मनोरंजन

आयुषमानच्या चष्म्यात दिसली Article 15 Movie ची स्टोरी !!

 आज आयुषमान खुराना यांच्या article १५ या चित्रपटाचा टीजर आला. भारताच्या संविधानात १५ नंबरला एक कलम आहे. समानतेचा अधिकार देणाऱ्या या कलम १५ नुसार… “धर्म, लिंग, वंश, जाती किंवा जन्मस्थळ या कोणत्याही आधारावर देश आपल्या नागरिकांशी भेदभाव नाही करणार असे या कलमाने सांगितले आहे.

तुम्ही पाहताय द व्हायरल महाराष्ट्र आम्ही अशाच प्रकारचे लेख तुमच्यासाठी घेऊन येत असतो तेव्हा आपल्या website वर नक्की भेट देत जा.

आयुषमान खुरानाच्या चित्रपटाच नावच सांगताय कि हा चित्रपट समानतेच उल्लंघन झाल असेल अशा एखाद्या सत्य घटनेवर आधारित असणार. काही दिवसांपूर्वी मिडियामध्ये अशी बातमीही आली होती कि आयुषमानचा येणारा चित्रपट हा २०१४ साली झालेल्या बदायु बलात्कार प्रकरन यावर आधारित असणार आहे.

आता आलेले चित्रपटाचे पोस्टर अन काल आलेल्या टीजरमध्ये आयुषमानच्या चष्म्याच्या रेफ्लेक्षणने या बातमीला पुष्टीच दिली आहे. आयुषमान च्या चष्म्यामध्ये दोन मुली झाडावर लटकताना दिसत आहेत. या दोन मुलींनी आत्महत्या केलेली स्पष्टपणे दिसत आहे.

२७ एप्रिल २०१४ मध्ये उत्तर प्रदेश मधल्या बदायु गावात एक घटना घडली, बदायुमधल्या सादातगंज गावात दोन दलित मुलींनी गेंगरेपमुळे फाशी घेऊन आत्महत्या केली. पिडीत कुटुंबांच्या मते असे गावातल्याच ५ मुलांनी केले होते. जेव्हा कुटुंब तक्रार करायला गेले तेव्हा पोलिसांनी तक्रार लिहायला सुद्धा काना-कूच केली. गावकऱ्यांनी त्यावेळचे सरकार आणी पोलीस यांच्याविरोधात आंदोलन केले. त्यानंतर कुठे सूत्र हलले अन मुलांना अटक केले गेले. नंतर हे प्रकरण CBI कडे सोपवले गेले होते.

२०१४ मध्ये हे प्रकरण आत्महत्येच सांगून बंद करण्यात आल. CBI च्या अनुसार यातील एका मुलीचं गावातल्याच एका मुलाशी अफेयर होतं. मुलगा वेगळ्या जातीचा होता. जेव्हा घरच्यांना या प्रकाराबद्दल माहिती मिळाली तेव्हा या दोन्ही मुलींनी घाबरून आत्महत्या केली.

संभवता या चित्रपटात आयुषमान खुराना एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल, जो या प्रकरणाच्या सत्याच्या मुळाशी पोचलेला असतो तरीही शेवटला काहीही करू शकत नाही. हा चित्रपट २८ जूनला रिलीज होणार आहेत.तुम्हाला काय वाटतय कशी असेल या चित्रपटाची कहाणी कमेंटमध्ये नक्की सांगा… आम्ही वाट पाहतोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button