National Importance

जातीयवादाची नव्याने सुरवात होतेय का? भाऊचा “गणपती” ते खोलेंचे “सोवळे”

एका बाजूला मेधा खोले यांच्यासारख्या सुशिक्षित महिलेने “सोवळे पाळावे” अन त्याहीपेक्षा जास्त बहुजन समाजातील स्रीच्या हातच्या स्वयम्पाकामुळे “सोवळे मोडले” म्हणून पोलीस चौकी गाठावी, ब्राम्हण संघटनान्नी त्यांना पाठींबा द्यावा तर मराठा संघटनांनी विरोध करावा हि घटना घडते तर दुसऱ्या बाजूला त्याच्या काही दिवस आधी भाऊ कदम यांनी स्वतःच्या घरी गणपती बसवला म्हणून नवबौद्ध समाजाच्या धर्माधिकारींनी त्यांना धर्मातून/समाजातून बहिष्कृत करावे असा निर्णय घेतला. कारण काय तर गणपती बसवल्याने 22 प्रतिज्ञांचे उल्लंघन झाले.

स्वताला सावरकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, आंबेडकरांचे राजकीय किंवा वैचारिक अनुयायी म्हणवणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि डीकास्ट होण्याच्या गप्पा मारणाऱ्या विचारवंतांनीसुद्धा या घटनांचे सोशल मिडीयावर हिरीरीने समर्थन केले.

भाऊ कदमांकडून या लोकांनी बहिष्काराच्या धाकाने, बळजबरीने जाहीर माफीनामा लिहून घेतला. मेधा खोलेंना तक्रार मागे घ्यावी लागली, यात त्यांना त्यांची चूक किती समजली हा चर्चेचा विषय. अनेक भाऊ कदम, निर्मला यादव आजकाल गल्लीबोळात जातीय बहिष्कार अन सोवळ्याचा बळी ठरतायेत.

भाऊ कदम यांच्या प्रकारात ज्या 22 प्रतिज्ञांचे उल्लंघन झाले म्हणून हा गहजब केला त्या 22 प्रतिज्ञा म्हणजे पूर्वाश्रमीचा दलित समाज जेव्हा बौद्ध झाला तेव्हा ते धर्मांतर करताना त्यांची वेगळी सामाजिक व प्रामुख्याने राजकीय ओळख राहावी म्हणून प्रत्येक धर्मांतरीत व्यक्तीने समाजाशी केलेला एक तोंडी करार होता. हिंदूंचे देव, पुरोहित, सणवार, पूजापाठ न मानणे आणि दारू पिऊ नये, चोरी किंवा व्याभिचार करू नये अशा काहीशा या प्रतिज्ञा आहेत. या प्रतिज्ञा आपण हिंदू नसून बौद्ध आहोत अशी सामाजिक व राजकीय ओळख निर्माण करणाऱ्या आहेत. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मूळ बौद्ध धर्मात असल्या कुठल्याही 22 प्रतिज्ञा नाहीत, हा प्रकार फक्त महाराष्ट्रातील नवबौद्ध समाजातच आहे. चार आर्यसत्ये आणि अष्टांग मार्ग हा मूळ बौद्ध धर्म आहे.

पण, भाऊ कदमांनी घरी बसवलेल्या गणपतीला केल्या गेलेल्या विरोधाच्या निमित्ताने स्वतःला आंबेडकरवादी किंवा लोकशाहीवादी म्हणवणाऱ्या नवबौद्ध लोकांची गर्दी सोशल मिडियावर उतरली आहे. आज घटनाकार आंबेडकर असते तर म्हणाले असते “भाऊने त्याच्या घरात कशाची पूजा करावी हा भाऊचा हक्क आहे, अन ज्या सामाजिक बहिष्काराच्या विरोधात मी लढलो तो जहरी खंजीर तुम्ही उचलून माझ्याच लोकांवर चालवताय”.

भाऊ कदम असेल जन्माने नवबौद्ध, पण म्हणून त्याने गणपती बसवू नये हे ठरवणारे हे कोण? या देशाच्या संविधानाने भाऊला हक्क दिलेला आहे त्याला पाहिजे त्या देवाची आराधना करण्याचा. त्याने त्याच्या घरी गणपती बसवू द्या, नाहीतर नमाज पडू द्या, तुम्हाला कोण विचारलंय? त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काही त्याला दिलेली भीक नाही, तो हक्क आहे! आणि हा हक्क भारतीय संविधानाने भाऊला दिलाय, कुणी एखाद्या नेत्याने नाही!

दुसरीकडे अतिशय सुसंस्कृत … पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या ब्राम्हण कुटुंबातील बाई, टिळक… आगरकरांच्या पुण्यात एका बाईवर गुन्हा दाखल करते कि ती बाई ब्राम्हण नाही म्हणून…!!! हवामान विभागातले शास्रज्ञ म्हणवणारे लोक जर बहुजनांच अस श्राध्द घालणार असतील तर देश अजून १८०० सालातच आहे म्हणायचा.

मेधा खोलेंनी “वेदोक्त प्रकरणाची” आठवण मात्र सगळ्या महाराष्ट्राला करून दिली अन जखमेवरची खपली काढायचं काम केल.

जात म्हणून पाठींबा देणाऱ्या संघटना अन जात म्हणून विरोध करणाऱ्या संघटना सांगतात कि महापुरुषांचे विचार मारण्याच काम हे त्यांचे विरोधक करत नाहीत तर त्यांचे पाठीराखेच करतात. मेधा खोलेंना अन “#I Support Medha Khole” tag चालवणाऱ्यांना सावरकर किती कळले माहिती नाही (त्यांनी सावरकरांचं “हिंदुत्व” एकदा वाचाव) … अन नवबौद्धांना आंबेडकर किती कळले हेही माहिती नाही…. अन शत्रूच्या सुभेदाराची सूनेची मानसन्मानाने पाठवण करणाऱ्या शिवरायांचे अन त्यांच्या मावळ्यांचे विचार अतिशय खालच्या अन वैयक्तिक पातळीवर जाऊन एका स्रीवर टीका करणाऱ्यांना किती कळलेत देव जाने…!!!

फेसबुकच्या जगात … मनोरंजन अन बातम्यांचं वावटळ उठवतय – job-jahirat.in (फक्त पेज like करा अन सगळ जग येयील तुमच्या नजरेसमोर)

 

all [email protected] / job-jahirat.com 2017

About the author

admin

Leave a Comment

8 + 20 =