Home / Uncategorized / चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे ‘हे’ काम.. शूटिंगसाठी मारली महिनाभराची दांडी तेव्हा सहकारी आले शोधत..

चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे ‘हे’ काम.. शूटिंगसाठी मारली महिनाभराची दांडी तेव्हा सहकारी आले शोधत..

अशोक सराफ हे नाव ज्या माणसाला माहिती नाही तो माणूस मराठी नाही असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही इतके प्रेम मराठी माणसांचे अशोक मामांवर आहे. मराठी हिंदी चित्रपटांमध्ये केलेल्या त्यांनी भूमिका तर अत्यंत लक्षवेधी. पण सिनेमात येण्याआधी आपले अशोक सराफ काय काम करायचे माहितीये का? तर आजचा लेख आपण अशोक सराफ यांच्या फिल्मी दुनियेच्या पल्याडच्या प्रवासावर लिहित आहोत.

अशोक सराफ साधारणपाने ७०च्या दशकात सिनेमात आले, फार अचूकपणे सांगायचे झाले तर बहुदा १९७४ हे त्यांचे मराठी सिनेसृष्टीतल्या पदार्पणाचे साल. त्याआधी त्यांनी अनेक कामे केली पण कोणत्याही एका कामावर ते स्थिरावले नाही. मग मात्र त्यांनी एका बँकेमध्ये नोकरी केली अन बराच काल ते तिथे स्थिरावले. काही वर्षे अशोक सराफ बँकेतल्या आपल्या नोकरीला चिटकून होते. पण अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. अनेकदा ते सुट्टी टाकून नाटकात काम करायचे, अनेकदा तर त्यांना आजारीपणाचा अभिनयही करावा लागला, एकदा तर म्हणे त्यांनी काही महिने आजारी असल्याचे सांगून सुट्टी घेतली होती, तेव्हा काळजीने सह कर्मचारी त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी ते कोल्हापूरला गेल्याचे सांगण्यात आले होते. असे असले तरी अशोक सराफ यांना सर्व सहकारी अतिशय सहकार्य करत असल्याचे सांगितले. मग मात्र त्यांनी हि दोन बोटींवरची सवारी सोडायचे ठरवले अन सराफ यांनी बँकेतील नोकरी सोडून देत पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरवले होते. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

Check Also

ऑक्सिजन लेव्हल राहील 100 च्या जवळपास, दम लागणार नाही, केवळ ही 2 पाने पुरेशी, जाणून घ्या उपाय

जग सध्या बदलते, अनेक गोष्टी आज पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. करोंना नंतरचे जग तर आमुलाग्र बदललेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *