Uncategorized

‘तुझ्या मूर्ख बायकोला समजावं, नाहीतर …’ ट्विंकलच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन लोकांनी अक्षयला सुनावले

विवेक अग्निहोत्री यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट बनवला आणि मग इतिहास घडला. अत्यंत संथ सुरवात करणार्‍या या चित्रपटाने जसा वेग पकडला तसे बॉक्स ऑफिस हादरून गेले आणि या कश्मीर फाइल्सच्या वादळामध्ये अक्षय कुमारचा बिग बजेट चित्रपट ‘बच्चन पांडे’ देखील कुठल्या कुठले उडून गेला. कदाचित आपल्या पतीच्या सिनेमाच्या झालेल्या वाताहतीमुळे ट्विंकल चांगलीच रागावली आहे आणि मग तिने या चित्रपटाची आपल्या पोस्टमधून खिल्ली उडवली होती.

ट्विंकलने ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची खिल्ली उडवल्यामुळे सोशल मीडियावर तिच्याविरोधात वातावरण आहे आणि तिला ट्रोल देखील केले जात आहे. अनेकांनी तर तिच्या या वक्तव्यावरुण अक्षय कुमारला देखील सुनावले आहे.

ट्विंकल हिने काही दिवसपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया साठी लिहलेल्या एका लेखामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी भाष्य केले होते. लोक कसे विविध शहरांची नावे आपल्या चित्रपटांसाठी बुक करत आहेत हे सांगताना तिचा तोल ढासळला आणि आपण मेनीक्युयर वर ‘द नेल्स फाइल्स’ चित्रपट बनवणार आहे असे देखील तिने संगितले. पुढे तिने चित्रपटाला जातीयवादाच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा असे म्हणत ‘द कश्मीर फाइल्स’ पेक्षा आपला ‘नेल फाइल्स’ चांगला असेल अशी जहरी टीका देखील केली होती.

या सगळ्या प्रकारावरुण आता मात्र अनेक नेटकार्‍यांनी अक्षय कुमारला देखील सुनावले आहे. एक जन लिहतो की, ‘अक्षय कुमारजी कृपया तुमच्या मूर्ख बायकोला समजवा नाहीतरी एक दिवस तिच्यामुळे तुम्ही रस्त्यावर याल. स्वत: तर फ्लॉप आहेच… काही काम नाही.. तर घरी बसून स्वत:चा मूर्खपणा सर्वांना दाखवून ती तुम्हाला लवकरच रस्त्यावर आणणार आहे.. तिला समजवा’

अक्षय कुमार याचा चित्रपट ‘बच्चन पांडे’ हा तगडी स्टारकास्ट आणि भलेमोठे बजेट असताना देखील द कश्मीर फाइल्स अशा चित्रपटाच्या पुढे अक्षराश: लोटांगण घेताना दिसला. कश्मीर फाइल्स या चित्रपटाचे साधे प्रमोशन देखील व्यवस्थित करण्यात आले नवते आणि फक्त लोकांनी केलेल्या मौखिक स्तुतिवर हा चित्रपट तब्बल 250 कोटी रुपये कमावतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button