स्वामी हेच धन्वंतरी, बाबांच्या ब्लड कॅन्सर मध्ये देखील मिळाला आराम

नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या लेखमालेत तुमचे स्वागत आहे. जर तुम्हाला ‘आपले’ हे लेख आवडत असतील तर या लेखांना जरूर शेअर करा. स्वामींची किर्ति संपूर्ण जगभरात असावी हे आमचे ध्येय. यापुढील लेख सेवेकर्याच्या शब्दात.
मी अंकुश गेल्या अनेक वर्षापासून सेवेकरी आहे. मी एक सामान्य सेवेकरी आहे आणि आज माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. माझा अनुभव हा माझ्या वडिला संबंधीचा आहे. काही दिवसपूर्वी मी वडिलांना दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टरांनी माला संगितले की माझ्या वडिलांना ब्लड कॅ न्सरची तिसरी स्टेज आहे.
ही गोष्ट ऐकल्यानंतर आमच्या पायाखालची जमीनच हादरली. स्वामी समर्थ महाराजांवरील माझी श्रद्धा इतकी होती की मी लगेच दिन्दोरी गाठले. तिथे सगळं वृतांत सांगितल्यावर गुरुमाऊली मला म्हणाले की, काळजी करण्याचे कारण नाही तुमच्या वडिलांना नक्की बरे वाटेल.
त्यांनी मला दिलेल्या सेवेमध्ये श्री धुमावती मंत्राचे तीर्थ, महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक आणि वडिलांच्या नाडीवर जप अशा सेवा मिळाल्या. या सेवा आम्ही सुरू केल्या आणि सर्व कुटुंब मिळून महाम्र्युत्युंजय मंतरचा जप करायचो. स्वामी हेच धन्वंतरी, नाडीवरील जप हेच सलाईन तर रांभेंडी आणि सप्तरंगी वनस्पतिचा काढा हीच औषधे असा कार्यक्रम साधारण सहा दिवस चालू होता.
आणि काय आश्चर्य, चार पाच दिवसातच वडिलांना आराम पडू लागला. ते म्हणाले, आता कुठल्या डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाही. अगोदर जेव्हा आम्ही तपासण्या केल्या होत्या तेव्हा डॉक्टर म्हणाले होते, आपल्याला उशीर झालेला आहे. पण नंतर मात्र सगळं छान झाले.
आज माझे वडील खूप चांगले आणि धडधाकट आहेत आणि हे सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि आयुर्वेदाने झाले असे आम्हाला वाटते. अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!