Breaking News
Home / Uncategorized / मावळ्याने केले अस काही.. कि प्रत्येक मराठी माणसाचा ऊर भरून येयील….

मावळ्याने केले अस काही.. कि प्रत्येक मराठी माणसाचा ऊर भरून येयील….

शिवाजी महाराज !! हे नुसत नाव जरी घेतल तर मराठी माणसाच रक्त उकळायला लागत. या नावातून अनन्यसाधारण शक्ती घेऊन मराठी माणूस आजही हिमालायाशीही टक्कर घेण्याच सामर्थ्य ठेवतो. महाराजांना फक्त महाराष्ट्रच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात… अगदी सातासमुद्रापारसुद्धा वंदनीय मानले जाते. भारताच्या बाहेरही त्यांच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

अगदी कालपरवा एक घटना घडली, जीने दाखवून दिले कि महाराष्ट्र अन मराठी माणूस महाराजांना किती मानतो ते. आफ्रिकेच्या जवळच्या समुद्रात मॉरिशस नावाचा देश आहे. उच्चभ्रू भारतीयांसाठी हा देश म्हणजे एक पर्यटनस्थळ..!!

या मॉरीशस मध्ये संगमनेरचे डॉ प्रवीणकुमार पानसरे फिरायला गेले होते तेव्हा त्यांना तिथे महाराजांचा पुतळा दिसला. पानसरे यांनी तो साफ करून हार अर्पण केला.

हा साफ करतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पानसरे हे नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये जनरल सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतात.

या महिन्यात ते त्यांची पत्नी डॉ दीपाली आणि तीन मुलांसोबत मॉरिशसला  फिरायला गेले होते. तिथे कॅसेला प्राणिसंग्रहालय आणि पक्षी अभयारण्य फिरून झाल्यावर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांना एक पुतळा दिसला पण हा पुतळा महाराजांचा आहे कि नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. तेव्हा परतीच्या वेळी त्यांनी चालकाला या ठिकाणी थांबण्याची विनंती केली.

परतीच्या वेळी जेव्हा चालक थांबला तेव्हा त्यांना तो महाराजांचा पुतळा पाहून अत्यानंद झाला. पण जवळ गेल्यावर त्यांना जाणवलं कि पुतळ्याची कित्येक दिवस काळजी घेतलेली नाही अन धूळ आणि जळमटे पुतळ्यावर ठीकठिकाणी आहेत.

हे पाहिल्यावर त्यांनी तो त्वरित साफ करायला घेतला. जवळच असलेल्या पाण्याने त्यांनी महाराजांना स्नान घातले अन ठीकठिकाणाची जळमटे काढून टाकली. यावेळी त्यांच्या चिमुरड्या मुलींनीही त्यांना मदत केली. साफसफाई झाल्यानंतर त्यांनी पुतळ्याला अभिषेक केला अन फुलांचा हार घातला. यावेळी त्यांनी महाराजांचा विजय असो अशा घोषणाही दिल्या. त्यांचा हाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

लाखोच्या गर्दीत राजकारणी करतात त्यापेक्षा निश्चितच त्यांनी केलेला हा अभिषेक अत्यंत पवित्र होता.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

ritesh genelia fight

रितेश जेनेलिया कस भांडतात माहितीये ??

“तुझे मेरी कसम” चित्रपटातून ते एकत्र मोठ्या पडद्यावर आले अन त्यांची amazing केमिस्ट्री अवघ्या जगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + 9 =