Breaking News
Home / मनोरंजन / रामायणातील ‘राम’, ‘सीता’, ‘रावण’ आत्ता काय करतात माहितीये ??

रामायणातील ‘राम’, ‘सीता’, ‘रावण’ आत्ता काय करतात माहितीये ??

तब्बल ३३ वर्षानंतर रामानंद सागर यांचे ‘रामायण’ पुन्हा एकदा दूरदर्शन वर परत येत आहे. ३३ वर्षापूर्वी जेव्हा रामायण पहिल्यांदा दाखवले गेले तेव्हा अक्षरशः लोकांनी Lockdown पाळला होता. २७ मार्च ला सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक ट्वीट करून सांगितले कि दूरदर्शन वर पुन्हा रामायण प्रसारित होणार आहे.

जेव्हा रामायण चालू होते तेव्हा यातील कलाकारांना अभूतपूर्व प्रसिद्धी व लोकांचे प्रेम मिळाले होते. या मालिकेमध्ये देवतांच्या भूमिका करणाऱ्या लोकांच्या अक्षरशः प्रेक्षक पाया पडत, इतक्या अत्युच्च पातळीवर या मालिकेला प्रसिद्धी मिळाली, अशी प्रसिद्धी संपूर्ण जगात दुसऱ्या कोणत्या मालिकेला मिळाल्याचे अजून तरी ऐकीवतात नाही.

या पार्श्वभूमीवर व्हायरल महाराष्ट्र च्या टीम ने ठरवले आहे कि रामायणातील कलाकार काय करतात हे जाणून घेऊया.

अरुण गोविल (Arun Govil – Rama)

रामायणामध्ये रामाची भूमिका करणारे हे कलाकार. रामायणाआधी त्यांनी ‘विक्रम वेताळ’ या मालिकेमध्ये काम केले होते. जेव्हा ते पहिल्यांदा रामायण या मालिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना सुरवातीला नकार दिला गेला होता. पण नंतर त्यांना बोलावले गेले व रामाची भूमिका दिली गेली. १९७७ मध्ये ‘लव कुश नावाचा सिनेमा आला होता, या सिनेमामध्ये अरुण लक्ष्मण बनले होते. शेवटी २०१४ ला भोजपुरी फिल्म ‘बाबुल प्यारे’ मध्ये त्यांनी भूमिका केली होती.

Arun Govil - Rama

‘रामायण’ मधेच लक्षणाची भूमिका वठवणाऱ्या सुनील लाहिरी सोबत त्यांनी एक प्रोडक्शन हाउस पण टाकले होते, ज्या अंतर्गत ‘मशाल’ नावाशी एक मालिका सुद्धा निघाली होती. टीवीवर शेवटी ते कपिल शर्माच्या शो मध्ये पाहुणे म्हणून दिसले होते.

दीपिका चिखालिया (Dipika Chikhalia – Sita)

तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल पण दीपिका यांनी अभिनयाची सुरवात चक्क बी-ग्रेड चित्रपटामधून केली होती. ‘चीख’ व ‘रात के अंधेरे में’ अशा बी-ग्रेड सिनेमात त्या सुरुवातीला दिसल्या. त्यांनी देखील रामायणाच्या आधी ‘विक्रम वेताळ’ मालिकेत काम केले होते, याशिवाय ‘दादा-दादी कि कहानिया’ अशा शोजमध्ये सुद्धा त्या सहभागी होतुं. पण रामायणाने त्यांना प्रसिद्धीच्या सर्वाच्च बिंदूवर नेऊन बसवले, इतके कि त्यांनी १९९१ ला भाजप कडून बडोद्यामधून लोकसभा लढवली अन जिंकलीसुद्धा !

Dipika Chikhalia

पण त्यांचा पिंड हा राजकारणाचा नवता, म्हणून त्यांनी लवकरच त्यातून काढता पाय घेतला. हेमंत टोपीवाला नावाच्या एक औद्योगीकाबरोबर त्यांचे लग्न झाले. त्यांच्या नेलपोलिश बनवणाऱ्या कंपनीच्या त्या रिसर्च व मार्केटिंग हेड आहेत. पडद्यावर शेवटी त्या आयुषमान खुराना याच्या ‘बाला’ चित्रपटात यामी गौतम इच्या आई म्हणून दिसल्या.

सुनील लहरी (Sunil Lahiri – Lakshmana)

लक्ष्मणाचा रोल करणारे सुनील या-आधीच सागर आर्ट्स सोबत जोडले गेलेले होते. पण तरीही त्यांनाही लक्ष्मणाचा रोल अपघातानेच मिळाला कारण लक्ष्मणाचे काम करणाऱ्या कलाकाराने काम करण्यास नकार दिला. 1991 मधील ‘बहारों की मंज़िल’ चित्रपटात त्यांनी भूमिका केली. सिरीयल मधील रामासोबत त्यांनी एक प्रोडक्शन कंपनी सुरु केली. शेवटी ते पडद्यावर कपिल शर्मा sho मध्ये दिसले.

दारा सिंह (Dara Singh – Hanuman)

 रेस्लर व नावाजलेले कलाकार ज्यांना त्यांच्या शरीरामुळे हनुमानाचा रोल मिळाला होता. १९५२ मध्ये दिलीप कुमार यांच्या संगदिल मधून सुरवात करेपासून रामायणापर्यंत ते प्रसिद्ध कलाकार बनले होते. त्यांनी हिंदीसहित तमिल, तेलगु, मल्याळम भाषेतसुध काम केले. ‘लव-कुश’ या चित्रपटात ज्यामध्ये अरुण लक्ष्मण बनले होते तर जितेंद्र राम, या चित्रपटामध्ये सुद्धा दार हे हनुमान बनले होते.

त्यांनी राजकारणात सुद्धा नशीब आजमावले. १९९८ मध्ये भाजप मध्ये सामील होऊन 2003 पासून २००९ पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते. 2012 मध्ये त्यांचे निधन झाले.

अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi – Ravana)

राम झाला … लक्ष्मण झाला … सीता झाली… पण रामायण अधूर आहे ते रावणाशिवाय. तर रावणाचा रोल केला होता तो प्रसिद्ध गुजराती थिएटर अभिनेते उपेंद्र त्रिपाठी यांचे भाऊ अरविंद त्रिपाठी यांनी. ‘विक्रम और बेताल’ मधल्या अनेक कलाकारांना रामायणामध्ये भूमिका मिळाल्या होत्या अरविंद हेही त्यापैकीच एक. १९९१ मध्ये ते गुजरात मधील साबरकांठा मधून लोकसभा लढले अन खासदार झाले. हिंदी अन गुजराती मध्ये मिळून त्यांनी तब्बल 250 चित्रपटात काम केले. २००२ मध्ये त्यांना सेन्सर बोर्डाचा अध्यक्ष सुद्धा बनवण्यात आले होते. आज ते 80 वर्षाचे आहेत व म्हणूनच अभिनयापासून दूर झाले आहेत.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

“स्रीलिंग-पुल्लिंग” मधील बोल्ड सायली कोण आहे ?

अनेक नवनवीन अन तितकेच बोल्ड असे चेहरे सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहेत. अशाच अनेक फ्रेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × three =