टमध्ये पोजीटीव आढळला. या व्यक्तीसोबत प्रवास केलेल्या इतर ३२ जणांचीही चाचणी करण्यात आली आहे. हा व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये जात नाही. तरीही चीनमध्ये काळजी घेतली जात आहे.

Huntavirus Marathi

काय आहे तरी काय हा the hantavirus?

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेन्शन (CDC) संस्थेच्या अनुसार हंता विषाणू ही विषाणूंची एक जाट आहे जी प्रामुख्याने सरपटनाऱ्या प्राण्यांमुळे पसरते अन अनेक प्रकारचे रोग माणसांमध्ये पसरवते. या रोगांमध्ये हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम(HPS) म्हजे फुफ्फुसाचा रोग व Haemorrhagic fever with renal syndrome (HFRS) म्हणजे रक्तस्रावी व किडनीसंबंधी बिघाड घडवतो.

Huntavirus Trending

कोरोना व्हायरस पेक्षा हा प्रामुख्याने सरपटनाऱ्या प्राण्यांच्या लघवी, चेहरा, लाळ याद्वारे व दुर्लभ परिस्थितीमध्ये त्यांच्या चावण्याने होतो.

hantavirus ची लक्षणे

हंता व्हायरस ची लगन झाल्याची सुरवातीची लक्षणे म्हणजे थकवा येणे, ताप भरणे, स्नायुंना पेटके येणे, डोके दुखणे, थंडी वाजणे ही आहेत. जर याचे वेळीच उपचार केले गेले नाही तर खोकला अन श्वास घेण्यास त्रास होत अन हा खूप जीवघेणा ठरू शकतो. यामध्ये मृत्यूचे सरासरी प्रमाण तब्बल ३८% असल्याचे CDC ने सांगितले आहे. दुसऱ्या HFRS मध्ये लक्षणे जवळपास सारखीच आहेत पण सोबतच कमी रक्तदाब व किडनी फेल्युर होण्याची शक्यता आहे.

सोबतच CDC यांनी सांगितले आहे कि सरपटनाऱ्या प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रणात आणणे हे यावरील प्रमुख उपाय आहे. दिलासादायक बातमी ही कि या रोगाची माणसापासून दुसऱ्या माणसाला संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असते.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

अबब !! या उमेदवाराइतकी संपत्ती इतर कुणाचीही नाही

भाजपने यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचे तिकिटे कापले, त्यापैकीच एक होते माजी मंत्री प्रकाश मेहता. माजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 8 =