Breaking News
Home / Uncategorized / ट्रम्प यांनी लावली अमेरिकेत आणीबाणी | काय आहे प्रकरण

ट्रम्प यांनी लावली अमेरिकेत आणीबाणी | काय आहे प्रकरण

एक बातमी आली आहे, कि अमेरिकेमध्ये ‘नेशनल इमरजेंसी’ लागू केली गेली आहे. internet वर यासामंधी वेगवेगळ्या चर्चांना उधान आल आहे. काही लोक तर यापुढे जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना इंदिरा गांधींसोबत करू पाहतायेत. पण खरतर अमेरिकेत लागू केली गेलेली इमर्जन्सी भारतात लागू केल्या गेलेल्या आणीबाणीपेक्षा अगदीच निराळी आहे. भारतात आणीबाणीदरम्यान मुलभूत हक्कांना suspend केले गेले होते पण अमेरिकेत अस काहीही झाल नाही.

अमरिका आपल्या कंपूटर नेटवर्क ला विदेशी अन खासकरून चीनी हैकर्सपासून वाचवायला पाहतेय अन त्याचसाठी ही आणीबाणी लागू केली गेलीय.

कशी असेल ही आणीबाणी?

व्हाइट हाउस च्या प्रेस सचिव सारा सैंडर्सने सांगितलं आहे त्यानुसार या आणीबाणीने

1-अमेरिकेच्या टेलीकॉम कंपन्यांना काही विशेष विदेशी टेलीकॉम सप्लायर सोबत बिजनेस करण्यापासून थांबवलं जाईल.

2-अमेरिकेची इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी च्या सुरक्षेसाठी हे पूल उचललं गेलेलं आहे

3-अमेरिकेच सूचना व दूरसंचार क्षेत्र यांना हैकर पासून वाचवणे हे याचा मुल उद्देश आहे.

 4- आता अमेरिकी व्यापार मंत्रालयाला जोखीमेच्या लेन-देन व्यापाराला बैन करण्याचा अधिकार मिळाला आहे.

5-अस करण्याने अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अमेरिकी राष्ट्रपतीच्या हातात प्रामुख्याने आला आहे.

नक्की का लावली गेली आणीबाणी ?

आपल्या सगळ्यालाच माहितीये कि व्यापाराच्या दुनियेत अमेरिका अन चीन एक युद्धात आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने चीनच्या टेलिकॉम जायंट हुवावे च्या किस्स्याने हे युद्ध जगजाहीर झाला. अमेरिकेसोबत जवळपास सगळेच देश चीनच्या कंपन्यांवर हेरगिरीचा आरोप लावत आहेत.

मिडिया काय म्हणतीय

1- डोनाल्ड ट्रम्प या आणीबाणीचा उपयोग हुवावे कंपनीविरुद्ध करणार.

2- ट्रंप प्रशासन याने दुनियेला एक संदेश देतय ते म्हणजे, हुवावे ज्याच्याकडे सर्वाधिक प्रगत 5G तंत्रज्ञान आहे तीच 5जी तंत्रज्ञान कुणी उपयोग करू नये.

 3- ट्रंप, इमरजेंसी च्या बहाण्याने अमेरिकेच्या कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायेत

4- अमेरिकी फेडरल कम्युनिकेशन कमीशनचे चेयरमैन अजीत पाई यांनी याला एक चांगली सुरवात म्हटले आहे.

 5- अमेरिका सरकारी तंत्र यामध्ये हुवावे वर बंदी आली आहे.

 6- ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड ने सुद्धा आता 5जी नेटवर्क साठी हुवावे चे उपकरण वापरान निषिद्ध केले आहे.

 7- आता अमेरिकी कंपनियां विदेशी टेलीकॉम सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत..

8- आता चीनी कंपन्यांना अमेरिकेमध्ये व्यवसाय करणे खूप अवघड बनेल.

9- अमेरिकेची कोणतीही कंपनी ब्यूरो ऑफ इंडस्ट्री एंड सिक्योरिटी BIS च्या परवानगी शिवाय हुवावेला तंत्रज्ञान ट्रांसफर करू नाही शकणार.

10– हुवावे आपल्या अनेक गोष्टींसाठी आपल्या अमेरिकी सप्लायर वर निर्भर होती आता हा कारोबार त्यांना खूप अवघड होईल.

हुवावे ची प्रतिक्रिया काय आहे यावर?

जगातली तिसरी सर्वात मोठी मोबाईल फोन निर्माती कंपनी हुवावेने याआधीसुद्धा अनेकदा त्यांच्यावर लागलेल्या आरोपांना नाकारले आहे. आपल्या उपकरणाच्या वापरात हेरगिरीचा कोणताही धोका नाही असा त्यांचा दावा आहे. ते अमेरिकी नेटवर्क्सला कोणताही धोका करत नाहीयेत कंपनी संपूर्णपणे स्वायत्त आहे अन चीनी सरकारचा अन कंपनीचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. अन आम्हाला ब्यान करण्याने अमेरिकेचा नेटवर्क मजबूत होणार नाही उलट अमेरिकेला महागडे पर्याय शोधावे लागतील.

याआधी सुद्धा लावली होती ट्रम्प ने इमरजेंसी

अमेरिकी राष्ट्रपति डॉनल्ड ट्रंप यांनी  2018 मध्ये सुद्धा आणीबाणी लावली होती. मैक्सिको च्या 200 मील सीमेवर ट्रंप यांनी भिंत बांधायचा निर्णय घेतला होता या निर्णयाला संसदेचा विरोध होता. तेव्हा आणीबाणीची घोषणा करत ट्रम्प यांनी संसदेला या निर्णयात बाजूला सारण्याची शक्ती त्यांनी मिळवली अन भिंतीच्या खर्चाची तरतूद त्यांना करता आली.

अमेरितेली इमरजेंसी

1976 ला तयार केलेला एक कायदा राष्ट्रपतीला आणीबाणी लावण्याचा अधिकार देतो. ट्रम्पच्या आधी २००९ मध्ये स्वाईन फ्लू विरोधात ओबामांनी आणीबाणी जाहीर केली होती. ९/११ च्या वेळ बुश यांनी आणीबाणी घोषित केली होती. याआधी जवळपास ३१ वेळा अमेरिकेत आणीबाणी जाहीत झालेली आहे. आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती काही खास अधिकारांचा वापर करतात जे साधारण परिस्थितीत संसदेच्या अधीन असतात.

लेखाबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर कळवा अन वाचत राहा ‘व्हायरल महाराष्ट्र”

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

पोलिसांनी चालान कापले, म्हणून चक्क गाडीच पेटवून दिल्ली

नव्या दिल्लीचा त्रिवेणी कॉम्प्लेक्स, राकेश नावाचा एक तरुण गाडीवरून चालला होता. ड्युटीवर असलेल्या पोलिसाने त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + 3 =