Breaking News
Home / Uncategorized / काश्मीरच्या जमिनीला मिळाला पहिला खरेदीदार !!

काश्मीरच्या जमिनीला मिळाला पहिला खरेदीदार !!

भारतीय संविधानातले आर्टिकल 370 काढले गेले, तेव्हापासून सबंध भारतभर सोशल मिडिया असो वा गावोगावचे चहाचे कट्टे काश्मीर मध्ये जमीन घेण्याबद्दल सगळीकडे चर्चा चालू होती. पण थांबा काश्मिरमधल्या जामिनाचा पहिला खरेदीदार मिळालाय.!!!

महाराष्ट्र सरकार ने आज म्हणजे ३ सप्टेंबर ला सांगितले कि ते काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणार आहेत अन या खरेदी केलेल्या जमिनीवर दोन रिसोर्ट उघडले जातील.

महाराष्ट्राचे मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मिटिंग मध्ये याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले कि महाराष्ट्राच्या केबिनेटने या प्रस्तावावर सहमती दिलेली आहे.

महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विभाग आहे MTDC म्हणजे Maharashtra Tourism Development Corporation, येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये हे जम्मू-कश्मीरमधल्या जमिनीचा एक सर्वे करणार आहे. अन येणाऱ्या काही बातम्यानुसार महाराष्ट्र सरकार जमिनीचा एक तुकडा लेह मध्ये घेणार आहे तर दुसरा श्रीनगरजवळील पर्यटन स्थळ पहलगं मध्ये.

दोन्ही तुकड्यांची प्रत्येकी किंमत १ कोटी इतकी सांगितली जाते. पण व्यवहार झाल्यानंतरच कळेल कि महाराष्ट्र सरकारने जमीन कितीला विकत घेतली.

आर्टिकल 370 मुळे आत्तापर्यंत भारताचा नागरिक जम्मू कश्मीर मध्ये जमीन विकत घेऊ शकत नवता पण राष्ट्रपतींनी काही दिवसांपूर्वी एक अध्यादेश काढून 370 ला निष्प्रभावी केले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचा जमीन खरेदीचा निर्णय मोठा मनाला जातो व यामुळे इतर राज्य व व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल असे मानले जाते. सोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांना एक हक्काचे रिसोर्ट मिळेल जिथे ते थांबू शकतात

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

या हिरोइन्सनी करियरसाठी लपवले होते आपले लग्न.. ही तर अवघ्या १७व्या वर्षी चढली बोहल्यावर !

बॉलिवूड स्टार्स चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहणे पसंत करतात आणि बरेच सितारे आपला जिव्हाळ्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + 11 =