Breaking News
Home / Interesting / रायपुर मध्ये जन्मली ‘कोविड’,’कोरोना’ नावाची जुळी मुले

रायपुर मध्ये जन्मली ‘कोविड’,’कोरोना’ नावाची जुळी मुले

तुम्ही म्हणाल ही काय बाष्कळ बडबड चालू आहे. कोरोना अन कोविड यांच्या मुळे कुणालातरी आनंद होईल का ??

Corona Birth Story

छत्तीसगड मध्ये असे एक कुटुंब आहे, या कुटुंबात डॉन जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे अन त्यामुळेच हे कुटुंब खूप खुश आहे. पण मग याचा अन कोरोनाचा काय संबंध ?? तर या दाम्पत्याने आपल्या मुलांची नावे चक्क या व्हायरस च्या नावावरून ठेवली आहेत. मुलीचे नाव कोरोना तर मुलाचे नाव कोविड !!

किस्सा छत्तीसगड ची राजधानी रायपूर चा सांगितला जातोय. २६ मार्च ला प्रीती वर्मा नावाच्या महिलेला प्रसवकळा सुरु झाल्या तेव्हा तिला ‘भीमराव आंबेडकर हॉस्पिटल’ मध्ये भर्ती केले. २७ मार्च ला या महिलेला दोन जुळी मुले(मुलगा-मुलगी) झाली.

 PTI सोबत बोलताना प्रीतीने सांगितले कि “या दिवसाला मी आयुष्यभर विसरू शकत नाही. लॉकडाउन मुळे माझ्या नवऱ्याला मला दवाखान्यात न्यायला काहीही साधन मिळत नवते. अनेक प्रयत्न केल्यानंतर त्याने बाईक वर बसवून मला दवाखान्यात नेले. रस्त्यामध्येसुद्धा अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला अन शेवटी आम्ही पोचल”

दवाखान्यामधील कर्मचाऱ्यांनी लाडाने मुलांना कोरोना व कोविड नावाने हाक मारायला सुरवात केली. तेव्हा आजची परिस्थिती पाहता आम्ही देखील मुलांना कोविड व कोरोना हीच नावे बहाल केली. कारण ही दोघे आम्हाला(अन अनेकांना) त्यांच्या नावांमुळे ही भयंकर महामारी अन लॉकडाउन विसरू देणार नाहीत.

Covid Birth Story

मुलाचे उत्तरप्रदेश मधील असणारे हे दाम्पत्य रायपुर मधील जुन्या वस्तीत एक भाड्याच्या घरात राहतात. हॉस्पिटल मध्ये पाहायला येणारे परिजन अशा नामकरणाला एक साहसी निर्णय म्हणून पाहतात.

बीआर अंबेडकर मेमोरियल दवाखान्याच्या जनसंपर्क अधिकारी शुभ्रा सिंह यांनी सांगितले कि २६ मार्च च्या रात्री प्रीती वर्मा नावाची महिला आपल्या पतीसहित दवाखान्यात पोचली. परिस्थिती अत्यंत गंभीर होती म्हणून सिजेरीयन करावे लागले. त्यानंतर तिघेही अत्यंत स्वस्थ असल्याने त्यांना लवकरच घरीही सोडण्यात आले.  फक्त 45 मिनिटांमध्ये ही डिलिवरी करण्यात आली होती. दवाखान्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी या मुलांना कोरोना व कोविड अशा नावाने हाका मारायला सुरवात केली होती अन ही दोघे दवाखान्याच एक आकर्षण केंद्रच बनून गेले होते.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Bhartiy Sansad story

भारतीय संसद भवनातील पंखे उलटे का ?

आपण नेहमीच संसद टीवीवर पाहतो पण तुमच्या कधी लक्षात आलाय का कि संसदेत लावलेले पंखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + twelve =