Breaking News
Home / देश अन राजकारण / “शाबास महिंद्रा, यापूर्वी मला तुमचा इतका अभिमान कधीही वाटला नवता”

“शाबास महिंद्रा, यापूर्वी मला तुमचा इतका अभिमान कधीही वाटला नवता”

जागतिक महामारी असणाऱ्या करोना व्हायरसचं देशावरील संकट सातत्याने वाढत आहे. अन आता भारतातही हातपाय पसरायला त्याने सुरुवात केली आहे. आजपर्यंत 500 हून अधिक लोक या रोगाने बाधित झाले आहेत अन दिवसागणिक व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार अन केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्याच्या सिमेसहीत आता जिल्याच्या सीमा बंद केल्या आहेत. आजपासून विमासेवासुद्धा बंद करण्यात येत आहे. भारतात करोना संकट तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असून. जर भारतात हे संकट पुढच्या टप्प्यावर पोचले तर आरोग्य सेवेवर खूप मोठा ताण पडेल अशा परिस्थितीत अनेक मोठे लोक पुढे येत आहेत. या करोना संकटावर मात करण्यासाठी मदतीची तयारी दाखवणारे उद्योगपती म्हणून आनंद महिंद्रा सुद्धासमोर आले आहेत.

anand mahindra on coronavirus

म​हिंद्रा अँड महिंद्रा चे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी करोना संकटावर चिंता व्यक्त करताना व्हेंटिलेटर्स बनवण्यापासून, Mahindra Holidays चे रिसॉर्ट्स देण्याची तयारी दाखवली आहे. सोबतच ते स्वतःचं १०० टक्के वेतनही मदत म्हणून देणार असल्याचं त्यांनी सांगितलाय. आनंद महिंद्रा यांनी याबाबत रविवारी सलग पाच ट्विट करुन याबद्दल माहिती दिली.

“तज्ज्ञांनुसार भारत करोना संकटाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलाय किंवा तिसऱ्या टप्प्याच्या अगदी दारात उभा आहे…त्यामुळे करोनाग्रस्तांच्या संख्येत काही पटीने वाढ होण्याची शक्यता आहे…काही आठवडे लॉकडाउन हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरील दबावही थोडा कमी होईल. पण, आपल्याला अजून बरीच तात्पुरती रुग्णालये तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे व्हेंटिलेटरची कमतरता आहे…. त्यामुळे आमच्या उत्पादन सुविधांद्वारे व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी काय करावं लागेल यावर महिंद्रा ग्रुप तातडीने काम सुरु करेल. सोबतच आम्ही तात्पुरती काळजी सुविधा केंद्र म्हणून आमच्या महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्ट्स सरकारला देण्यास तयार आहोत. महिंद्राची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासनास / सैन्यदलास मदत करण्यास तयार आहे. सोबतच  आम्ही करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असून, त्यात मी माझे १०० टक्के वेतन मदत म्हणून देईल, सोबतच आम्ही आमच्या सहयोगींनाही या निधीमध्ये स्वेच्छेने योगदान देण्यास प्रोत्साहित करू” अशा आशयाचे ट्विट महिंद्रा यांनी केले आहे.

Going by various reports from epidemiologists, it is highly likely that India is already in Stage 3 of transmission.
—Cases could rise exponentially with millions of casualties, putting a huge strain on medical infrastructure (1/5)

— anand mahindra (@anandmahindra) March 22, 2020

महिंद्रांच्या ट्विटनंतर थोड्याच वेळात ‘पेटीएम’च्या विजय शेखर यांनीही करोनाग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली. करोना संकटाविरोधात व्हेंटिलेटर्स आणि अन्य सुविधांसाठी पाच कोटी रुपये देत असल्याची त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली.

महिंद्राच्या या ट्वीटवर शशी थरूर यांनी कौतुकाची थाप दिली आहे. अन त्यांचे कौतुक करत म्हटले आहे कि, आपल्या देशाला अशाच दूरदृष्टी नेतृत्वाची गरज आहे अन मला यापूर्वी महिन्द्रांचा इतका अभिमान वाटला नवता जितका आता वाटतो आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

अबब !! या उमेदवाराइतकी संपत्ती इतर कुणाचीही नाही

भाजपने यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचे तिकिटे कापले, त्यापैकीच एक होते माजी मंत्री प्रकाश मेहता. माजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 2 =