Uncategorized

कधीच समाधानी होऊ नका

फार पूर्वीची गोष्ट आहे, राजे महाराजे असायचे त्या वेळची ! तेव्हा एका गावात एक शिल्पकार होता, तो खूप छान असे शिल्प बनवायचा. आपल्या शिल्प बनवण्याच्या काममध्ये तो इतका पारंगत होता की त्याची या कामातून खूप चांगली कमाई व्हायची. आपल्या या शिल्पकाराला एक मुलगा होता.

शिल्पकाराचा मुलगा लहानपनापासूनच मूर्ति बनवायला लागला. हळूहळू तो मुलगा देखील खूप चांगल्या मूर्ती बनवायला लागला. शिल्पकार आपला मुलगा इतक्या छान मूर्ती बनवतो हे पाहून आनंदी तर होता. पण जेव्हा मुलगा एखादी खूप चांगली कलाकृती बनवायचा आणि ती आपल्या वडिलांना दाखवायचा तेव्हा शिल्पकार काही ना काही कमतरता त्यात काढायचा.

अशाच एका दिवशी मुलाने खूप चांगली मूर्ती बनवली, तरी शिल्पकाराणे त्यात काहीतरी कमी काढलीच तो म्हणाला, ‘बाळा, मूर्ती तर खूप छान झाली आहे पण यात काही चुका आहेत, या चुका शोधून तू दुरुस्त करण्याचा प्रयत्न कर’. मुलगा आपल्या वडिलांचे ऐकायचा आणि चुका शोधून मूर्तीमध्ये सुधारणा करत असायच्या.

सतत आपल्या चुका शोधत राहिल्याने आणि सुधारणा करत असल्यामुले त्याचे शिल्प वडिलांच्यापेक्षा खूप चांगले होऊ लागले. काही वर्षातच अशी वेळ आली की लोक शिल्पकाराच्या शिल्पांपेक्षा जास्त पैसे त्याच्या मुलाच्या कलाकृतींना देऊ लागले. तरीही अजूनही वडील मुलाच्या चुका शोधायचे आणि त्याला देखील त्या शोधायला लावायचे.

आता वडिलांचे रोजचे हे बोलणे मुलालाही आवडेनासे झाले. तो काहीही न बोलता चुका शोधी आणि सुधारे. एके दिवशी मुलाचा संयम संपला आणि त्याने वडिलांना एके दिवशी सुनावले, ‘तुम्ही स्वत:ला खूप मोठे शिल्पकार समजता पण जर तुम्ही इतके मोठे शिल्पकार असतं तर तुमच्या मूर्तींपेक्षा माझ्या मूर्तींना जास्त किम्मत मिळाली नसती. आता तुम्ही मला सल्ला देऊ नका, माझ्या मूर्ती परिपूर्ण आहेत’

वडिलांनी मुलाचे ऐकले, आणि त्यानंतर त्यांनी चुका काढायचे सोडून दिले. सुरुवातीला मुलगा आनंदी होता, पण काही दिवसातच त्याच्या लक्षात आले की. पूर्वी येणारे पारखी गिर्हाइक आपल्या मूर्त्यांची खूप पाहणी करायचे आणि त्यात आपण ज्या नवीन गोष्टी टाकायचो त्याची प्रशंसा व्हायची. पण आजकाल लोक त्याच्या शिल्पांची प्रशंसा करत नाहीयेत.

त्याच्या अजून लक्षात आले की त्याच्या प्रत्येक नव्या मूर्तिची किम्मत ही जुन्या मूर्तीपेक्षा अधिक असायची पण आजकाल त्याच्या नव्या जुन्या मूर्त्यांना सारखीच किम्मत मिळत आहे. मुलगा हे पाहून आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना हे सगळे सांगून टाकले. वडिलांनी त्याचे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून त्याला असे वाटले की जणूकाही आपण जे सांगणार आहोत ते त्यांना अगोदरपासून माहिती होते.

मुलगा त्यांना म्हणतो, बाबा हे होणार असे होणार हे तुम्हाला आधीच माहिती होते ना ? तेव्हा शिल्पकार म्हणाला, मी देखील या परिस्थिती मधून गेलेलो आहे. मुलगा त्यावर म्हणतो,  मग तुम्ही मला हे आधी का संगितले नाही. तेव्हा तो म्हणतो की तेव्हा ते समजून घेण्याची तुझी कुवत नवती. तू जेव्हा पहिल्यांदा माझ्यापेक्षा चांगली मूर्ती बनवली तेव्हाच मला माहित होते. कदाचित माझे वागणे चूक असेल पण मी काढलेल्या चुकांमुळे तू आज माझ्यापेक्षा खूप पुढे गेला आहेस.

तुला कदाचित माहिती नसेल अनेकदा तुझ्या शिल्पांमधील चुका काढण्यात अनेकदा माझ्या शिल्पकलेचा कस लागायचा. तू स्वत:ला सुधारत होतास आणी हेच तुझ्या यशाचे गुपित होते. आज तू तुझ्या कामावर समाधानी झाला आहेस आणि हेच कारण आहे की तुझ्या मूर्ती आता नेहमीसारख्या प्रशंसानिय होत नाहीत.

लोकांना नेहमीच तुझ्या कामात नावीन्य आणि सुधारणा दिसतात म्हणून ते तुझी स्तुती करतात आणि म्हणूनच तुला जास्त पैसे मिळायचे.

मुलगा आता शांत झाला होता. त्याने विचारले,’ बाबा मी आता काय करावे?’ तेव्हा शिल्पकार म्हणाला, ‘असमाधानी रहा’ फक्त याच गोष्टीमुळे तू प्रगति करू शकतो आणि हीच गोष्ट तुला पाहिल्यापेक्षा अधिक निपुण बनवेल. आपण परिपूर्ण झालो किंवा यापेक्षा अधिक आपण आता करू शकत नाही अशी भावना जेव्हा तुझ्या मनात येईल त्याच वेळी तुझी प्रगती थांबेल.

तात्पर्य- आपल्याला वरील गोष्टीमुळे शिक्षा मिळते की, आपण आपल्या कामावर कधीही समाधानी राहू नका. ज्या दिवशी तुम्ही समाधानी व्हाल त्या दिवशी तुमची वाढ थांबेल. श्री स्वामी समर्थ !!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button