Spread the love

मार्वल स्टुडिओचा आजपर्यंतचा मोठा बिगबजट सिनेमा ‘अवेंजर्स: इनफिनिटी वॉर’ची हिंदुस्तानात धूम आहे. हॉलीवुडमधल्या या चित्रपटाने आतापर्यंत गेलेल्या 2018 वर्षामध्ये सर्वाधिक कमाई केली आहे, अन कदाचित तोच सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असेल. लागोपाठ आलेल्या सुट्ट्या अन बॉलीवूडमधून सुधा कोणताही तगडा चित्रपट उतरला नसल्याने या चित्रपटाने आकड्यांचे रेकोर्ड मोडलेले आहे. आलेल्या माहितीनुसार सोमवारी सिनेमाचे ग्रॉस बॉक्स ऑफिसवरचे कलेक्शन 120.09 कोटी होते. या कमाई सोबतच infinity war हा भारतात सगळ्यात मोठी ओपनिंग करणारा हॉलीवुडपट झाला आहे. या चित्रपटात सर्वाधिक सुपरहिरो आहेत जे सुपरव्हिलनच्या विरोधात युध्द करतात.

डिस्ने इंडियाच्या स्टुडिओ एंटरटेनमेंट चे प्रमुख विक्रम दुग्गलने याबाबत सांगतात की, ‘अवेंजर्स: इनफिनिटी वॉर’चा पहिला आठवडा हा हॉलीवूडपटांनी भारतात पार केलेल्या मैलाचा दगड ठरला आहे. या चित्रपटाने भारतात असलेल्या सिनेरसिकांमध्ये मार्वलच्या पॉप कल्चरची ब्रँन्ड इमेज स्ट्रॉग झाली आहे.

infinity war हा 27 एप्रिलला भारतात रिलीज झाला होता.

‘अवेंजर्स: इनफिनिटी वॉर’ भारतात 27 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन 94.03 कोटी रुपये होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक जॉय आणि अॅन्थोनी रूसो आहेत. बॉक्‍स ऑफिसवर पहिल्या दिवशी 40.13 कोटी, दुसऱ्या दिवशी 39.1 कोटी आणि रविवारी 41.67 कोटी रुपये कमाई झाली.

सोमवारी या चित्रपटाने २४ कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने पहिल्या ४ दिवसाच्या कमाईमध्ये पद्मावत चित्रपटालासुधा मागे टाकले आहे.