Categories: Uncategorized

सुनील सावंत – मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातला सुलेमान

मुंबईमध्ये सुनील दत्ताराम सावंत म्हणजे सावत्या ज्याला दावूद्ची किलिंग मशीन नावाने ओळखले जायचे या सुनीलची करंगळी जरा वाकडी होती अन तेच पोलिसांच्या लेखी त्याच ओळखपत्र होत. सुनीलने आपला पहिला गुन्हा अवघ्या सोळाव्या वर्षी केला. अन त्याचा पहिलावहिला गुन्हा इतर गुन्हेगारांप्रमाणे पैशासाठी नवता तर तो होता एक शिवसेना नेत्याचा खून ..!!

किस्से कहानिया या युट्युब चेनलच्या सहयोगाने द व्हायरल महाराष्ट्र तुमच्यासाठी घेऊन आलाय मुंबई मधील गुन्हेगारी विश्वाचा काळा इतिहास. लेख कसे वाटतात नक्की कमेंट करून कळवत चला

सुनीला चा जन्म २६ जानेवारी १९६५ ला सिंधुदुर्गामधील करारेवादी या छोट्याश्या गावी झाला. वडील दत्ताराम सावंत रेल्वेमध्ये तिकीट चेकर होते. पण वडिलांच्या विपरीत सावत्याला काही साधसुध जीन आवडत नवत. तो शाळेमध्ये सुद्धा दादागिरी करत असते तिथे त्यांचे स्वतःची एक टोळी बनवून ठेवली होती. सोबतच तो इतर अनेक लोकांपासून खंडणीसुद्धा घेत असे.

शिवसेनेचे लोकल कार्यकर्ता अन सावत्यामध्ये भांडण होते अन त्या शिवसेना कार्यकर्त्याचा भाऊ एक नेता असल्याने सावत्या त्याच्यासमोर टिकू शकत नवता अन कधीतरी याची जीरवावी अस त्याच्या मनात होते. अन एक दिवस उजाडलाच जेव्हा सावत्याने आपला हिशोब पूर्ण केला. ११ फेब्रुवारी १९८२ ला सावत्याने त्या नेत्याचा खून केला. या खुनाने सावत्याला गिरगावचा दादा बनवलं. दावूद इब्राहीमच सुद्धा लक्ष या घटनेने सावत्याकडे गेले. पण सुरवातीला सावत्या द्विधा मनस्थितीत होता कि त्याने दावूद कडे जावे कि न जावे? पण एकदा एका छोट्याश्या गुन्ह्यासाठी त्याला अटक झाली. अन त्यावेळी दावूद त्याच्यासाठी धावून आला. अमर नाईक टोळी अन त्याचे चांगले संबंध असतानासुद्धा नाईक टोळीने मदत करणे अपेक्षित असताना सुद्धा त्यांनी सावत्याकडे दुर्लक्ष केले होते तर जास्त ओळख नसणारा दावूद त्याच्यासाठी दावून आला होता. या एका घटनेने सावात्याला दावूद च्या कळपात सामील केल.

दावूदसाठी सावत्याने खूप साऱ्या हत्या केल्या काही अनिल परबसोबत मिळून तर काही एकट्याच्या जीवावर. सांगितले जाते कि सावत्याने जवळपास 40 ते ५० लोकांना मारले होते. कंपनीसाठी तो नेपाळमध्ये जाऊन राहिला. नेपाळमध्ये काही दिवस राहिल्यानंतर दावूदने त्याला दुबईला बोलून घेतले. दुबईमध्ये सावत्या ऐशोरामाच्या जीवनात जगात होता. आता तो टोळीत दावूद, शकीलनंतर तिसऱ्या नंबरावर आला होता.

पण तो विसरला होता कि त्याने, शकीलने अन शरद शेट्टीने मिळून छोटा राजनच्या विरुद्ध कपात कारस्थान केले होते.तो हेही विसरला होता कि छोटा राजन त्याच्या दुश्मनांना जिवंत नाही सोडत. त्याने हे विसरायला नको होते.

एका संध्याकाळी सावत्या दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये चालला होता. इतक्यात !! एक मोटार त्याच्या मागे येऊन थांबली. मोटारीतून बंदुकधारी लोक उतरले अन सावत्यावर झेपावले. सावत्याने आपल्याला वाचवण्यासाठी शेजारील माणसाला पुढे केले. शेजारील माणसाला त्यांनी मारले.

आता दुबईच्या रस्त्यावर खुनी खेळ सुरु होता, सावत्या पुढे अन बंदुकधारी लोक मागे असे चित्र पाहणारे सांगतात. मुंबईच्या रस्त्यांवर तेव्हा असे चित्र खुपदा दिसले होते पण तेव्हा सावत्या मागे असायचा. दुबईसाठी अन सावत्यासाठी हे चित्र नवे होते. अवघ्या ५-७ मिनिटांच्या आत सावत्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पण अजून एक मजेदार बाब, जेव्हा मारेकरी पकडले गेले तेव्हा त्यांनी घेतलेल्या नावांनी दुबई च नाही तर दावूदसुद्धा हादरला !! ती नाव होती शरद शेट्टी अन अनिल परब… राजन ने शिताफीने दावूदच्याच लोकांना फसवले होते अन मारेकारांना त्यांची नाव सांगितले होते.

लेख कसा वाटला कमेंटकरून नक्की सांगा सोबतच तुमचे अभिप्राय द्यायला विसरू नका.

admin

Leave a Comment

Recent Posts

‘दर्द काफी हे …’ सुशांतबरोबर शेवटपर्यंत काम केलेल्या संजनाने शेवटी शेयर केल्या भावना

सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने संपूर्ण हिंदी सेनेमा हादरला आहे. अचानक आपल्यातून निघून जाणं सर्वांसाठीच धक्कादायक…

1 week ago

वर्षा उसगावकर यांचा टॉपलेस फोटोशूटचा किस्सा !!

90 च्या दशकात आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री…

3 weeks ago

या देशाने सर्वात आधी हरवलं कोरोनाला.. शाळा, दुकाने, कॅफे, हॉटेल सगळ काही उघडले

दुनियेतले तब्बल २१० देश आता कोरोनासोबत लढत आहेत. पण आलेल्या बातमीनुसार जगात एक असा देश…

2 months ago

दिव्यंका त्रिपाठी मुलाखत – दिव्यांकाचा नवरा दाढी ठेवत नाही कारण ..

छोट्या पडद्यावरची सिरीयल 'ये है मोहब्बतें' मधील रमण भल्लाच्या पत्नीची भूमिका करणारी नटी दिव्यंका त्रिपाठी…

3 months ago

बॉलीवूड मध्ये प्रमुख खलनायक अन त्यांचे कुटुंब

बॉलीवुड मध्ये अनेक असे मोठे कलाकार आहेत ज्यांनी अनेक सुंदर अशा भूमिका साकारलेल्या आहेत. अनेक…

3 months ago

कोरोना व्हायरस आणि प्लास्मा उपचारपद्धती

कोरोनामुळे हैराण झालेल्या जगाला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. यामुळे कोरोनावरच्या उपचार पद्धतीत क्रांतिकारी बदल…

3 months ago