Uncategorized

हा “लेनिन” कोण रे भाऊ ??? व्लादमीर पुतीनचा कोण ?? अन त्याचे पुतळे का तोडताहेत लोक

काल ट्वीटर “#लेनिन” या HashTag ने अक्षरशः ढवळून गेल होत… त्रिपुरामध्ये लेनिनची मूर्ती काही लोकांनी बुलडोझरने तोडून… लेनिनच्या मूर्तीच्या डोक्यासोबत फुटबाल खेळले. “व्हायरल महाराष्ट्र” ला बऱ्याच लोकांनी विचारले… कोण होता हा लेनिन?? अन भारताशी त्याचा काय संबंध ?? अरे बाबा काहीतरी बोला या विषयावर.

लेनिन या विषयाशी आज राजकारण जोडलं गेलंय, म्हणून व्हायरल महाराष्ट्र या विषयावर बोलायचं टाळत होते. या लेखाच्या सुरवातीलाच सांगतो “आम्ही कोणत्याही विचारधारेला समर्पित नाही आहोत”

तर लेनिन कोण होता ?? लेनिन हा जगातल्या काही मोजक्या महापुरुषांपैकी एक होता… जसे आपले महात्मा गांधी मानवतावादासाठी जगात ओळखले जातात तसाच लेनिन हा समाजवाद यासाठी ओळखला जातो.

आता हा समाजवाद काय ? अगदी सोप्प्या शब्दात सांगायचं झाल तर समाजवाद म्हणजे… संपूर्ण समाजातली विषमता नष्ट करणे.. म्हणजे एक असा समाज निर्माण करणे ज्यामध्ये कुणी श्रीमंत असणार नाही… का कुणी गरीब ..!!, अंबानीचा मुलगा तुमच्या मुलाच्या शाळेत जायील, अन एका मुकेश अंबानी अन तुम्ही एकाच ठिकाणी एकाच पगारावर काम करत असाल. शिक्षण, आरोग्य यासारख्या गोष्टी सगळ्यासाठी सारख्याच अन फुकटात असतील. म्हणजे सोनिया गांधी अन तुमच्या बहिणीला जर एकच आजार असेल तर तुम्हालाही सोनिया गांधीनासारख्याच सुविधा मिळतील… किंवा राहुल गांधीना निराशा आली कि ते इटलीला जातात, तसच एकतर तुम्हाला निराशा आली तर तुम्ही इटलीला जाल, किंवा कुणीच जाणार नाही … हा सरळ साधा नियम … यात उत्पन्नाची साधने हि कुणा एकाच्या मालकीची नसतील तर ती समाजाच्या मालकीची असतील.(साम्यवादात- उत्पन्नाची साधने हि देशाच्या मालकीची असतात)

अर्थात या विचारधारेच स्वप्न कार्ल मार्क्स अन फ्रेडरिक अन्गेल्स नावाच्या माणसांनी पहिले, पण ते पहिल्यांदा कुणी वास्तवात आणायचं प्रयत्न केला असेल तो लेनिन ..!! लेनिनने जगाला हे दाखवून दिल कि या स्वप्नाच्या जवळ जाणे शक्य आहे… अन मग जगात समाजवादाची लाट उसळली… काल-परवा वारलेले फिडेल केस्त्रो, मार्शल टिटो, चे गुवेरो सारखे तरुणांनी भारावून आपापल्या देशातल्या हुकमी राजवटी उलथवून साम्यवादी सरकारे स्थापन केली. भारतही याला अपवाद नवता.. भारताचे प्रथम प्रधानमंत्री नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, अन १९७६ च्या आणीबाणीत कॉंग्रेस उलथवून देणारे जयप्रकाश नारायण ही भारतातली समाजवादी मंडळी.

लेनिन अन भारत-

लेनिनचा भारताशी काय संबंध ?? जेव्हा आपल्या लोकमान्य टिळकांना ब्रिटिशांनी मंडालेच्या तुरुंगात डांबले त्यावेळी तिकडे रशियात लेनिनने एक खरमरीत लेख लिहून ब्रिटिशांना सांगितले “हा टिळक एक दिवस तुमच्या साम्राज्यास काडी लावणार… तुम्हाला संपवणार” सुभाषबाबुंचे रशियाप्रेम अन साम्यवादप्रेम कुणापासूनही लपून नाही, त्यामुळे जेव्हा ते भारतातून निघाले तेव्हा त्याचं लक्ष एकाच होत … रशिया.
भगतसिंग हे किती साम्यवादी होते हे त्यांनी लिहलेल्या पुस्तके वाचली तर कळेल. जेव्हा त्यांना फाशी द्यावयाची होती तेव्हा ते लेनिनचेच पुस्तक वाचत होते, त्यांना त्यावेळी भेटावयास आलेल्या माणसाला काय करतोस?? या प्रश्नावर ते म्हणाले “एक क्रांतिकारी दुसऱ्या क्रांतिकाऱ्याला भेटत होता”. निम्म्या जगावर लाल फतवा पसरवणारा हा मानून लेनिन …!!

