‘या’ प्रसिद्ध मराठी राजकारणी बाईंचा मुलगा करतोय ‘तू आणि मी, मी आणि तू’ सिनेमाद्वारे पदार्पण

इतिहासामध्ये आजवर ज्यांनी जगावेगळे ठरत प्रेमाला आपलेसे केले ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमियो जूलिएट. अनेकदा समाजामुळे त्यांना आपले प्रेम गमवावे लागते… अशा प्रकारचा संवाद असलेल्या चित्रपटामधून सोहम चाकणकर हा सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटामधून प्रसिद्ध राजकरणी आणि महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा मुलगा पदार्पण करत आहे.
चित्रपटाची निर्मिती राजू तोडसाम, ऋषभ कोठारी आणि सागर जैन यांनी जैन फिल्म प्रॉडक्शन अंतर्गत केली आहे तर दिग्दर्शनाची धुरा कपिल जोंधळे यांनी पहिली आहे. रूपाली चाकणकर यांचा मुलगा प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपट एक प्रेयम कथा असून यामध्ये सोहम हा एका गणेश नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे.
गणेश हा समंजस, साधा आणि होतकरू असा मुलगा आहे आणि सोहम ही भूमिका करणार आहे. सोहमचा रोमॅंटिक अंदाज पाहणे हे खरच औत्सुक्याचे ठरेल. सोहम सोबत कोण कोण अभिनेते या चित्रपटामध्ये काम करणार आहे याबद्दल चांगलीच गोपनीयता पाळली गेली आहे. सोहम चाकणकर याने संगितले की या चित्रपटासाठी तो खूप मेहनत घेत आहे आणि सगळ्यांचे चांगलेच सहकार्य देखील त्याला लाभले आहे.
रूपाली चाकणकर आपल्या मुलाविषयी बोलताना म्हणल्या की, सगळ्यात आधी मी सांगेल की त्याला मिळालेल्या संधीमागे पुर्णपणे त्याचे श्रेय आहे आणि माझा यात काहीही वाटा नाही. उलट त्याचा हा निर्णय ऐकून मी आश्चर्यचकित झाले होते आणि माझ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आमच्या कुटुंबामधले कुणीही या क्षेत्रामध्ये नाही आणि एक वेगळे क्षेत्र निवडून सोहम त्यात काम करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. तो नक्कीच स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करेल