मरीना बीचवरची हातगाडी ते रेस्टोरेंट चैन पत्रीसिया नारायण यांचा अविस्मरणीय प्रवास …

पत्रीसिया नारायण या महिलेची नशिबाने अनेकदा परीक्षा पहिली, अनेक संकटे अन परिश्रमाचे डोंगर चढून आज त्या यशस्वी म्हणून दिमाखाने फिरतायेत. कितीही संकटे आली तरी जिद्द सोडायची नाही हा त्यांचा मूलमंत्र.
साधारणपणे ३० वर्षापूर्वी दिवसाला ५० पैसे मिळवण्यापासून चेन्नई ची सर्वसाधारण कुटुंबातील महिला आज दिवसाला तब्बल २ लाख रुपये कमावतेय… कदाचित लोकांना हे खोट वाचेल पण मग तुम्ही चेन्नईच्या मरीना बीचवर एकदा फिरून या.
चेन्नईचा मरीना बीच बहुदा पूर्व किनारपट्टीवरचा सर्वात मोठा अन गजबजलेला बीच. याच बीचवर पत्रीसिया नारायण यांनी हाथगाडी थाटली. या हाथगाडीवरुन विविध खाद्यपदार्थ विकून त्या कसाबसा आपला संसार चालवीत. अन अशा बिकट परिस्थितीमध्ये दारुड्या नवऱ्याने त्यांना सोडून दिल. पण आपल्या दोन लहानग्या मुलांसोबत हि महिला वाऱ्यावर संसार थाटून आयुष्यासोबत लडाईला सज्ज झाली.
आज त्यांची प्रगती पहिली तर कुणीही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांच्या मालकीची कित्तेक रेस्टोरेंटस शहरात ठिकठिकाणी आहेत. सुरवातील दोन लोकांसोबत सुरु केलेल्या या व्यवसायात आज त्यांच्या हाताखाली २०० पेक्षा जास्त लोक काम करतात. पूर्वी सध्या सायकलवर फिरणाऱ्या पत्रीसियांकडे आज दोन आलिशान कार्स आहेत.
त्या सांगतात कि “पूर्वी मला दिवसाला कसेबसे १०० रुपये मिळायचे आज मला २ लाख रुपये दिवसाला मिळतात, पण त्या संघर्षाची अन त्या दिवसांची सर आज नाही”, “त्यावेळी १०० रुपये हाथात पडल्यावर अमाप आनंद व्हायचा”
त्यांच्या कार्याचा गौरव फिक्की या उद्याजाकांच्या संस्थेनही केलाय. त्यांचा “संदीपा” हा ब्रांड संपूर्ण तमिळनाडूत प्रसिद्ध आहे, अन हळूहळू शेजारील राज्यातही पाय पसरतोय.
क्वालिटीशी कधीही तडजोड करू नका, अन जेव्हा तुम्ही एखाद्याला कामावर घेता “तेव्हा त्याला नक्की कशासाठी घेतंय हे लक्षात ठेवा, अन त्याच्याकडून ते काम करवून घ्या” असा सल्ला त्या नवोदित उद्योजकांना देतात