Breaking News
Home / देश अन राजकारण / सर्वात तरुण सरपंचाला मिळणार विधानसभेचं तिकीट ?

सर्वात तरुण सरपंचाला मिळणार विधानसभेचं तिकीट ?

कुणी कितीही महिला सबलीकरण म्हणत असले तरी सर्वसामान्यपणे राजकारण हा पुरुषांचा आखाडा समजला जातो. महिला आरक्षण लागू झाल्यानंतरसुद्धा अनेक नेत्यांनी फक्त नावापुरत्या आपल्या घरातील स्रियांना राजकारणात आणले. एकेठिकाणी ही सर्वसाधारण परिस्थिती असताना देशात अन महाराष्ट्रात अनेक महिला राजकारणी आहेत ज्यांनी आपल्या नेतृत्वाची चमक समाजाला दाखवून दिलेली आहे. या महिलांना वगळून राज्याचे अथवा देशाचे राजकारण करताच येणे शक्य नाही.

खानदेशात एक गाव आहे, कल्यानेहोळ. उणीपुरी दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात २०१३ साली सरपंचकीची निवडणूक झाली अन ही निवडणूक अवघ्या १९ वर्षाच्या तरुणीने जिंकली. जळगावमध्ये E&TC इंजीनियरिंगची विद्यार्थिनी असणाऱ्या कल्पना पाटील ही चक्क धरणगावची सरपंच झाली. धरणगावच्या निवडून आलेल्या सदस्यांनी एकमताने कल्पना पाटील यांची सरपंचपदी निवड केली.

Kalpita Patil and Supriya Sule

कल्पना पाटील यांनीदेखील गावाची निवड सार्थ ठरवली अन विविध क्षेत्रात अत्यंत चांगले काम केले. अन गरज पडेल तिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला अन गावचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिले.

राष्ट्रवादीने त्यांच्यातले हे गुण हेरले अन त्यांना जळगाव जिल्हा युवती राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून नेमले. कल्पना पाटील यांनीदेखील या पदास योग्य असा न्याय दिला.

कल्पिता पाटील निवडणुकीच्या रिंगणात?

धरणगाव हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात येते, इथे शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे विद्यमान आमदार आहेत. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात कल्पना पाटील या उभ्या राहतील अशी मतदारसंघात चर्चा आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची ऐतिहासिक अशी पडझड होत असल्याने अन अनेक मात्तबर राष्ट्रवादी सोडून पक्षांतर करत असल्याने. या विधानसभा निवडणुकीला अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. अशातच जळगावमधून कल्पिता पाटील यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात युवा सरपंच म्हणून राज्य आज कल्पिता पाटील यांना ओळखते.

Youngest Sarpanch Maharashtra

त्यातच राजकीय परिस्थिती कल्पना पाटील यांच्या बाजूने झुकलेली आहे. जळगाव ग्रामीणमधून मागच्या वेळी गुलाबराव देवकर यांनी निवडणूक लढवली होती पण शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी 30 हजाराहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला होता. घरकुल घोटाळाप्रकरणी देवकर यांचे नाव पुढे आल्याने त्याचं नाव मागे पडलेले आहे अन आपसूकच कल्पिता पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातेय.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

अपक्ष उमेदवार रोहित पवारांचा अर्ज बाद

निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत अगदी अर्जही भरून झाले आहेत. अनेक उमेदवार आपल नशीब, काम, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − 6 =