करिश्मा कपूर होणार आहे पुन्हा नवरी ? रणबीरच्या लग्नात ‘या’ गोष्टीमुळे झाले उघड

हिन्दी चित्रपटसृष्टीमधली एकेकाळची चांगली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. करिश्मा आजकाल मोठ्या पडद्यावर फार कमी दिसते तरीही तिचे अनेक चाहते आजही आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमामधून ती चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहते. नुकतेच करिश्मा कपूरचा चुलत भाऊ म्हणजेच रणबीर कपूर याचे लग्न झाले आहे आणि या लग्नाला करिश्मा कपूर
पंजाबी लोकांच्या लग्नामध्ये एक प्रथा आहे, कलीरा नावाचा एक विधी आहे. कलीरा विधी मध्ये नवरी अविवाहित मुलींवर कलीरा वाजवते आणि तो कालीरा ज्या बिना लग्नाच्या मुलीवर पडतो तिचे लग्न होते. आलिया भट्टचा कलीरा करिश्मा कपूरवर पडला आणि याचेच काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. करिश्माने तिच्या इनस्टाग्राम लग्नामधले काही फोटो शारे केले आहेत आणि त्या मधेच एक कलीरा सोबतचा फोटो आहे.
करिश्मा कपूर आणि रणबीर कपूर हे एकमेकांचे चुलत बहीण भाऊ आहेत. करिश्मा आपल्या भावाच्या लग्नाला मुलगा कियानसोबत हजार होती आणि लग्नाच्या एका फोटोमध्ये करिश्मा दाखवते की कलीरा तिच्या हातात आहे आणि तिच्या चेहर्यावर आनंद आहे. करिश्माच्या हातात कलीरा पाहिल्यावर बाकी सगळे देखील खूप आनंदात दिसत आहेत. फोटोमध्ये रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी, चित्रपट निर्माता करण जोहर आणि आलियाच्या काही मैत्रीणी दिसत आहेत. हे फोटो शेअर करत करिश्माने कॅप्शन दिले की “इन्स्टाग्राम VS रिअॅलिटी. कलीरा माझ्यावर पडला!”
पंजाबी लग्नाच्या विधींमध्ये नवरी तिच्या लग्नाच्या बांगड्यांना जोडलेले सोन्याचे दागिने घालते. त्यानंतर ती तिच्या बहिणी आणि मैत्रिणींच्या डोक्यावर तिचे हात हलवते आणि जर कलीरा त्यांच्यावर पडला तर त्या मैत्रिणीचे पुढचं लग्न असणार असे म्हटले जाते.
दरम्यान, या आधी करिश्माने आलिया आणि रणबीरसोबत फोटो शेअर करत त्यांच्या दोघांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. करिश्मा ही रणधीर कपूर आणि बबीता यांची मुलगी आहे. करिश्मा आणि करीना या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. करीनाने पती सैफसोबत लग्नात हजेरी लावली होती. करिश्माने आधी व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले होते. तिला दोनं मुलं असून मुलीचं नाव समायरा असून मुलाचं नाव कियान आहे. २०१६ मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला.