Categories: Uncategorized

जेव्हा 20 हजाराची फौज मुठभर मावळ्यांनी हरवली ! शिवाजी महाराज व उंबरखिंडीची लढाई

नमस्कार मित्रांनो, तस पहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण खूप ऐकलय…पण तरीही महाराजांच्या काही अशा लढाया आहेत ज्या अजूनही सर्वसामान्य मनासापर्यंत पोहचल्या नाहीत, आज अशाच एका लढाईबाबत आपण जाणून घेणार आहोत… यावर्षी या लढाईला ३५० वर्ष पूर्ण झालेत …

तुम्हाला सिद्धी जौहरचा पन्हाळगडाचा वेढा तर माहितीच असेल, तर महाराज या पन्हाळगडच्या वेढ्यात गुंतलेले असताना मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार, शायिस्तेखानसुद्धा स्वराज्यावर चाल करून आला… दोन बलाढ्य माजलेले हत्ती स्वराज्याच्या अंगावर धावून आले होते…!! दोघांनाही एकाचवेळी अंगावर घेणे हे शहाणपणाचे नवते, अन तेवढा फौजफाटा, सैन्यही आपल्याकड नवते.

वरकरणी आदिलशहाचा नोकर असणारा सिद्धी पण तस पहिले तर सिद्धी हा नेहमीच आदिलशहाशी एकनिष्ठ राहिलेला नवता, त्याने मागे बऱ्याचदा आदिलशाहीविरुद्ध तलवार उपसलेली होती. म्हणूनच काय तो आदिलशहाच्या मनात जौहरविषयी अढी होती… अन याच अढीचा वापर चाणाक्ष राजांनी करून घ्यायचं ठरवलं. आदिलशाहाच्या मनात असलेल्या या संशयाला अधिक बळकटी आणणाऱ्या बातम्या राजान्नी गुप्तहेरांमार्फत पेरायला सुरुवात केली.

यातलीच एक बातमी होती… राजे पन्हाळ्याच्या वेढय़ातून सुटले कारण जौहर राजांना फितुर होता.

जशाजशा जास्त प्रमाणात या अफवा विजापूरपर्यंत पोचायला लागल्या तशी तशी अढी बळावली अन मग आदिलशाहा अन जौहरमधे फूट पडली. या साऱ्या राजकारणाचा परिणाम म्हणजे पुढे चालून आदिलशाहाने विषप्रयोगाने जौहरचा खून केला. 

अर्थात स्वराज्याच्या अंगावर धावून आलेला एका हत्तीला त्याच्याच माहुताने अस्मान दाखवल…!! पण दुसऱ्या हत्तीच काय …??

९ मे १६६० रोजी शायीस्तेखान पुण्यास पोहोचला. पुण्यात आल्यावर त्याने इस्माइल खानला तीन हजार स्वारांसह तळकोकणावर पाठवले व स्वत: चाकणची गढी घेण्यास गेला. चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळ्याने गढी तब्बल पंचावन्न दिवस लढवली. दरम्यान मोगलांनी आदिलशहाचा पिरडा किल्ला घेतला. यामुळे मोगल अन आदिलशाही यांच्यात बिनसलं अन त्यामुळ निदान आदिलशाही तरी शांत बसली.

पिरडा जिंकल्यावर शाहिस्तेखानाने कारतलबला कोकणवर स्वारी करायला पाठवले. खानाने आपल्या स्वारीचा मार्ग अत्यंत गुप्त ठेवला होता. खानाने तो बोरघाट मार्गाने उतरणार अशी हूल उठवून दिली. पण राजांचे हेरखाते किती सक्षम आहे याचा अनुभव अजून खानाला यायचा होता.
राजांनी पेणच्या अवतीभवती आपले सैन्य जमवायला सुरुवात केल्याची बातमी खानाकडे आली. खानाचा प्रवास बोरघाटमार्गेच सुरू झाला, पण अचानक लोणावळ्याकडे न जाता तो थोडासा दक्षिणेकडे वळला. राजांपर्यत खानाचा बदललेला मार्ग पोहोचला. हा सारा दाट जंगलाचा प्रदेश. खान कुरवंडा घाटात एक फेब्रुवारीला पोहोचला. खरतर राजांचे सैन्यही एक तारखेलाच कुरवंडा घाटातील जंगलात शिरले होते. खानाच्या टेहळणीपथकाने मार्ग निर्धोक असल्याची ग्वाही दिली. राजांना खानाचा बदललेला मार्ग कळायच्या आत खानाने कुरवंडा घाटातून उतरून राजांच्या सैन्यावर हल्ला करण्याची योजना ठरली. खान कुरवंडा घाटातून उतरणार ही हल्ल्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट होती. कुरवंडा घाटातून अंदाजे दोन मैलावर चावनी नावाचे गाव आहे. इथून पुढचा मार्ग अत्यंत उताराचा आणि अगदी चिंचोळा. म्हणजे एका वेळी एकच माणूस अशा प्रकारे ‘एककतार’मध्ये जावे लागेल असा मार्ग. राजांनी या नैसर्गिक स्थितीचा फायदा उठवला. चावनीपुढे आल्यावर नदीच्या वळणापाशी चढाव चढून अर्धापाऊण मैलावर उंबरे गाव आहे. चावनी ते उंबरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे म्हणून तिला उंबरखिंड म्हणतात.

