Categories: Uncategorized

जगातली सर्वात मोठी प्रोपर्टी डील – निम्म्या भारताइतकी जमीन विकली !!

बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती होते तेव्हा ते Man Vs Wild कार्यक्रमात आले होते. निसर्ग विरुद्ध मानव अशी ही या कार्यक्रमाची थीम होती. या कार्यक्रमात ते अलास्काच्या थंडगार जंगलात होते. अगदी विरळ लोकवस्ती असणारा अन गोठवणाऱ्या थंडीचा प्रदेश म्हणजे अलास्का !! पण तुम्हाला माहितीये का हा अलास्का अमेरीकेच राज्य नवत… तर हे अमरीकेचा प्रतिस्पर्धी किंवा कट्टर दुश्मन रशियाचं राज्य होत.

व्हायरल महाराष्ट्र तुमच्यासाठी खास अलास्काची गोष्ट घेऊन आलय, अशाच माहितीपर लेखांसाठी वाचत रहा व्हायरल महाराष्ट्र.

जर आपण काश्मीरला भारताचा स्वर्ग म्हणतो अगदी तसच कधीकाळी रशियन लोक अलास्काला रशियाचं स्वर्ग म्हणायचे. पण रशियाचा स्वर्ग आज अमेरिकेचा भाग आहे. अन हे राज्य रशियाकडून अमेरिकेने विकत घेतले आहे. 30 मार्च 1867 ला अमेरिकेने सेव्हियत यूनियनकडून अलास्का प्रांत खरेदी केला होता. तुम्हाला कदाचित हे ऐकून नवल वाटेल कि रशियाने आपल हे स्वर्ग किती रुपयांना विकले अमेरिकेने अलास्का प्रांत केवळ 72 लाख डॉलर (45 कोटी 81 लाख रुपये) मध्ये खरेदी केला.

अलास्कामध्ये भरपूर तेल साठे, हिऱ्या अन सोन्याच्या खाणी असल्यामुळे आता रशियाच एकेकाळच स्वर्ग आज अमेरिकेचा ‘खजाना’ बनले आहे. रशियन लोकांना आज या व्यवहाराच खूप पश्चाताप होतो.

कशी झाली अलास्काची खरेदी-विक्री

पहिल्यांदा अलास्का विकण्याचा विचार झार साम्राज्याचे तेव्हाचे परराष्ट्रमंत्री अलेक्जेंडर मिखाइलोविच गोर्काकोव यांच्या मनात आला. इतिहासकार सांगतात कि, अमेरिकेचे तत्कालीन प्रेसिडेंट अॅंड्यू जॉन्सन यांनीच गोर्काकोव याचं मन या खरेदीसाठी वळवल होत. क्रिमीया युद्धानंतर तशी रशियाची आर्थिक परिस्थितीही बिकट होती. त्यामुळे रशियाचे जार अलेक्जेंडर-II यांनी कोणतेही आढेवेढे न घेता अलास्का विकायला परवानगी दिली.

रशियाची जनता याच्या विरोधात होती पण तेव्हा थोडी ना लोकशाही होती. झार राजा अलेक्जेंडरने 30 मार्च 1867 रोजी अलास्का विकण्याच्या करारावर सह्या केल्या अन अलास्का विकून मोकळा झाला. पण रशियन लोक अजूनही अलास्काला विसरले नाहीत

चार पाच वर्षापूर्वी जेव्हा रशियाने क्रिमियावर ताबा मिळवला होता. तेव्हा रशियातला एक प्रसिद्ध गायक निकोलेए व्याचेस्लावोविच याने एका गाण्यामधून रशियन माणसाची खदखद गायली होती. या गाण्यामध्ये तो म्हणतो लवकरच व्लादिमिर पुतिन अमेरिकेकडून अलास्का हिसकावून घेतील.

का विकला होता अलास्का ??

