Breaking News
Home / देश अन राजकारण / कधीकाळी सेल्फीसाठी वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्याने हरवले “सिंधिया” यांना

कधीकाळी सेल्फीसाठी वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्याने हरवले “सिंधिया” यांना

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल काल लागले, पण मध्यप्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वीच जिंकलेल्या कॉंग्रेसची जी नाचक्की झालीय ती सांगण कठीण आहे. इथल्या ग्वालेरजवळील गुना लोकसभेमध्येतर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अन मराठा साम्राज्याचे शिलेदार महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांना चक्क लाखांच्या लीडने हरवलं गेलंय…. अन हरवणारा माणूस काही दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होता

व्हायरल महाराष्ट्र मध्ये तुमच स्वागत आहे, असेच लेख वाचण्यासाठी फेसबुकवर आम्हाला like करा अन website वर आम्हाला subscribe करायला विसरू नका.

या निवडणुकांमध्ये सिंधियाहे उत्तर प्रदेशचे प्रभारी होते, म्हणून त्यांचा प्रचार हा त्यांच्या पत्नी प्रियदर्शनीराजे यांनी केला. भाजपने के.पी. यादव यांना तिकीट दिल. हे यादव सिंधिया यांचे सांसद प्रतिनिधी होते अन अवघ्या वर्षभरापूर्वीच ते भाजपमध्ये गेले होते.

निवडणुकीच्या धामधुमित प्रियदर्शिनी राजे यांनी एक फोटो ट्वीट केला होता, व लिहिले होते कधी राजेनसोबत सेल्फी काढण्याच्या रांगेमध्ये असणाऱ्या माणसाला भाजपने तिकीट दिल आहे. या फोटोत सरळसरळ दिसतंय कि यादव हे गाडीत बसलेल्या सिंधिया यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपडत आहेत.

पण सत्ता नेहमीच एका पारड्यात असेल अस काही नाही… ती प्रस्थापितांना वंचित बनवते तर कधी वंचितांना प्रस्थापित. शिवराजसिन्हांनी मागे एकदा यादव यांना बिभीषणाची उपमा दिली होती ज्याच्या साह्याने ते लंका जिंकतील. अन शिवराजसिंह चौहान यांच्या बिभीषणाने गुना जिंकली.

२००४ पासून यादव हे राजकारणात सक्रीय आहेत, अन सिंधिया यांच्या जवळच्या लोकांपैकी ते एक होते. पण मागे एक उप-निवडणुकीसाठी त्यांना आमदारकीच तिकीट लागत होत.. पण पक्षान त्यांना नाकारलं यादवांनी नाराज होऊन पक्ष सोडला. भाजपने त्यांना या मुन्गावली विधानसभेच तिकीट दिल पण संघर्षपूर्ण लढतीत कॉंग्रेसने इथ आपला वर्चस्व राखलं.

मग उजाडलं २०१९ च वर्ष भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारीच दिली, अन मग यादव यांनी तळागाळात पोचून चक्क सिंधिया यांनाच पराभूत केल.सर्वसामान्य माणसामध्ये एक असामान्य अशी ताकद असते, कधीकाळी सिंधियायांच्यासोबतच्या सेल्फीसाठी लाईन मध्ये असणाऱ्या यादव यांचा विजय नक्कीच राजकारण्यांना चांगल उत्तर असेल.

कसा वाटला एपिसोड कमेंट मध्ये नक्की सांगा, अन आम्हाला subscribe करायला विसरू नका.

Content Protection by DMCA.com

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + twenty =