गावाकडच्या भुताच्या गोष्टी- पोल्ट्रीफार्मवरच भूत

नमस्कार मित्रांनो व्हायरल महाराष्ट्र आजपासून मध्यरात्रीच्या “भुताच्या गोष्टी” नावाने सदर सुरु करत आहे… आजच्या सदरातली ही पहिली गोष्ट वाचून सांगा कशी वाटली ते. अन मित्रांसोबत SHARE करायला विसरू नका
मी व माझा मित्र नितिन रात्रीचे जेवन उरकुन शेतात कोंबड्याच्या गेटचे दार बंद करण्यासाठी गेलो होतो. साधारणत: रात्रीचे नऊ वाजले असतील पन काळोख खुप होता.आमच्या शेतात कोंबड्या या मुक्त पालन केलेले आहे. घरी निघताना सहा साडेसहाला गेट लावत असतो पन त्या दिवशी ते उघडेच राहीले होते.
आम्ही शेतात पोहचलो कोंबड्या व्यवस्थित आत डालल्या व पोल्ट्रीचे दार लावुन मग कुलुप लावले. तोपर्यंत थोडीशी लघुशंका आली होती, काम आटपली म्हणून मी लघुशंकेसाठी पोल्ट्रीच्या बाजुला गेलो , पण जसा लघुशंका करुन माघारी फिरलो तर मला पोल्ट्रीच्या मागच्या बाजुला कोंबडीच्या पिल्लाचा आवाज आला. मला वाटले चुकून एखाद पिल्लु बाहेरच राहीले अन इतर कोंबड्यासोबत ते पोल्ट्रीत आलेच नाही. पिल्लाच्या आवाजाचा कानोसा घेत मी मागे गेलो तर पण जसा मी ज्याठिकाणी आवाज येत होता तिथे पोचलो तर अचानक पिल्लाचा आवाज येईनासा झाला. मी ईकडे तिकडे पाहीले पण काहीच दिसत नव्हते … दिसत होता तो पोल्ट्रीतुन येणारा बल्बचा प्रकाश..!! काहीकेल्या मलाकाही पिल्लू सापडल नाही तोपर्यंत मित्र टाकीवरील मोटर बंद करत होता. जसा मी पोल्ट्रीच्या पुढे निघालो मला परत पिल्लाचा आवाज यायला लागला आता मात्र पिल्लाला शोधायचेच म्हणून मी परत मागे निघलो पण खूप शोधाशोध केल्यानंतरसुद्धा पुन्हा मला काहीच न दिसल्याने मी परत आलो.
आम्ही आता निघनार होतो व जाताना कंपाऊंडचे गेटचे लॉक लावता लावता मी सहजच मोबाईल पाहीला तर रात्रीचे अकरा वाजले होते. रात्रीचे ११ …!! म्हणजे तब्बल दीड तास मी पिल्लाला शोधात होतो… माझ्या मनाला काही हे पटत नवते कारण साधारणपणे लघुशंका अन दोन वेळा पिलाला शोधणे याट १५-२० मिनिटे यापेक्षा वेळ गेला, अस मला वाटत नवत …
मला चकवा तर बसला नाही ना …!!
काही दिवसांपूर्वीच गावाच्या गोसाव्याच्या पोराने सांगितले होते “भूत, ज्याठिकाणी असत तिथे म्हणे चकवा बसतो”
माझी आता पक्की खात्री पटली होती कि मला चकवाच बसला होता. पण दैव बलवत्तर म्हणू अवघ्या दीड तासात तो निघला.. चकव्यात म्हणे अख्खी रात्र लोक त्याच जागी भटकतात.
गेटला कुलूप लावून घराकडे निघालोच होतो तेव्हड्यात मित्र बोलला की अरे त्या टाकीच्या पलिकडे बहुतेक पिल्लु आपल पिल्लू चुकलय खूप वेळ झाल ओरडतय पन काही दिसेना !