लेनिन इतका महान तर मग का पाडला त्याचा पुतळा ??

त्रिपुराचे २५ वर्ष सरकार हे डाव्या म्हणजेच लेनिनच्या विचारसरनीचे तर नवीन निवडून आलेलं सरकार हे उजव्या विचारसरनीचे. डाव्यांनी गेली २५ वर्षे साम्यवादाची प्रतीके राज्यभर उभी केलीत, त्यात बऱ्याच ठिकाणी लेनिनचे पुतळे आहेत. एक उदाहरण देऊन सांगतो जेव्हा धार्मिक दंगली घडतात तेव्हा विरोधी धर्माच्या धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा प्रयत्न असतो… का ?? देवता कोणत्याही धर्माची असो, तिचे विचार पटत नाहीत म्हणून हा हल्ला केला जातो का,?? तर नाही… एक उन्माद असतो प्रतिस्पर्ध्याला नष्ट करण्याचा, त्याच्या मर्मावर वार करण्याचा.. अन नेमके हेच त्रिपुरामध्ये झालय

भारत सोडून इतर ठिकाणीसुद्धा लेनिनचे पुतळे तोडले गेलेत, पण ज्या देशात ते तोडले गेले किंवा जातायेत त्या देशांवर कधीतरी सोवियत रशियाचे शासन होते, अन त्याठिकाणी तिथले लोक रशियन साम्यवादी लोकांचे पुतळे तोडून रशियाला इशारा देतात कि आम्ही सार्वभौम आहोत, अन आता तुम्ही आमच्यावर कसलीही सक्ती करू शकत नाही… या देशांमध्ये मुख्यतः युक्रेन व हंगेरी सारखे पूर्व युरोपचे देश येतात

चला आता लेनिन जाणून घेऊया

वोल्गा नदी किनाऱ्यावरील सिम्बिर्स्क (नंतरचे उल्यानोवस्क) या गावी लेनिनचा जन्म एप्रिल २२ १८७० ला झाला. त्यांचे वडील इल्या निकोलायेविच उल्यानोव्ह हे आधी शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते नंतर ते शाळा तपासनीस झाले, तर आई मारिया अलेक्सांद्रोव्हना या एका सुविद्य घराण्यातील होत्या. लेनिन सहा भावंडातील तिसरे अपत्य होते. उल्यानोव्ह कुटुंब सुसंस्कृत, सुखी कुटुंब म्हणून परिचित होते. इल्या निकोलायेविच यांना खूप मान होता, तत्कालीन उमराव वर्गात त्यांची गणना होत होती. लेनिनच्या बालपणीचा काळ आरमात व उदार वातावरणात गेला. इतर भावंडांप्रमाणेच लेनिनही हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात होते. शिक्षणातील शेवटच्या परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी सुवर्णपदक पटकाविली होते. १८८६ साली वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांचे दिवस पालटले. १८८७ मध्ये त्सार (मराठी झार) तिसरा अलेक्सांद्र याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून लेनिन यांचा मोठा भाऊ अलेक्सांद्र याला फाशीची शिक्षा झाली आणि मोठी बहीण ऍना हिला तुरूंगवासाची शिक्षा झाली. या घटनेचा मोठा आघात लेनिनवर झाला.

शालेय शिक्षणानंतर लेनिन कायदा व अर्थशास्त्र शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दाखल झाले. पण तेथील मुलांनी लेनिनच्या भावाच्या फाशी विरोधात केलेल्या निदर्शनाच्या आरोपामुळे लेनिनसह ४५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून लेनिनकडे पाहण्यात येऊ लागले. त्यामुळे इतर विद्यापीठातही लेनिन यांना प्रवेश नाकारण्यात आला. वयाच्या १८ व्या वर्षी लेनिन आपल्या आई आणि भावंडांसह समारा येथे राहिले.