त्यावेळी आशियामध्ये रशिया विरुद्ध ब्रिटन असा सत्तासंघर्ष होता. दोन्ही महासत्ता एकमेकांना दबकून असत. क्रिमियन युद्धानंतर रशियाची आर्थिक स्थिती कमजोर झाली होती रशियन साम्राज्याला अस वाटायला लागलं कि ब्रिटन या संधीचा फायदा घेऊन आक्रमण करेल. (अर्थात अशीच भीती नेहमी इंग्लंडलाही वाटत होती, भारतीय इतिहासात अन अफगान युद्धात याचे खंडीभर पुरावे सापडतात). अलास्का तर दूर अन अलास्का झरला तो फार काही महत्त्वाचा वाटतही नव्हता.

सोबतच अलास्का इतका मोठा आहे कि त्याच रक्षण करणे कमालीच अवघड त्यामुळे इथे शक्ती वाया घालवणे झारला व्यावहारिक वाटले नसावे.

अलास्कामुळेच मारला गेला झार

रशियन इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, जारच्या मृत्यूचे खरे कारण अलास्का हेच होते. कारण अलास्का विकाल्यानंतर त्याच्यावर तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले. मात्र प्रत्येकवेळी तो बचावला. पण शेवटी 13 मार्च, 1981 च्या दिवशी त्याच्या सेंट पीटर्सबर्गमधील विंटर पॅलेसमध्ये ईवान एमेल्यानोव नावाचा माणूस घुसला अन त्याने बॉम्ब फेकून झारचा जीव घेतला.

अलास्कातून अमेरिकेचा खजाना

सुमारे 1,717,856 किमी परिघात पसरलेला अलास्का प्रांत अमेरिकेला एखाद्या खजान्यापेक्षा कमी नाही. येथे मोठ्या प्रमाणात नॅचरल गॅस आणि पेट्रोलियम पदार्थ आहेत. येथे अनेक ऑईल फॅक्ट्रीज आहेत. फक्त अलास्कामधून अमेरिकेला देशाच्या गरजेच्या 20 टक्के पेट्रोल मिळते. हे काय कमी होते कि 50 च्या दशकात अमेरिकेला अलास्कात हिऱ्या अन सोन्याच्या खाणीचा शोध लावला. शिवाय पर्यटकांना सुद्धा अलास्का नंदनवन आहे दरवर्षी लाखोच्या संख्येने टूरिस्ट इथ येतात.

admin

Leave a Comment

Recent Posts

‘दर्द काफी हे …’ सुशांतबरोबर शेवटपर्यंत काम केलेल्या संजनाने शेवटी शेयर केल्या भावना

सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने संपूर्ण हिंदी सेनेमा हादरला आहे. अचानक आपल्यातून निघून जाणं सर्वांसाठीच धक्कादायक…

1 week ago

वर्षा उसगावकर यांचा टॉपलेस फोटोशूटचा किस्सा !!

90 च्या दशकात आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री…

3 weeks ago

या देशाने सर्वात आधी हरवलं कोरोनाला.. शाळा, दुकाने, कॅफे, हॉटेल सगळ काही उघडले

दुनियेतले तब्बल २१० देश आता कोरोनासोबत लढत आहेत. पण आलेल्या बातमीनुसार जगात एक असा देश…

2 months ago

दिव्यंका त्रिपाठी मुलाखत – दिव्यांकाचा नवरा दाढी ठेवत नाही कारण ..

छोट्या पडद्यावरची सिरीयल 'ये है मोहब्बतें' मधील रमण भल्लाच्या पत्नीची भूमिका करणारी नटी दिव्यंका त्रिपाठी…

3 months ago

बॉलीवूड मध्ये प्रमुख खलनायक अन त्यांचे कुटुंब

बॉलीवुड मध्ये अनेक असे मोठे कलाकार आहेत ज्यांनी अनेक सुंदर अशा भूमिका साकारलेल्या आहेत. अनेक…

3 months ago

कोरोना व्हायरस आणि प्लास्मा उपचारपद्धती

कोरोनामुळे हैराण झालेल्या जगाला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. यामुळे कोरोनावरच्या उपचार पद्धतीत क्रांतिकारी बदल…

3 months ago