Breaking News
Home / Uncategorized / पोलिसांनी चालान कापले, म्हणून चक्क गाडीच पेटवून दिल्ली

पोलिसांनी चालान कापले, म्हणून चक्क गाडीच पेटवून दिल्ली

नव्या दिल्लीचा त्रिवेणी कॉम्प्लेक्स, राकेश नावाचा एक तरुण गाडीवरून चालला होता. ड्युटीवर असलेल्या पोलिसाने त्याला हटकले, अंदाज एकदम बरोबर निघाला. राकेशने दारू पिलेली होती. मोटर वीइकल्स ऐक्ट मध्ये झालेल्या नवीन संशोधनानंतर आता दारू पिऊन गाडी चालवण्यावर तब्बल 10 हजार रुपयांचा दंड ठरवण्यात आलेला आहे. राकेशकडे सोबतच गाडीचे कागदपत्र सुद्धा नवते. पोलिसांनी मग त्याची गाडी जप्त करून घेतली.

दारूची नशा म्हणा कि दुसरे काही, गाडी जप्त झाल्यामुळे राकेश संतापला. तो अचानक पोलिसांजवळ गेला आणी म्हणाला माझ्याकडे गाडीचे कागदपत्र आहेत अन पोलिसांचे ध्यान भटकावून त्याने चक्क स्वतःची गाडी पेटवून दिली.

त्यानंतर राकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्यावर IPC च्या 453 कलमाअंतर्गत FIR दाखल केली गेली आहे. पोलिसांनी लागलेली आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण गाडीने आग चांगलीच पकडली होती.

मोटार वाहन कायद्यामध्ये झालेले नवीन संशोधन १ सप्टेंबर पासून लागू झाले आहेत. तेव्हापासून रोजच मोठमोठाले दंड भरावे लागण्याचे उदाहरणे समोर येत आहेत. सोशल मिडीयावर याविषयी चर्चेला उत आला आहे. अनेक लोग याच्या विरोधात आहेत तर काही समर्थनात !! रोज अनेक मिम्स समोर येत आहेत काही दंड तर इतके विचित्र आहेत कि गाडीपेक्षा जास्त पैशाचे चलन कापले गेले.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

मुलगी बनून गर्ल्स हॉस्टलमध्ये घुसला अन केल अस काही कि ….

दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स ! या कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात 12 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × one =