Breaking News
Home / देश अन राजकारण / अबब !! या उमेदवाराइतकी संपत्ती इतर कुणाचीही नाही

अबब !! या उमेदवाराइतकी संपत्ती इतर कुणाचीही नाही

भाजपने यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचे तिकिटे कापले, त्यापैकीच एक होते माजी मंत्री प्रकाश मेहता. माजी मंत्री प्रकाश मेहतांना डावलून त्यामानाने नवख्या उमेदवाराला तिकीट दिले गेले. मेहतांच्या जागेवर वर्णी लागलेले विद्यमान नगरसेवक पराग शहा यांची संपत्ती ऐकून तुम्ही अवाक व्हाल. पराग मेहता हे कदाचित या विधानसभेतील सर्वात श्रीमंत उमेदवार असतील कारण त्यांची संपत्ती कि 500 कोटींपेक्षाही जास्त असल्याचे सांगितले जाते.

घाटकोपर पूर्व मतदारसंघ हा गेल्या अनेक निवडणुकांपासून प्रकाश मेहता यांचा गड मानला जातो. पण यावेळी मेहतांच्या गडावर शहा यांचे निशाण फडकले आहे, अन पक्षानेच पराग शहा यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे. पराग शहा यांना तिकीट दिल्यामुळे घाटकोपर पूर्वेतले स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत अन त्यांची नाराजी सार्वजनिकपणे समोर येत आहे.

प्रकाश मेहता यांना तिकीट न दिल्यामुळे मेहतांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे अन त्याचाच परिणाम म्हणून घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते तेव्हा त्यांच्या गाडीची प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

पराग शहा यांची संपत्ती अशाप्रकारे आहे

रोख रक्कम :२ लाख ९ हजार. बँकेतील ठेव ५४ लाख ३५ हजार ४६२
BONDS अन रोख्यातली गुंतवणूक: २ कोटी ७० लाख ६६ हजार ७३९
लिस्टेड शेअर्स: १९९ कोटी ९४ लाख २२ हजार १९५
अनलिस्टेड शेअर्स : २ कोटी २१ लाख ६६ हजार ५५९
PF खाते : ४८ लाख ७८ हजार ३७२
इन्सुरंस मधील गुंतवणूक : ४ कोटी २५ लाख ९ हजार ६५५\
वाहन स्कोडा रॅपिड : ८ लाख ९८ हजार, चांदी १ लाख ७ हजार ८१९
सोन व दागिने : ६३ लाख १४ हजार १५६, हिरे ५९ लाख ३ हजार ९४२
जंगम मालमत्ता : २३९ कोटी २४ लाख १९ हजार १६८ रूपये
स्थावर मालमत्ता २० कोटी ६८ लाख ४२ हजार ६०१ रूपये

अशी एकूण ५४३ कोटी ७६ लाखांची मालमत्ता पराग शहा यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

अपक्ष उमेदवार रोहित पवारांचा अर्ज बाद

निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत अगदी अर्जही भरून झाले आहेत. अनेक उमेदवार आपल नशीब, काम, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − two =