Home / Uncategorized / जेव्हा जॅकी श्रॉफ अनिल कपूरच्या 17 वेळा कानाखाली मारतो

जेव्हा जॅकी श्रॉफ अनिल कपूरच्या 17 वेळा कानाखाली मारतो

अनिल कपूर आणि जेकी श्रोफने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम लखण, त्रिमूर्ति, युद्ध, अंदाज अपना, रूप की राणी चोरो का राजा, कभी ना कभी असे अनेक चित्रपट या जोडगोळीने एकत्र गाजवले. या दोघांची जोडी म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असायची, कारण या दोघांची केमिस्ट्री अफलातून होती इतकी की अनेकांना ते खरोखरचे भाऊ वाटायचे.

या दोघांचा एक किस्सा आपल्यासमोर अट्टा आला आहे. निर्माता विधु विनोद चोप्रा यांनी परिन्दा या चित्रपटाला तीस वर्षे झाले यावेळी त्यांनी एक आठवण सोशल मीडियावर टाकली. हा किस्सा परिन्दा चित्रपटच्या चित्रीकरणाच्या वेळचा आहे.

विधु विनोद चोप्रा यांनी एक विडिओ शेअर करत संगितले की, अनिल कपूर हा आपल्या कामाच्या बाबतीत खूप काळजी घेतो. जर एखादे दृश्य चांगले होत नसेल तर ते चांगले होईपर्यन्त तो रिटेक देत राहतो. जेकी त्याच्या कानाखाली देतो या सीन साठी त्याने तब्बल 17 वेळा टेक घेतले होते.

विडिओच्या शेवटी जेकी, अनिल आणि चोप्रा हे परिन्दा चित्रपटच्या आठवणी जागवताना दिसतात. यावेळी पहिला शॉटच खूप चांगला जमून आला होता आणि अनिल कपूर चे एक्स्प्रेशन देखील बरोबर होते पण अनिलने अजून एक, अजून एक म्हणत तब्बल 17 वेळा कानाखाली खाल्ल्या.

Check Also

ऑक्सिजन लेव्हल राहील 100 च्या जवळपास, दम लागणार नाही, केवळ ही 2 पाने पुरेशी, जाणून घ्या उपाय

जग सध्या बदलते, अनेक गोष्टी आज पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. करोंना नंतरचे जग तर आमुलाग्र बदललेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *