Spread the love

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, असाच एकदा फेसबुक चाळत बसलो होतो(पहिले पुस्तके चाळायचो आता फेसबुक) तर मला एका मुलीची फ्रेंड रेक्वेस्ट दिसली, ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. सगळ्यांसारख्या मला जास्त करून मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असत. म्हणून मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी आश्चर्यचकीत होणं… थोडस सुखावणे अगदी सहाजिक होतं. (काहीजण हुरळून जाताना पहिले आहेत, आमच हे साधे सुखावणे होते)

पण पडलो मी संगणक अभियंता, कॉम्पुटर इंजीनियरमध्येना एक गुप्तहेर लपलेला असतो, त्यातून त्याला कधी-कधी हेकर व्हायची स्वप्ने पडतात, पण फेसबुकवर प्रोफायली चाळण्यापलीकडे काही आमची गुप्तहेरी जात नाही, तितका वेळच नसतो म्हणा, म्हणून एक्सेप्ट करायच्या आधी सवयी प्रमाने मी तिचं प्रोफाईल चेक केलं. अरेच्चा हे तर नवे account आहे, कारण फ्रेंडलिस्टमध्ये जास्तकुणी add नवते. थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल? पण थोड्यावेळापूर्वीच सुखावण्याचा आनंद मला काही कमी करायचा नवता… एक मुलगी मला रेक्वेस्ट पाठवते.. ती फेक असूच कशी शकेल अस सांगून मी परत एकदा सुखावतो.

नवे account असेल अन फोतोशोप केलेला आपला फोटो पाहून कदाचित तिने रिक्वेस्ट पाठवली असेल किंवा असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजून माझ्या सोबत मैत्री करण्यासाठी सज्जेस्ट केलं असावं, तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली.

त्यानंतर तिच्याकडून Thanks असा मेसेज आला… क्या बात हे…!! हि तर चांगलीच interested दिसत होती हळूहळू माझ्या स्टेटसवर लाईक आणि चांगल्या कॉमेंटस मिळायला सुरूवात झाली. बस का..!! फेसबुकवर आपल्या पोस्टींची कदर करणारी मैत्रीण मिळाली होती. म्हणून मी खूप आनंदीत झालो. आता आम्ही रोजच chat करायला लागलो, तिला कदाचित माझ्यात रस असावा कारण नंतर वैयक्तीक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली.

आता तर ती थोड्याफार रोमँटिक शायरी पण पोस्ट करायला लागली होती…
एक दिवस ह्या बाईसाहेबाने विचारलं : तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का?
मी लगेच म्हणालो: हो खूप.
ती गप्प बसली.

दुसऱ्या दिवशी तिनं विचारलं : तुमची बायको खूप सुंदर असेल ना ?

ह्यावेळेसही मी तेच उत्तर दिलं: अर्थात, अप्सराच जणू …!!

त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली : तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का ?

” खूपच रूचकर, अन्नपुर्णेने तिच्या रुपात घरात प्रवेश केलाय” मी उत्तर दिलं…..मग काही दिवस ती गायब झाली.

अचानक काल सकाळी तिनं मैसेज बॉक्स मध्ये लिहलं “मी तुमच्या गावी आलेय. तुम्ही मला भेटणार का?

मी म्हणालो : जरूर भेटेन की.

तेव्हा ती म्हणाली – “तर मग ठीक आहे फन सिनेमाला या. आपली भेटही होईल अन पिक्चर पण पाहणं होईल.

मी म्हणालो नको तुम्हीच माझ्या घरी या, तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल अन आमच्या अन्नपूर्णेच्या हातचा स्वयंपाक सुद्घा चाखून बघा.

तेव्हा ती म्हणाली : नाही, मी तुमच्या मॅडमसमोर नाही येणार तुम्हाला यायचं तर या.

मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला. पण ती सारखं सारखं सिनेमाला यायचाच हट्ट करत राहीली व मी माझ्या घरी.

ती चिडली व म्हणाली : ठीक आहे मी परत जाते आहे. तुम्ही भेकड घरातच बसा.

मी तिला परत समजावयचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले पण तिनं ऐकलं नाही.

शेवटी हार मानून मी म्हणालो: मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट अन्यथा घरी जा….ती ऑफलाइन झाली.

सायंकाळी घरी पोहचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी मटन करी बनवून तयार होती.

मी बायकोला विचारलं: आज कोणी येतं आहे का आपल्या घरी जेवायला?

बायको म्हणाली: प्रिया जोशी येतेय.

काय…SSS

ती तिला कुठं भेटली? तू तिला कसं ओळखतेस?

“जरा धीर धरा साहेब, ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तहेरी मिशनच्या परिक्षेत पास झालात. तुम्हीच माझे खरे जोडीदार… माझे सच्चे जीवनसाथी..!! लवकर जेवायला बसा तुमच्या आवडीची मटन करी  थंड होतंय.

टीप- संगणक अभियंत्या मधला दडलेला गुप्तहेर कधीकधी बायकोचा मोबायील सुद्धा चाळतो बर का …!! (अन जर त्या दिवशी माझ्यातला गुप्तहेराला मारून मी बायकोचा फोन चेक केला नसता तर … आज ….)ही पोस्ट फेस्बुकावरती व्हायरल झालेल्या पोस्टवरून घेतली आहे… तर तुम्ही तुमच्या मित्रांना tag करायला विसरू नका ….