Breaking News
Home / Interesting / ‘लालबाग परळ’ चित्रपटातली मामी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दुसरा नवरा आहे कॉमेडी स्टार

‘लालबाग परळ’ चित्रपटातली मामी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दुसरा नवरा आहे कॉमेडी स्टार

‘लालबाग परळ’ मधील मामी.

मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हा कदाचित मुंबईच्या इतिहासातील एक मैलाचा दगड असेल. काही वर्षांपूर्वी यावर एक चित्रपट आला होता, लालबाग परळ !! हिंदीमध्ये हा चित्रपट सिटी ऑफ गोल्ड या नावाने प्रदर्शित झाला होता.

लालबाग परळ या चित्रपटामध्ये एक वेगळी अशी प्रेमकहाणी दाखवली होती, म्हाताऱ्या मामांसोबत लग्न झालेली मामी आपल्या शेजारच्या एका मुलाच्या प्रेमात पडलेली दाखवलेली आहे. परिस्थिती अन समाज यांच व्यवस्थीत भान असलेली मामी आपल्या भडक भूमिकेमुळे अन चित्रपटातील भडक दृश्यांमुळे सर्वांच्याच लक्षात राहिली.

laalbag parel maami

अनेक लोकांना माहिती असेल लालबाग परळमधील मामी ही अत्यंत लोकप्रिय अशी हिंदी-मराठी-गुजराती अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी हिंदी चित्रपटात काम केलेलं आहे. या अभिनेत्रीचे नाव काश्मीर शाह अस आहे. तिचा जन्म २ डिसेंबर १९७१ मध्ये मुंबईमधल्या एका मराठी-गुजराती कुटुंबात झाला. लोकप्रिय शास्त्रीय गायिका अंजनीबाई लोलकेर यांची काश्मीर आईकडून नात लागते.

city of gold mami

कश्मिरा शाह सुरवाती जीवन

काश्मीरचे सगळे शिक्षण मुंबईतून पूर्ण झाले अन शिक्षण पूर्ण केल्यावर तिने १९९४ मध्ये हिंदी टेलिव्हिजनमधून आपल नशीब आजमावायला सुरवात केली. हळूहळू तिचा अभिनय क्षेत्रात जम बसला अन तीने १९९६ पासून चित्रपटसृष्टीत पर्दापण केले.

47 Year Kashmira Shaha Married to Krushna Abhishek and Have 2 Childrens

एक डान्सर, मोडेल म्हणूनसुद्धा इंडस्ट्री तिला ओळखते ज्यावेळी ती मोडेलिंग करायची तेव्हा ती ‘मिस युनिव्हर्सिटी वर्ल्ड’ आणि ‘मिस इंडिया टॅलेंट’ सारखे पुरस्कार ती जिंकली आहे. पण या अभिनेत्रीचा पती हा तिच्यापेक्षाही मोठा अभिनेता आहे. कॉमेडीच्या दुनियेतल्या सर्वोत्तम काही कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. चीची अर्थात गोविंदा यांचा भाचा अन कोमेडीचा सुपरस्टार कृष्णा हा काश्मीरचा पती आहे.

कश्मिरा शाह फिल्म करियर

काश्मीरने मराठी आणि हिंदी अशा खूपशा चित्रपटांत काम केले आहे. बिग बॉस च्या पहिल्या सिझनमध्ये सुद्धा तिने भाग घेतला होता त्याचबरोबर २००७ मध्ये ‘नच बलिये’ तर २०११ मध्ये ‘खतरों के खिलाडी’ मध्ये सुद्धा तिला घेण्यात आले होते. काश्मीर प्रमुख नायिकेपेक्षा छोट्या पण महत्वाच्या अशा अनेक भूमिकांमध्ये आपल्याला दिसली यामध्ये उल्लेखनीय अशा भूमिका म्हणजे ‘यस बॉस’ चित्रपटात सिमा चौधरीचे साकारलेले कॅरॅक्टर, ‘प्यार तो होना ही था’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘हेरा फेरी’, ‘कही प्यार ना हो जाए’, ‘लालबाग परळ’, ‘रेवती’, ‘जंगल’, ‘शिकारी’ मधल्या भूमिका होत. डान्सर म्हणून ‘कुरुक्षेत्र’ ‘बंथन’, ‘मर्डर’ चित्रपटात ‘दिल को हज़ार बार रोका’ या चित्रपटातील अनेक लोकप्रिय आयटम सॉंग खूप गाजले.

kashmira shaha shikari hot

कश्मिरा शाह अन कृष्णा अभिषेक Love Story

कश्मिराच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास कॅलिफोर्नियाच्या चित्रपट दिग्दर्शक ‘ब्रॅड लिस्टरमॅन’ अन काश्मीर अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते अन या प्रेमाचं २००२ मध्ये लग्नात रुपांतर सुद्धा झाल. पण मतभेदांमुळे अवघ्या पाच वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर २००७ ला ते वेगळे झाले. त्यानंतर कृष्णा अभिषेक अन काश्मीर एकमेकांच्या जवळ आले, या जवळीकीचे रुपांतर प्रेमात झाले अन शेवटी 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. कृष्णा अन काश्मीर यांना २ मुळे आहेत.

krushna abhishek kashmira shah

व्हायरल महाराष्ट्रकडून कृष्णा अभिषेक अन काश्मीरा यांना वैवाहिक अन करियरसाठी खूपसाऱ्या शुभेच्छा

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Covid Corpna Birth

रायपुर मध्ये जन्मली ‘कोविड’,’कोरोना’ नावाची जुळी मुले

तुम्ही म्हणाल ही काय बाष्कळ बडबड चालू आहे. कोरोना अन कोविड यांच्या मुळे कुणालातरी आनंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 11 =