‘द कपिल शर्मा शो’ मधल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर रस्त्याच्या कडेला चहाच्या टपरीवर चहा बनवायची वेळ आली

द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम लवकर बंद होणार या बातमीमुळे या कार्यक्रमाच्या चाहत्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरलेली आहे. दर आठवड्यामध्ये एकदा येणार्या या कार्यक्रमाने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले आहे. अद्याप शो बंद होणार असल्याची अधकृत घोषणा मात्र केली गेलेली नाही पण सोशल मीडियावर मात्र ही गोष्ट भलतीच व्हायरल झालेली आहे.
पण सध्या दुसरी एक बातमी येत आहे. एक विडियो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि त्यामध्ये कपिल शर्मा शो मधला एक प्रसिद्ध कलाकार रस्त्याच्या कडेला चहा विकताना दिसत आहे. सुनील ग्रोवर हा द कपिल शर्मा शो च्या आधारस्तंभापैकी एक आहे आणि तो खूप जास्त लोकप्रिय आहे. आपल्या जबरदस्त अभिनयाने तो मिळालेल्या प्रत्येक भूमिकेमध्ये जीव ओततो. त्याच्या विनोदांनी तर संपूर्ण भारताला खूप हसवलेले आहे.
व्हायरल झालेल्या विडिओ मध्ये सुनील ग्रोवर हा रस्त्याच्या कडेला चहा विकताना दिसर आहे आणि रस्त्याच्या कडेला त्याला चहा विकताना पाहून अनेक लोकांना धक्का बसला आहे. सुनील ग्रोवरने त्याच्या इंस्टाग्रामवरुण हा विडिओ टाकला आहे. गढवालमध्ये रस्त्याच्या कडेच्या एका चहाच्या टपरीवर सुनील ग्रोवर हा चहा बनवताना दिसत आहे.
रस्त्याच्या कडेला उभा राहिलेला सुनील खूप आनंदाने आणि जीव लावून चहा बनवताना दिसत आहे. दुकानाची खरी मालकीण त्याच्याकडे आनंदाने पाहत आहे. सुनीलच्या या विडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा खूप प्राऊस पडलेला आहे आणि त्याचा हा विडिओ चांगलाच आवडलेला आहे. सुनील ग्रोवर हा डाउन टु अर्थ असा अभिनेता आहे आणि त्यामुळेच तो लोकांना आवडतो. काही दिवसपूर्वीच त्याची बायपास सर्जरी झाली आणी आता त्यामधून तो बरा होत आहे आणि कामाला सुरवात केली आहे.