‘शेर शिवराज’ मध्ये आता ‘दिग्पाल’च साकारणार ‘बहिर्जी नाईक’; तुम्ही ओळखूच शकणार नाहीत असा धारण केलाय वेश

सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे हे चांगलेच जोरात चालू आहे मग ते भारतभरामध्ये ‘आरआरआर’ ने आणलेले वादळ असो अथवा ‘पावनखिंड’ चित्रपटाने महाराष्ट्रात आणलेले तूफान. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आणि हिंदवी स्वराज्यासाठी धारातीर्थी पाडलेल्या मावळ्यांची संघर्षगाठा ‘शिवराज अष्टक’ या द्वारे 8 चित्रपटांच्या माध्यमातून जगापुढे आणण्याचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ठरवले आहे.
या चित्रपटांच्या मालिकेमधले ‘फर्जन्द’,’फत्तेशिकस्त’ आणि आता आलेला ‘पावनखिंड’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत आणि आता ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येऊ घातलेला आहे. चित्रपटाचा टीजर आला आणि प्रेक्षकांना चित्रपटची आस लागली. चित्रपटामधील ‘येळकोट देवाचा’ हे गाणे देखील प्रदर्शित झाले आहे आणि हे गाणे चांगलेच गाजले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाला अफजल खानाचा खातमा आणि त्या आधीचा नंतरचा इतिहास आपल्याला आपल्या डोळ्यांनी या चित्रपटाच्या माध्यमामधून पाहायला मिळेल. चित्रपटामध्ये कोण कुणाची भूमिका करणार याबद्दल देखील चांगलीच चर्चा चालू आहे.
मध्यंतरी सगळ्यांच्या लक्षात आले की या चित्रपटामध्ये अफजल खान यांची भूमिका करनार आहे तो हिन्दी चित्रपट क्षेत्रामधला आघाडीचा अभिनेता मुकेश ऋषि. आता चित्रपटामध्ये ‘गुप्तहेर बहिर्जी नाईक’ यांची भूमिका कोण करणार हे समोर आले आहे. स्वत: लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे बहिर्जी नाईकांची भूमिका सकरणार आहेत. दिग्पाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरुण ही माहिती दिली आणि आपला लुक देखील शेअर केला.
आता बहिर्जी नाईकांबद्दल कुणाला माहिती नाही ? तरीही माहिती म्हणून थोडक्यात सांगायचे झाले तर बहिर्जी नाईकांसारखा गुप्तहेर समकालीन इतिहासात झाला आणि आणि ते महाराजांचे गुप्तहेर म्हणून काम करत होते. बहिर्जींच्या बुद्धिमत्तेचे, वेशांतरचे आणि बातम्या काढण्याच्या कौशल्याचे किस्से आजही महाराराष्ट्राच्या गावागावात संगितले जातात. बहिर्जी नाईकांनी भूमिका दिग्पाल किती ताकदीने साकारतात हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल. 22 एप्रिल रोजी चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होईल, सध्या तरी चाहते दिग्पालच्या लुकवर चांगलेच फिदा झाले आहेत आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
पावनखिंड या चित्रपटामध्ये बहिर्जी नाईक यांची भूमिका हरिष दुधाडे याने साकारली होती आणि त्याने ताकदीने बहिर्जी नाईकांची भूमिका साकारली होते. अनेकांना असे वाटत होते की ‘शेर शिवराज’ मध्ये देखील हरिषच हे पात्र साकारेल पण दिग्पाल यांची ही भूमिका अनेकांना धक्का देणारी अशीच आहे. अनेकांना हरिष हाच भूमिकेसाठी योग्य वाटत होता.