Spread the love

’The Accidental Prime Minister’ मध्ये हुबेहूब मनमोहन सिंग दिसतायेत अनुपम खेर. निळी पगडी, पांढरा सदरा-पायजमा अन हाथ जोडून नमस्कार करतानाची मुद्रा. भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या अवतारात कोण उभे आहे हे सुरवातीला तुम्हाला ओळखू सुद्धा आले नसेल. पण हे आहेत अभिनेते अनुपम खेर.

मागच्या वर्षी जून महिन्यात ” The Accidental Prime Minister ” नावाच्या एका चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले होते. पोस्टर वरून अर्थातच अंदाज आला कि कदाचित हा चित्रपट मनमोहनसिंग यांच्यावर बेतला गेलेला असेल. पण यामध्ये अनुपम खेर यांच्याशिवाय कोण काम करणार याविषयी मात्र पडदा पडलेला होता.

काल अनुपम खेर यांनी या चित्रपटातला आपला पहिला लुक twitter वरून share केला. या लुकमध्ये ते अक्षरशः मनमोहन सिंग यांची हुबेहूब प्रतिकृती वाटतायेत.” The Accidental Prime Minister ” हा संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे, अन चित्रपटात संजय बारुंची व्यक्तिरेखा अक्षय खांना याने साकारली आहे. संजय बारू हे २००४ ते २००८ पर्यंत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मिडिया एडवाइज़र होते.

scroll च्या माहितीनुसार अक्षय खन्ना यांशिवाय या चित्रपटात प्रियांका गांधींची भूमिका ‘लिपस्टिक अंदर बुरखा’ फेम अहाना कुमरा करणार आहे. पण अजूनही सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या भूमिका कोण करणार याविषयी माहिती मिळालेली नाही.

विजय रत्नाकर गुट्टे हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे अन या चित्रपटाची प्रदर्शन तारीख २१ डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला महिना असण्याची शक्यता आहे.

या चित्रपटाविषयी तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये सांगा, अन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असा चित्रपट मतदारांचे मत प्रभावित करू शकतो का ??