समारा येथील वास्तव्यात लेनिन यांना पुस्तके मिळवून वाचून काढण्याचा नाद लागला. याच काळात कार्ल मार्क्स यांचे दास कपिताल वाचण्यात आल्याने समाजवादच रशियाच्या समस्यांवर तोडगा असल्याचे त्यांचे मत झाले. कायदा, तत्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, सामाजिक व राजकीय समस्या, मार्क्सवाद अशा विविध विषयांवर चौफेर वाचन आणि प्रभावी भाषणशैली यामुळे लेनिन समाजवादी गटाचे प्रमुख कार्यकर्ता बनले. तर दुसरीकडे लेनिन यांच्या आईच्या प्रयत्नांमुळे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून परीक्षा देण्याची मुभा लेनिन यांना देण्यात आली. चार वर्षांचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करीत लेनिन ही परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे हे लेनिन यांचे ध्येयच बनले. त्यांनी समाजवादाचा प्रसार करण्यास सुरूवात केली. आपल्या समर्थनासाठी समविचारी लोकांच्या शोधात लेनिन काही महिने युरोपमध्ये इतरत्र राहिले. १८९३ पासुन त्यांनी लेख लिखाणास आरंभ केला. हळूहळू त्यांचे लेख जहाल होवू लागले. १८९५ मध्ये लेनिन रशियात परतल्यावर एक वृत्तपत्र काढण्याचे व त्याचे गुप्तपणे वाटप करण्याचे त्यांनी ठरविले. जेमतेम पहिला अंक निघाला आणि गुप्तहेरांनी लेनिन यांना अटक केली. लेनिनवर राजद्रोहाचे आरोप ठेवण्यात आल्याने त्यांना १८९७ साली सायबेरियात तीन वर्षांच्या शिक्षेसाठी पाठविण्यात आले. त्याकाळी सायबेरियाची शिक्षा जुलमाची नव्हती. लेनिन यांनी या काळात भरपूर वाचन, लेखन, अन्य कैद्यांशी चर्चा करण्यात घालविला. १८९८ साली लेनिन यांची जुनी सहकारी नादेझ्दा कृपस्काया (Nadezhda Krupskaya) हिलाही सायबेरियात शिक्षेसाठी पाठविण्यात आले. लेनिन यांनी नादेझ्दाशी तेथेच विवाह केला. सायबेरियात असतांनाच लेनिन यांनी रशियातील भांडवलशाहीचा विकास नावाचा ग्रंथ लिहिला.

शिक्षा संपल्यानंतर लेनिन यांनी रशिया बाहेर राहण्याचे ठरविले. रशियाच्या बाहेर राहून एखादे वृत्तपत्र काढून त्याचे वाटप गुप्तपणे व प्राभावीपणे व्हावे असे लेनिन यांना वाटत होते. त्याप्रमाणे डिसेंबर १९०० मध्ये सुप्रसिद्ध इस्क्रा (रशियन ठिणगी) नावाचे नियतकालिक लेनिन यांनी सुरू केले. यामुळे समाजवादी गटात लेनिनचे महत्त्व वाढतच गेले. मार्क्सवादाला जोड देत आणि त्यात सुधारणा करत लेनिन यांनी लेनिनवाद वर पुस्तक लिहिले.

१९०३ साली रशियन सोशल डेमोक्रटीक पक्षाचे दुसरे अधिवेशन लंडन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात लेनिन आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षातील ज्येष्ठ नेते प्लेखानोव्ह, मार्तोव्ह यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्यामुळे पक्षात फुट पडली. लेनिन यांना पाठिंबा देणार्‍या बहुमतवाले बोल्शेविक तर उरलेले अल्पमतवाले मेन्शेविक म्हणून ओळखले जाऊ लागले. तेव्हा आपला पक्ष कडक शिस्तीने चालवावा असे आदेश लेनिन यांनी आपल्या पाठिराख्यांना दिले.

१९०५ साली लेनिन रशियात परतले. त्याच वर्षी त्सारने ऑक्टोबर घोषणा करून जनतेच्या काही मागण्यांना मान्यता दिली. लेनिन सारख्या नेत्यांना रशियात राहणे कठीण जात असल्याने त्यांनी १९०६ साली रशिया पुन्हा सोडले. १९०६ ते एप्रिल १९१७ या काळात लेनिन रशिया बाहेरच राहिले. १९१७ साली समाजवाद्यांनी २४-२५ ऑक्टोबरला क्रांती घडवून आणली, त्या क्रांतीचे मुख्य नेते लेनिन होते. इतिहासात या क्रांतीस ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते.

मार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले. क्रांती घडवून आणली, त्सारला संपविले. नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित केली. नव्या सरकारचे कामकाज कसे असावे याची रूपरेषा आखली.

लेनिन यांना पहिल्यांदा मार्च १९२२ मध्ये पक्षाघाताचा झटका आला. यातून सावरत असतांनाच त्यांना डिसेंबर मध्ये दुसरा झटका आला. यामुळे लेनिनचे डाव्या बाजुचे शरीर निकामी झाले. सावरण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच लेनिन यांना पक्षाघाताचा तिसरा झटका आला आणि त्यातच जानेवारी २१ १९२४ या दिवशी लेनिन यांचे निधन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button