Uncategorized

प्रसाद ओक नंतर ‘धर्मवीर’ चित्रपटामध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका साकारनार हा अभिनेता; एकदम जुळून आलाय Perfect लुक

धर्मवीर हा चित्रपट लवकरच येत आहे आणि या चित्रपटामधल्या प्रसाद ओक यांच्या भूमिकेविषयी चांगलीच उत्सुकता वाढलेली असतानाच अजून एक महत्वाच्या व्यक्तिरेखेबद्दलची माहिती समोर येत आहे आणि या भूमिकेबद्दल देखील चांगलीच उत्सुकता टांकेलेली पाहायला मिळत आहे.

प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन केलेला चित्रपट ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटायला येत आहे आणि चित्रपटाचा टीजर देखील आलेला आहे आणि या टीजरने चित्रपटची उत्सुकता शिगेला पोचवलेली आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक हा चित्रपटामध्ये आनंद दिघे यांची भूमिका करत आहे आणि या चित्रपटच्या संगीत उद्घाटनाचा समारंभ देखील लवकरच पार पडला आहे. या सोहळ्यामध्ये आणखी एका महत्वाच्या व्यक्तिरेखेचा उलगडा झाला आहे आणि ही व्यक्तिरेखा आहे लोकप्रिय असे आणि आनंद दिघे यांना आपला गुरु मानणारे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचा.

प्रसाद ओक यांनी ज्या प्रमाणे आनंद दिघे यांची वेशभूषा अगदी तंतोतंत जुळवून आणली आहे अगदी त्याच प्रकारे एकनाथ शिंदे यांची भूमिका देखील अगदी बरोबर दिसत आहे. एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दाते हे साकारत आहेत आणि त्यांचा लुक देखील अगदी तंतोतंत जुळून आला आहे.

प्रसिद्ध आणि जेष्ठ रंगभूषाकारा विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटामधले हे सगळे डिझाईन आणि वेशभूशेचे नेपथ्य केलेले आहे. प्रसाद ओक याने या सोहळ्यामध्ये एक वाक्य म्हटले, ‘सर्वच राजकरणी सारखे नसतात काही आनंद दिघे देखील असतात. लोकमान्य टिकलांनी ज्या भावनेने गणेश उत्सव सुरू केला त्याच भावनेने मंगेश देसाई यांनी आनंदोत्सव केला. मूर्तिची साथापना केली आणि मूर्तीला अत्यंत सुंदर रूप दिले आणि प्राण प्रतिष्ठा केली ती प्रवीण तरडे यांनी’

‘मी दिघे साहेबांच्या बद्दल खूप काही वाचले आणि ऐकले. माझ्या सारख्या अभिनेत्याला 95 चित्रपटानंतर प्रमुख भूमिका साकारायची संधी या चित्रपटच्या माध्यमामधून मिळाली याचा माला फार आनंद वाटत आहे. चित्रपटच्या निमिताने ज्या ज्या महारथींनी मला मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो’. प्रवीण तरडे यांनी देखील यावेळी आपले मत प्रदर्शित केले होते. धर्मवीर हा चित्रपट 13 मे रोजी झी स्टुडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button