Spread the love

स्वप्नात मेलेल्या माणसांसोबत बोलण्याचा अर्थ काय असतो जाणून घ्या …!!  बहुतेक सर्वांनाच स्वप्न पडतात, काही लोकांना नेहमी चांगली स्वप्ने पडतात तर काहींना खराब स्वप्ने. आपल्याला नेहमीच जाणवत असेल कि, स्वप्नांची दुनिया हि आपल्या दुनियेपेक्षा नक्कीच वेगळी आहे. या दुनियेत आपण अशा-अशा गोष्टी करतो ज्यांच्याबद्दल आपण खऱ्या आयुष्यात विचारसुद्धा करू शकत नाही. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, कधीकधी आपण स्वप्नात मेलेल्या व्यक्तींसोबत गप्पा मारत असतो. अर्थात याच बाबतीत काही स्वप्न जोतीष्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आज “व्हायरल महाराष्ट्र” त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे.

“आज आम्ही तुम्हाला भूत-प्रेत, आत्मा यांच्यासंबंधी पडणाऱ्या स्वप्नांबद्दल सांगणार आहेत. बहुतांश लोकांना या स्वप्नांचा अर्थ माहिती नाहीये. तर चला याबद्दल थोडस जाणून घेऊयात”

स्वप्नात असे काही दिसले तर त्याचा अर्थ हा असतो –

१. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात खोडलेली कबर दिसली तर याचा अर्थ असा होतो कि, भविष्यात त्याला प्रेमात निराशा मिळण्याची शक्यता आहे.

२. जर स्वप्नात तुम्ही एखाद्या मेलेल्या व्यक्तीला आवाज देत असाल, तर बहुतेक तुमच्या जीवणात एखादे मोठे संकट येणार आहे.

३. याउलट स्वप्नामध्ये एखाद्या प्रेताशी गप्पा मारत असाल तर हि गोष्ट शुभ समजली जाते, अन तुमच्या मनोकामना लवकरच पूर्ण होणार असे सांगितले जाते

४. जर स्वप्नात एखाद्या व्यक्तीला ताबूतमध्ये ठेवलेले प्रेत दिसले तर भविष्यात एखादा अपघात होण्याची शक्याता सांगितली जाते.

५. जर स्वप्नामध्ये स्वच्छ- सुंदर असे स्मशान जर तुम्ही पाहिले, तर भविष्यात तुम्हाला फायदा अन एखाद्या मोठ्या पदावर बढती होण्याची संभावना असते.

६. जर स्वप्नात तुम्ही तुमच्या बायकोचे प्रेत पहिले असेल, तर तुमचे भविष्य धोक्यात आहे. अशा व्यक्तींना अनेक दुर्धर रोग होण्याची शक्यता सांगण्यात येते.

७. जर तुमच्या स्वप्नात जर तुम्ही विष पिऊन मरत असाल तर भविष्यात तुम्ही रोगी होण्याचे अन अनेक दुखः मिळण्याची शक्यता असते

८. जर एखाद्या महिलेला स्वप्नात राक्षस दिसत असेल तर, त्या महिलेला आपल्या पती अथवा प्रियकरापासून धोका मिळण्याची शक्यता असते.

९. स्वप्नात स्वतःची शवयात्रा पाहणाऱ्या व्यक्तीच्या भविष्यात काही वायीट घटना होण्याची संभावना असते.

१०. स्वप्नामध्ये प्रेतात्म्यासोबत मैत्री करणे… गप्पा मारणे हे शुभ समजले जाते. अशा व्यक्तींना व्यापारात खूप फायदा होण्याची शक्यात असते.