Categories: Interesting

चक्क !! निजामाचा महाल परस्पर विकला आधुनिक नटवरलालांनी

हैदराबादचा निझाम अन त्याच्या संपत्तीचे किस्से कुणाला माहिती नाहीत. निझामाच्या संपत्तीचे अनेक किस्से लोक आजही चवीने चघळताना आढळतात. निझाम आजकाल चर्चेत आहे, कारण त्याच्या संपत्तीचा एक मोठा खटला भारत सरकारने जिंकला आहे. पण निझाम अन त्याची संपत्ती यांचा एक अजून एक प्रकार आज समोर आला आहे.

या निजामाचा जवळपास 300 कोटी किमतीचा महाल चक्क दोन नटवरलालांनी विकला आहे.

नेमका काय आहे प्रकार ?

निहारिका इन्फ्रा. नावाची एक कंपनी आहे, या कंपनीने 100 वर्ष जुना असा निजामाचा नाझरी-बाग महाल ज्याला किंग कोठी म्हणून सुद्धा ओळखले जाते असा विकत घेतलेला होता. जून महिन्यात जेव्हा या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हैदराबादच्या रजिस्टर कार्यालयाला भेट दिली तेव्हा त्यांना आढळून आले कि या महालाची मालकी त्यांच्याकडे नाही आहे. आयरिस हॉस्पीटालिटी नावाच्या कंपनीकडे या महालाची मालकी गेलेली आहे.

अधिक चौकशीनंतर लक्षात आले कि कंपनीचे दोन कर्मचारी, सुरेश कुमार आणी सी.रविंद्र यांनी फेब्रुवारी मध्ये नोकरी सोडलेली आहे. या दोघांनी बनावट कागदपत्रे रजिस्टर कार्यालयला दाखवून हा महाल परस्पर आयरिस हॉस्पीटलिटीला विकला.

किंग कोठी

किंग कोठी हा तब्बल २.५ लाख स्क़ेयर फुट इतका मोठा महाल आहे, शेवटचा निझाम मिस ओस्मान अली हा फाळणीपूर्वी इथेच राहायचा असे सांगितले जाते. या इमारतीचे पुढेचे गेट “परदा दरवाजा” नावाने ओळखले जाते.

किंग कोठीच्या तीन इमारती आहेत, त्यातील मुख्य इमारतीच्या जागी आता एक दवाखाना आहे, दुसरीला नाझरी बाग म्हटले जाते तर तिसऱ्या इमारती मध्ये निझामाच्या वैयक्तिक मालमत्ता संदर्भातील कार्यालय आहे.

admin

Leave a Comment

Recent Posts

‘दर्द काफी हे …’ सुशांतबरोबर शेवटपर्यंत काम केलेल्या संजनाने शेवटी शेयर केल्या भावना

सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने संपूर्ण हिंदी सेनेमा हादरला आहे. अचानक आपल्यातून निघून जाणं सर्वांसाठीच धक्कादायक…

1 week ago

वर्षा उसगावकर यांचा टॉपलेस फोटोशूटचा किस्सा !!

90 च्या दशकात आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री…

3 weeks ago

या देशाने सर्वात आधी हरवलं कोरोनाला.. शाळा, दुकाने, कॅफे, हॉटेल सगळ काही उघडले

दुनियेतले तब्बल २१० देश आता कोरोनासोबत लढत आहेत. पण आलेल्या बातमीनुसार जगात एक असा देश…

2 months ago

दिव्यंका त्रिपाठी मुलाखत – दिव्यांकाचा नवरा दाढी ठेवत नाही कारण ..

छोट्या पडद्यावरची सिरीयल 'ये है मोहब्बतें' मधील रमण भल्लाच्या पत्नीची भूमिका करणारी नटी दिव्यंका त्रिपाठी…

3 months ago

बॉलीवूड मध्ये प्रमुख खलनायक अन त्यांचे कुटुंब

बॉलीवुड मध्ये अनेक असे मोठे कलाकार आहेत ज्यांनी अनेक सुंदर अशा भूमिका साकारलेल्या आहेत. अनेक…

3 months ago

कोरोना व्हायरस आणि प्लास्मा उपचारपद्धती

कोरोनामुळे हैराण झालेल्या जगाला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. यामुळे कोरोनावरच्या उपचार पद्धतीत क्रांतिकारी बदल…

3 months ago