Categories: Interesting

या उमेदवाराने केले चक्क ‘पोर्न हब’ वर निवडणुकीची जाहिरात

विचार करा जर तुम्ही एखादी पॉर्न साइट उघडली अन चक्क तुम्हाला एकादी सामाजिक जाहिरात दिसायला लागली. अन हे साधीसुधी जाहिरात नसली अन चक्क एखादी राजकीय जाहिरात असली तर ?? युट्युब अन फेसबुकवर सर्रास दिसणाऱ्या राजकीय जाहिरातींसारखी जाहिरात तुम्हाला adult site वर दिसली तर….!!

ही फक्त कल्पना नाहीये अशा पद्धतीचा प्रचार युरोपच्या एका देशात झालेला सुद्धा आहे अन तो कमालीचा यशस्वी झाला होता.

काळजी करू नका भारतात असा प्रचार होण्याची सुतराम शक्यता नाही कारण आपल्याइथे तर या पॉर्न साइट तर बेन आहेत.

जॉकिम बी ऑल्सन नावाचा एक नेता डेनमार्क मध्ये राहतो तो एक जुना ओलम्पियन(ऑलिम्पिक मध्ये भाग घेतलेला खेळाडू) आहे. पण याने केलेला प्रचार विचित्र म्हणून जगभरात चर्चिला जातोय.

नक्की कसा होता प्रचार

डेनमार्क मध्ये 5 जूनला निवडणुका होणार आहेत अन या निवडणुकीमध्ये ऑल्सन ये सुद्धा लढत आहेत. आता निवडणुका आल्या म्हणजे प्रचार आलाच !! अन या प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या उमेदवार नेहमीच वापरतात. डिजिटल युगात आता प्रचारसुद्धा हाय-टेक झाला आहे. आता ओल्सनने आपल तल्लख डोकं प्रचारासाठी वापरलं.

ऑल्सन ने पॉलिटिकल प्रचाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. या महाशयांनी आपलं कैम्पेन  चक्क ‘पोर्न हब’ या साईट वर केला. हे नैतिकदृष्ट्या योग्य कि अयोग्य या भानगडीत काही आम्ही पडत नाही. ओल्सन ने ३०,००० रुपयांच्या कैम्पेनच्या जाहिराती या साईटवर चालवण्या. या कैम्पेननुसार त्यांचा फोटो पोलीटीकल स्लोगन सहित येत होते.

वेगळ्या कैम्पेनविषयी ओल्सनचा तर्क

ऑल्सनच याविषयी आपल एक मत आहे त्याने दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये त्याने सांगितलं कि कैम्पेन करने याचा अर्थ असतो मतदारांपर्यंत पोचणे अन या बाबतीत हे कैम्पेन खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल.

यश अपयश

CNN ने दिलेल्या रिपोर्टनुसार पॉर्न हब 10 कोटीपेक्षा जास्त लोक रोज उघडतात. अन सगळ्यात जास्त users च्या बाबतीत डेन्मार्क २८व्या नंबरवर आहे. ऑल्सन सांगतात जिथे तुमचा मतदाता आहे तिथपर्यंत मेसेज पोहोचणे हे सगळ्यात महत्वाचे. 1969 मध्ये डेनमार्क जगातला पहिला असा देश बनला कि जिथे पोर्नोग्रॉफ़ी वरची सेंसरशिप हटवली गेली.

येत्या ५ जूनला तिथे मतदान होत आहे आता तेव्हाच कळेल हे कैम्पेन किती प्रमाणात यशस्वी ठरले

admin

Recent Posts

मंदिर नवे ट्रस्ट बनवणार !! तर विहिप ने कोरलेल्या शिलांचे काय होणार ?

9 नोवेंबर २०१४ ला सुप्रीम कोर्टाने अयोध्येच्या विवादित जागे बाबतीत ऐतिहासिक निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने सरकारला सांगितले कि तीन महिन्यांमध्ये…

2 days ago

‘लालबाग परळ’ चित्रपटातली मामी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दुसरा नवरा आहे कॉमेडी स्टार

'लालबाग परळ' मधील मामी. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हा कदाचित मुंबईच्या इतिहासातील एक मैलाचा दगड असेल. काही वर्षांपूर्वी यावर एक…

1 week ago

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला

उस्मानाबादचे(धाराशिव) शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका माथेफिरूने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक कळंब येथे घटना घडलीय. कळंब तालुक्यात पडोळीमधील नायगाव…

4 weeks ago

नरेंद्र मोदींनी “कचरा उचलतानाचा फोटोशूट” केला का ?

१२ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी महाबलीपुरम(दुसर नाव मामल्लापुरम) येथे होते. सकाळी सकाळी नरेंद्र मोदींचा…

4 weeks ago

महाबलीपुरम बीचवर मोदींच्या एका हातात कचरा होता, पण दुसऱ्या हातात काय होते ?

१२ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी महाबलीपुरम(दुसर नाव मामल्लापुरम) येथे होते. सकाळी सकाळी नरेंद्र मोदींचा…

4 weeks ago

चक्क !! निजामाचा महाल परस्पर विकला आधुनिक नटवरलालांनी

हैदराबादचा निझाम अन त्याच्या संपत्तीचे किस्से कुणाला माहिती नाहीत. निझामाच्या संपत्तीचे अनेक किस्से लोक आजही चवीने चघळताना आढळतात. निझाम आजकाल…

1 month ago