Breaking News
Home / Interesting / या ‘बाई’ला इंजेक्शन बरोबर लागलं तर जग कोरोनापासून वाचेल

या ‘बाई’ला इंजेक्शन बरोबर लागलं तर जग कोरोनापासून वाचेल

नॉवेल कोरोना वायरस नावाचा एक विषाणू ज्याच्यामुळे COVID-19 नावाचा रोग होतो. या रोगाने अन या विषाणूने जगभरात अवघा धुमाकूळ घातला आहे. या विषाणूला अन रोगाच्या प्रसाराला थांबवायला सरकार अन डॉक्टर काय काय करतायेत हे तुम्ही रोजच ऐकत वाचत असाल. पण या रोगाच्या संदर्भात एक चांगली बातमी आहे.

Corona news in marathi

नॉवेल कोरोना वायरस या विषाणूविरोधात तयार केलेल्या वैक्सीन म्हणजेच लसीचा पहिला डोस माणसाला दिला गेलेला आहे. अन ज्या व्यक्तीला हा डोस दिला गेलंय त्या व्यक्तीचे नाव आहे जेनिफर.

कोण आहे ही जेनिफर?

जेनिफर होलार, 43 वर्षाची महिला जी सिएटल मधल्या एका टेक कंपनीमध्ये ऑपरेशन मेनेजर आहे. जेनिफरला दोन अपत्य आहेत तीसुद्धा अमेरिकेतच राहतात. तर वाशिंग्टन राज्यात असलेल्या सिएटल जवळ एक ‘कायसर पर्मनेंते वॉशिंगटन रीसर्च इंस्टिट्यूट’ नावाची रिसर्च करणारी संस्था आहे.  या संस्थेने वैक्सीन वरच्या रीसर्च साठी फेसबुकवर एक जाहिरात दिली होती, जेनिफरने टी जाहिरात पाहिली अन अप्लाई केला. काही दिवसांनी तिला फोन आला अन तिला या रिसर्च मध्ये सामील करून घेण्यात आल.

corona vaccine testing

जाहिरात कसली अन कसला रीसर्च?

ही संस्था कोरोना विषाणूविरोधात एक लस बनवत होती, अन संशोधनाअंतर्गत 45 स्वयंसेवकांना एका महिन्याच्या अंतरानी 2 डोस दिले जाणार आहेत. अन या 45 लोकांच्या शरीरावर या लसीचा कसा परिणाम होतो हे अभ्यासले जाणार आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या ताकदीचा डोस दिला जाणार आहे अन त्यावरून ही संस्था ठरवेल कि किती ताकदीचा डोस पुरेसा आहे ते, अन त्या प्रमाणात मग लस बनवली जाईल. लीज जैक्सन नावाची एक अमेरिकन डॉक्टरच या संशोधनाचे नेतृत्व करत आहे.

जेनिफर हॉलरने एसोसिएटेड प्रेस ला दिलेल्या इंटरव्यू मध्ये सांगितलं कि,
‘आम्ही खूप असहाय झालो होतो, माझ्यासाठी काहीतरी करण्याची ही सुवर्ण संधी होती. माझी दोनही मुल मानतात कि मी या संशोधनात भाग घेऊन खूप चांगल काम केले आहे’.

वैक्सीन म्हणजे काय अन ही काम कसे करते?

जेव्हा शरीरात एखादा विषाणू प्रवेश करतो तेव्हा आपल्या शरीरातल्या सैनिक पेशी (WBC) यांना आपल्या इम्यून सिस्टीमद्वारे कळते कि कुणीतरी अपयारक आगंतुक शरीरात घुसला आहे. पण घुसणारा विषाणू जर आपल्या इम्यून सिस्टीमला माहितीचा नसेल तर… तर आपली इम्यून सिस्टीम सैनिक पेशींना कळवायला उशीर लावते अन त्यामुळे सैनिक पेशी त्या विषाणूशी लढेपर्यंत शरीराचे खूप नुकसान झालेले असते.

“शत्रू कोण हे माहितीच नसल्यामुळे सैनिक पेशी काही करू शकत नाहीत, याउलट व्हायरल त्यांच्या पाठीत सुरा खुपसत… शरीराला खूप नुकसान पोहचवतो”

वेक्सीन मध्ये विषाणूचे कमी घातक सेम्पल असतात अन त्यामुळे ते शरीराला जास्त नुकसान करत नाहीत अन पूर्ण ताकदीचा विषाणू शरीरात घुसायच्या आधीच इम्यून सिस्टीमला तो ओळखीचा झालेला असतो… म्हणजे लढाई समोरा समोरची होते, अन आपल्या शूर अशा सैनिक पेशी त्या व्हायरल चा काटा काढतात… अन इतकच नाही, तर पुन्हा ज्यावेळी तो प्रवेश करेल तेव्हाही माहितच असतो

Corona vaccine in marathi

या टेस्ट नंतर काय?

व्हायरस च्या धोक्यामुळे लसीचे खुपसारे क्लिनिकल ट्रायल होतात, कारण त्यामध्ये काहीही त्रुटी राहू नयेत.

फेज़ 1

यामध्ये डझनभर लोकांवर प्रयोग होतो अन साधारणपणे ३ महिन्याच्या आत ही फेज पूर्ण होते.

फेज़ 2

यामध्ये शंभरएक जणांना लस दिली जाते, अन शक्यतो संक्रमित क्षेत्रातील लोकांनाच प्राधान्याने लस दिली जाते. साधारणपणे सहा ते आठ महिने या फेजमध्ये जातात.

फेज़ 3

यामध्ये हजोरो लोकांना ही लस दिली जाते, अन त्यानंतर या लसीला अधिकृत मान्यता मिळते. सगळ्या फेजेस अन टेस्ट्स चा data ड्रग रेग्युलेटरी बॉडी कडे जातो भारतात Central Drugs Standard Control Organization नावाची अशी संस्था आहे तर अमेरिकेत US Food and Drug Administration आहे. या संस्था हा data पाहतात अन त्यावरून ठरवतात कि वेक्सीन चा अप्रूव करायचे कि नाही. अन त्यानंतर मोठ्या प्रमाणात लस बनवणे अन वितरीत करणे सुरु होते.

जेनिफर हॉलर अन तिच्यासोबतचे स्वयंसेवक इतिहासाचे शिलेदार बनत आहेत जेव्हा संशोधक अन डॉक्टर कोरोना सारख्या विषाणू विरुद्ध लढाई लढत आहेत.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Covid Corpna Birth

रायपुर मध्ये जन्मली ‘कोविड’,’कोरोना’ नावाची जुळी मुले

तुम्ही म्हणाल ही काय बाष्कळ बडबड चालू आहे. कोरोना अन कोविड यांच्या मुळे कुणालातरी आनंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve − ten =