Breaking News
Home / Uncategorized / ३७ वर्षीय चुलतीचा १८ वर्षीय पुतण्यावर जडला जीव | अजब लग्नाची गजब कहाणी

३७ वर्षीय चुलतीचा १८ वर्षीय पुतण्यावर जडला जीव | अजब लग्नाची गजब कहाणी

हिंगोली जिल्ह्यामधल्या १८ वर्षाच्या युवकाने चक्क आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या अन नात्याने चुल्तीसोबत लग्न केल आहे.

The Viral Maharashtra मध्ये स्वागत आहे… अशाच प्रकारचे विडीयो पाहण्यासाठी आम्हाला नक्की LIKE करा

औंढा तालुक्यातील नाहद येथील १८ वर्षीय तरुणाने त्याच्या वयाच्या दुप्पट असलेल्या आणि दोन लेकरांची आई असलेल्या ३७ वर्षीय चुलत चुलतीसोबत प्रेमविवाह केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

औंढा तालुक्यातील नाहद येथील सोनू बोरगड हा १८ वर्षीय तरुण आणि त्याच्यासोबत त्याची कुशावर्त बोरागड नावाची ३७ वर्षीय प्रेमिका गावातील महादेव मंदिरात दाखल झाले. या वेळी मंदिरात गावातील बरेच भाविक उपस्थित होते. त्यांना, या जोडप्याने ते लग्न करीत असल्याचे सांगून, आजपासून त्यांनी पती-पत्नी असल्याचे घोषित केले. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेले हार एकमेकांच्या गळ्यात घालून जीवनभर सोबत द्यायचा निश्चय केला. कुणालाही न घाबरता त्यांनी ग्रामस्थांकडून मोबाइलमध्ये फोटो काढून घेतले. या घटनेमुळे मंदिरातील भाविक बुचकळ्यात पडले. काय बोलावे हेच त्यांना कळत नसल्याने, त्यांनी या जोडप्याला कोणताही विरोध न करता एका वादग्रस्त प्रेमविवाहाचे साक्षीदार झाले. नाहद येथील रहिवासी असलेले दोघेही शेजारीच राहतात. नात्याने चुलत चुलती- पुतणे असलेल्या या जोडप्याचे प्रेमसंबंध गेल्या दोन-तीन वर्षांपासून आहेत. परंतु लग्न करण्यासाठी वय कमी भरत होते. मुलाचे १८ वर्षे वय पूर्ण होताच त्यांनी रविवारी गावातील मंदिर गाठून लग्नाचा बार उडवून टाकला. या दोघांचा प्रेमविवाह अचानक झाल्याने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

मुलगी बनून गर्ल्स हॉस्टलमध्ये घुसला अन केल अस काही कि ….

दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स ! या कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात 12 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + 20 =