Uncategorized

मित्राकडून तब्बल महिन्याला ’80 लाख’ रुपये पगार घेते ही गर्लफ्रेंड

तुमच्या कॉलेजमध्ये देखील एखादा असा मित्र असेल जो त्याच्या मैत्रिणीचा रीचार्ज करत असेल, तिचा खर्च करत असेल अशा अनेक गोष्टी तुम्ही पहिल्या असतील पण जर तुम्हाला कुणी सांगातले की एक माणूस त्याच्या गर्लफ्रेंडला तब्बल 80 लाख रुपये पगार देत आहे.

बाईपोटी रावाचे रंक झालेली अनेक उदाहरणे आपण ऐकली असतील आणि त्या लिस्टमधला हा माणूस कोण हे जाणून घेण्याची इच्छा तुमच्या मनात जागी झालीच असेल. तर जगातल्या काही सर्वात श्रीमंत व्यक्तिपैकी एक असणारा प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तीयानो रोंनाल्डो हे त्या माणसाचे नाव आहे. रोंनाल्डो हा आपल्या गर्लफ्रेंडवर महिन्याला तब्बल 80 लाखांपेक्षा अधिक पैशे खर्च करण्यासाठी देतो.

ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या एका बातमीनुसार रोंनाल्डो हे पैसे त्यांच्या गर्लफ्रेंडला फेतो आणि हे पैसे एका पगारासारखे तिला दिले जातात. रिपोर्टनुसार रोंनाल्डो त्यांच्या मैत्रिणीला महिन्याला 83000 पाउंड इतकी रक्कम तिला दर महिन्याला देतो. भारतीय चलनामध्ये हे पैसे 82 लाख रुपये होतात. तिला ही रक्कम स्वत:च्या आणि मुलांच्या देखभालीसाठी रोंनाल्डो हा देतो.

रोंनाल्डोने तिला काही दिवसपूर्वीच दीड कोटींची एक आलीशान कार भेट म्हणून दिली होती. 2017 पासून रोंनाल्डो आणि जोर्जिया रोद्रीगेज हे एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अत्यंत आलीशान आणि स्वर्गीय असे जीवन जगत असतात. सोशल मीडियावर अनेकदा ही दोघे लग्नबंधनात अडकल्याचे देखील बोलले जाते पण तशी काही अधिकृत बातमी नाहीये. रोंनाल्डो आणि जोर्जीया हे सोशल मीडियावर देखील खूप चांगलेच सक्रिय आहेत आणि त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घडामोडी ते पोस्ट करत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button