Breaking News
Home / Uncategorized / Ranu Mandal On Lata Mangeshkar Comment

Ranu Mandal On Lata Mangeshkar Comment

रेल्वे स्टेशनवर अन रेल्वेमध्ये अनेकदा गाणे गावून आपली उपजीविका चालवणारे अनेक सुंदर गायक आपल्याला दिसतात. अशाच एक गाईका म्हणजे राणू मोंडल. नशीब कधी अन कशी उसंडी मरेल याचा नेम नाही राजाचा रंक अन रंकाचा राजा बनवणे हा नशिबाचा खेळ.

रेल्वे स्टेशनवर राणू मोंडल गाणे गायच्या अन लोकांनी दिलेल्या दाद अन पैसे यावर आयुष्य व्यतीत करायच्या. अशात त्यांचा एक विडीयो सोशल मिडीयावर व्हायरल गेला. या विडीयोने त्यांना रातोरात घराघरात पोहचवले. या लाखो घरांपैकी एक होते संगीतकार हिमेश रेशमिया यांचे घर, त्यांना मोंडल यांचा आवाज भावला अन चक्क आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. अन हे गाणेसुद्धा लोकांनी हातोहात उचलले.

राणू मोंडल यांच्या गाण्यावर गानकोकिळा लता मंगेशकर यांनी एक टिप्पणी केली होती (याला सल्ला म्हणावा कि टीका हे प्रत्येकाने ज्याचे त्याचे ठरवावे). त्यांनी म्हटले होते कि “मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचे भले झाले तर मी स्वतःला भाग्यवान समजते. पण नक्कल करुन मिळणारी प्रसिद्धी दीर्घकाळ टिकत नाही”

सोशल मीडियावर लतादीदींचे गाणे म्हणून प्रसिद्ध झालेल्या रानू मंडल यांच ‘तेरी मेरी कहानी’ गाण प्रदर्शित झाले यावेळी बोलताना मोंडल यांनी लता मंगेशकर यांच्या टिप्पणीवर मत प्रदर्शित केले. यावेळी त्या म्हणाल्या कि

“मी कधीही कोणाच्या आवाजाची नक्कल केली नाही. मी माझ्याच आवाजात गाणे गायले आहे.” यावेळी हिमेश रेशमिया म्हणाले कि, “लता मंगेशकर या खुप मोठ्या गायिका आहेत. त्यांच गाण ऐकून लाखो लोकांना गायक होण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल पण ते सगळेच कोणाची नक्कल करतात असे म्हणता येणार नाही.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

या हिरोइन्सनी करियरसाठी लपवले होते आपले लग्न.. ही तर अवघ्या १७व्या वर्षी चढली बोहल्यावर !

बॉलिवूड स्टार्स चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहणे पसंत करतात आणि बरेच सितारे आपला जिव्हाळ्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 4 =