Breaking News
Home / किस्से / पुतीन यांनी रशियात किती सिंह सोडले 500 कि 800 ? वाचा संपूर्ण

पुतीन यांनी रशियात किती सिंह सोडले 500 कि 800 ? वाचा संपूर्ण

संपूर्ण जगभरात कोरोनाच सावट आहे. प्रत्येक देश या विषाणूशी लढण्यासाठी काहीना-काही करतोय. आपल्याइकडे तर संपूर्ण संचाबंदी आहे, पण २२ मार्च ला थाळी वाजवण्याच्या बहाण्याने लोकांनी अक्षरशः मिरवणुका काढल्या(अरे देवा !!). तेव्हा लोकांना या प्रसंगाचे गांभीर्य दाखवण्यासाठी पुतीन यांना एक कणखर व दृष्ठा नेता दाखवणारे एक मेसेज फिरू लागला. आशय होता कि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी लोकांनी घरी राहावे म्हणून शहराशहरात सिंह सोडलेत म्हणे.!! सोबतच सिंहाचा फोटो सुद्धा होता, शहरात फिरणारा…

काही दिवसांपूर्वी ‘रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी रशियामध्ये 500 सिंह सोडल्याचा’ एक WhatsApp मेसेज फोनवर येऊन धडकला. कालपर्यंत या सिंहांची संख्या 800 पर्यंत पोचली. अगदी ट्वीटर वरसुद्धा हा मेसेज अन फोटो विजेच्या वेगाने फिरत होते. व्हायरल महाराष्ट्र च्या टीमने हा मेसेज चेक करायचे ठरवले.

आम्ही सरळ फोटो उचलला अन गुगलच्या इमेज सर्च मध्ये टाकला तर आम्हाला काय आढळल माहितीये ?? हा सिंह काही पुतीनबाबांनी सोडलेला नवता.. हा फोटो होता दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहराचा, २०१६ मध्ये या शहरात सिंह घुसला होता अन त्यावेळी कुणीतरी त्याला टिपले(केमेऱ्यात!!)

रशियाचे अध्यक्ष पुतीन हे कणखर राजकारणी आहेत, अन आपल्यात काही मूर्ख आहेत (संचारबंदीमध्ये फिरणारे) हेही मान्य पण रशियात सिंह सोडलेत ही बातमी अजूनतरी कुठल्याही रशियन अथवा अंतराष्ट्रीय वाहिनीने दिलेली नाही तेव्हा ही बातमी तथ्यहीन आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

कसाबविरुद्ध साक्ष दिली म्हणून गावाने टाकले वाळीत – Survival Stories Of 26/11

२६/११ च्या हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झाली. राग…, संताप…, दुखः…, वेदना…, कितीतरी भावना मनात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − eighteen =