Breaking News
Home / Uncategorized / मुलगी बनून गर्ल्स हॉस्टलमध्ये घुसला अन केल अस काही कि ….

मुलगी बनून गर्ल्स हॉस्टलमध्ये घुसला अन केल अस काही कि ….

दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स ! या कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात 12 सप्टेंबरला अस काही झाल आहे कि सगळेच अवाक झाले आहेत.

इंडिअन एक्सप्रेस च्या रिपोर्टनुसार १२ सप्टेंबर च्या दुपारी जवळपास १ ते २ होस्टेलच्या बहुतांश मुली मेसमध्ये होत्या. जेवणाची वेळ असल्याने फार कमी मुली होत्या ज्या आपापल्या रूममध्ये असतील. अशावेळी एक व्यक्ती मुलीचे कपडे घालून साधारणपणे दीड वाजता होस्टेलमध्ये घुसला अन २ वाजून १० मिनिट या वेळी बाहेर पडला. मुलींनी सांगितले कि तो पुरुष होता कि स्री हे नक्की सांगता येणार नाही पण CCTV फुटेज पाहिल्यावर लक्षात येते कि कुणीतरी पुरुष मुलीचे कपडे घालून होस्टेलमध्ये घुसला होता.

एकापाठोपाठ एक अशा अनेक खोल्यांमध्ये तो माणूस घुसला. अगदी आरामात तो होस्टेलमध्ये फिरत होता. एका रूममध्ये घुसल्यावर त्याने ती आतून बंद करून घेतली अन काही वेळाने बाहेर पडला. या खोलीमधल्या एका मुलीचे डेबिट कार्ड अन पैसे गायब झाले असे सांगितले जाते.

रिपोर्टनुसार ज्या खोलीतले पैसे अन कार्ड चोरीला गेले त्या मुलीला १२ सप्टेंबर च्या रात्री आढळून आले कि तिचे कार्ड सापडत नाहीये, तिने ते शोधण्याचा प्रयत्न केला. ते शोधात असतानाच तिला आढळले कि तिच्या कार्डमधून 2 ट्रांजेक्शन झालेत अन तब्बल 50 हजार रुपये काढले गेलेत. चोरी करणाऱ्याने २० हजार रुपये ATM मधून काढले होते तर एका स्टोरमधून 30 हजार रुपयांची खरेदी केली होती. सोबतच रूममधून त्याने जवळपास ३ हजार रुपयांची कॅश सुद्धा उडवली होती.

पोलिसांनी याबद्दल कम्प्लेंट घेतली आहे अन पुढील कारवाई होत आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

ritesh genelia fight

रितेश जेनेलिया कस भांडतात माहितीये ??

“तुझे मेरी कसम” चित्रपटातून ते एकत्र मोठ्या पडद्यावर आले अन त्यांची amazing केमिस्ट्री अवघ्या जगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × five =