एक फेब्रुवारीला राजांनी सायंकाळपर्यंत आपले सैन्य उंबरखिंडीत मोक्याच्या जागी पेरले. सैन्याकडे तलवारी, धनुष्यबाण, बंदुका व मुबलक दगड-गोटे होते. राजे स्वत: खिंडीच्या तोंडावर असणाऱ्या टेकडीवर सज्ज झाले. खानाच्या सैन्याने घाटमाथा सोडला. खान पुढे सरकला की मागून त्याच्या नकळत त्याची कोंडी करत यायचे, असा बेत ठरला. मोगली परंपरेनुसार खानाच्या सैन्याचा पसारा खूप मोठा होता. या चिंचोळ्या मार्गातून जाताना त्यांची पुरी दमछाक होत होती. साधारण अकरा वाजेपर्यंत सैन्य चावनीपाशी आले. थोडी विश्रांती घेऊन पुढचा प्रवास सुरू झाला. आता सूर्य तळपत होता. वाटेत पाण्याचे दुर्भिक्ष आणि अचानक कर्णे वाजू लागले. खानाचे सैन्य व घोडे थबकले. काय झाले ते कळायच्या आत ‘हर हर महादेव’ची गर्जना खिंडीत घुमली आणि हल्ला झाला. मराठे कुठून मारा करताहेत तेच कळत नव्हते. खानाच्या सैन्याने मागे पळायचा प्रयत्न केला, पण मागची वाटही अडवली गेल्याचे आता लक्षात आले. मराठय़ांचा रणवेश भयंकर होता. सारी परिस्थिती पाहता कारतलबखानाबरोबर असलेल्या रायबागन या शूर महिला सरदाराने खानाला शरण जाण्याचा सल्ला दिला. शेवटी कारतलबने आपला दूत राजांकडे पाठवला.

कारतलबला अभय दिले. आपली सारी साधन संपत्ती आहे तिथेच सोडून कारतलबने निघून जावे. त्याच्या सैन्यातील स्थानिक लोकांना राजांकडे यायचे असेल तर त्यांना तशी अनुकूलता दर्शवावी यांसारख्या अटी खानापुढे ठेवल्या गेल्या. सगळ्याच्या सगळ्या अटी मान्य करण्याशिवाय खानापुढे पर्याय नव्हता.
राजांनी युद्ध थांबवण्याचे आदेश दिले. कुरवंडय़ाला घाट चढून आल्यावर सैन्याकडे काही चीजवस्तू नाही ना याचा तपास करून साऱ्या सैन्याला जाऊ दिले. उरलेला सारा दिवस राजांचे सैन्य खानाच्या सैन्याची शस्त्रे, उत्तम वस्त्रे, डेरे-तंबू यांचे सामान, दागिने, घोडे, बैल इत्यादी प्राणी अशा गोष्टी शांतपणे गोळा करत होते.
या साऱ्या लढाईतून राजांचे हेरखाते किती सक्षम आहे, याचे पुन्हा एकदा प्रदर्शन झाले. वेगवान व सुनियोजित हालचालींनी अत्यंत कमी सैन्यबल असतानासुद्धा वीस हजार सैन्याचा संपूर्ण पराभव राजांनी केवळ हजारभर सैन्याच्या साहाय्याने केला. शिवाय प्रचंड संपत्ती व मनुष्यबळ प्राप्त केले.

तुमच्या कमेंटमधून तुम्हाला काय वाटत या प्रसंगाविषयी ते कळवा.

admin

Recent Posts

खरच नेहरूंचे आजोबा गयाजूद्दीन गाजी होते का ???

१८ व शतक चालू होत, अन भारतावर मुघलांच शासन चालू होत. औरंगजेब गेल्यानंतर मुघल साम्राज्य आपल्या शेवटच्या घटका मोजण्यासाठी अजून…

6 days ago

हे आहेत, जगातील सर्वात मादक पुरुष !! Sexiest Man Alive

जगामध्ये असे अनेक स्वयंघोषित पुरुष असतील जे स्वतःला जगातला सर्वात मादक पुरुष समजत असतील. पण अलीकडेच प्रसिद्ध मासिक पिपल यांनी…

1 week ago

मंदिर नवे ट्रस्ट बनवणार !! तर विहिप ने कोरलेल्या शिलांचे काय होणार ?

9 नोवेंबर २०१४ ला सुप्रीम कोर्टाने अयोध्येच्या विवादित जागे बाबतीत ऐतिहासिक निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने सरकारला सांगितले कि तीन महिन्यांमध्ये…

1 week ago

‘लालबाग परळ’ चित्रपटातली मामी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दुसरा नवरा आहे कॉमेडी स्टार

'लालबाग परळ' मधील मामी. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हा कदाचित मुंबईच्या इतिहासातील एक मैलाचा दगड असेल. काही वर्षांपूर्वी यावर एक…

2 weeks ago

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला

उस्मानाबादचे(धाराशिव) शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका माथेफिरूने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक कळंब येथे घटना घडलीय. कळंब तालुक्यात पडोळीमधील नायगाव…

1 month ago

नरेंद्र मोदींनी “कचरा उचलतानाचा फोटोशूट” केला का ?

१२ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी महाबलीपुरम(दुसर नाव मामल्लापुरम) येथे होते. सकाळी सकाळी नरेंद्र मोदींचा…

1 month ago