Spread the love

मोठमोठे लोक म्हणतात नावात काय ठेवलय.. पण आज व्हायरल महाराष्ट्र म्हणतय कि वयात काय ठेवलय, आज आम्ही ज्या समवयस्क प्रसिद्ध व्यक्तींबद्दल सांगणार आहोत त्यानंतर तुम्हीसुद्धा नक्कीच म्हणाल “वयात काय ठेवलाय”. अन हिंदी चित्रपटसृष्टी तर याला नेहमीच सार्थक ठरवते. हिंदी मराठीत असे अनेक एव्हरग्रीन कलाकार आहेत, ज्यांची वाढत्या वयातसुध्दा चित्रपटांमध्ये डिमांड कायमच नाही तर वयाबरोबर डिमांड वाढलेली आहे. आजसुध्दा हे कलाकार मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचे रंजन करत आहेत. मात्र त्यांच्याच वयाचे दुसरे स्टार्स रुपेरी पडद्यापासून दूर गेले आहेत.

या लेखामधून आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीच्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांची वय एकदम सारखी आहेत, मात्र एक तरणाताठा दिसतो तर दुसऱ्याच्या कपाळावर आठ्या दिसतात. आता शिल्पा शेट्टी आणि स्मृती इराणी यांचेच उदाहरण घ्या. कुणी म्हणेल का दोघीही एकाच वयाच्या आहेत.?? दोघीही 42 वर्षांच्या आहेत पण या दोघींच्या लूकमध्ये बरेच अंतर आढळून येते. एकीकडे शिल्पाने स्वतःला मेंटेन केले आहेत. तर स्मृती मात्र आता ब-याच जाड झाल्या आहेत.