मी मित्राला अडवण्याचा प्रयत्न केला त्याला अप्रत्यक्षपणे भीतीसुद्धा दाखवून पहिली पण माझ्यावर गुज्र्लेल्या प्रसंगाची त्याला माहितीच नवती. पण तो गडी आता इरेला पेटला होता तो म्हणाला चल बघुन तर येऊ, मी अन मित्र पिल्लाच्या आवाजाच्या दिशेने निघालो तेथे पोहचल्यावर मात्र पुन्हा आवाज बंद..!! नितीनने मला आवाज दिला “अरे उजेड जरा इकडे धर पाहू”
मी त्याच्याकडे टोर्च चमकावला..!! अरे बापरे !! माझी बोबडीच वळली …
मित्राच्या मागच्या बाजुला पाच दहा फुटावर मला एक भयंकर आकृती दिसली, माझ्या काळजाचे पाणी झाले पन धीर धरून त्या आकृतीवर टोर्च चाम्कावला तेव्हा दिसले ते रुईचे झाड. अरेच्चा !! हि रुई तर आपण रोजच पाहतो, पण धुसर प्रकाशामुळे ते तसे दिसत होते. मी मित्राच्या जवळ गेलो टॉर्चने पाहीले तर काहीच नव्हते.तेवढ्यात पोल्ट्रीच्या मागच्या बाजुने बर्याच पिल्लांचा आवाज येवु लागला पुन्हा मित्र तिकडे निघाला पन मी पुरता घाबरलो होतो व त्याला विरोध करित करित त्याच्या मागे निघालो.तेथेही तसेच कुठेही पिल्लाचा तपास नव्हता. सहज मोबाईल मध्ये नजर टाकली तर अकरा वाजुन छपन्न मिनिट झाली होती, माझी तर पार टरकली होती.मित्राच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते, अचानक लाईट गेली व पोल्ट्रीतील पिल्ले मोठ्याने कालवा करायला लागली तो आवाज ईतका भयंकर होता की मला असह्य झाला होता तेवढ्यात एक अंगावर शिरशिरी आणनारी हवेची मंद झुळुक अंगावर सरकरली. दाढी अक्षरशः ऊभी राहीलेली जाणवत होती व अंगावर काटा आला होता, मित्रालाही बहुतेक गंभीरता लक्षात आला असावी, थोडी भीती त्यालाही वाटत असेल तेवढ्या पोल्ट्रीच्या मागच्या बाजुने कपाऊंडला जोरात काहीतरी येवुन धडकले व धुराळा आमच्या अंगावर आला मी टार्च पकडलेला होता लाईट गेल्याने अचानक टॉर्च बंद झाला, माझ्या मोबाईलचे नेटवर्क गायब झाले व मोबाईल व्हायब्रेट व्हायला लागला तेवढ्यात अजुन एक धडक कपांउंड वर बसली आम्ही दोघे पळत सुटलो गेटच्या आतल्या बाजुला एक वेल आलेली आहे कावळीची पळताना मित्र त्याच अडकला व खाली पडला. पोल्ट्रीतुन खुप मोठा आवाज पिल्लांचा येत होता, व मागच्या बाजुने कोणत्यातरी जनावराच्या ओरडण्याचा खुप भयंकर आवाज येत होता, तेवढ्यात टाकीच्या पलिकडुन पुन्हा पिल्लु ओरडल्याचा आवाज आला,माझी तर बोबडीच वळली मित्र त्या वेलीत गुंतला होता,मी त्याला कसेबसे काढले व कंपाउंडचे गेट लावुन पळालो.
सकाळी जेव्हा घाबरत घाबरत पोल्ट्रीकडे येत होतो तेव्हा, गण्या येताना दिसला … जवळ आल्यावर म्हणाला “लेका, काळ रातच्याला डुकरांच्या कालगतीने तुज्या मागच्या कंपाउंडची पार वाट लावलीय”.. आता लख्ख प्रकाश डोक्यात पडला म्हणजे रात्री काहीतर पळत येऊन कंपाउंडला धडकली ती डुकर होती तर …” अन मग मी अन नित्य एकमेकांवर हसत हसत पोल्ट्रीवर गेलो
मुळ लेखक – ग. होले(फेसबुकवरून उचलेली पोस्ट)